चाळीसगांव ( प्रतिनिधी राज देवरे ) >>जगात थैमान घेतलेल्या कोरोनाला व त्याचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने जिल्ह्यात व तालुक्यात सर्वत्र लॉकडाउन आहे. त्यात मार्च, एप्रिल व मे च्या लग्न तारखा जमावबंदी आदेश असल्याने मोजक्या लोकात फिजिकल डिस्टन्स राखत घरातच विवाह आज 9 रोजी सोहळा पार पडला.

त्यामुळे सामाजिक भान राखत नियोजित विवाह सोहळा साध्या पद्धतीने घरातच फिजिकल डिस्टन्स राखत करण्यात आला. घरातच मोजक्याच लोकात अवघ्या 30 लोकांत पार पडला. संभाजी सेनाचे शहरध्यक्ष अविनाश काकडे यांच्या बहिणीचा विवाह असल्या प्रसंगी संभाजी सेना संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लक्ष्मण शिरसाठ व दोघांचे फक्त घरातील सदस्य, मामा-मामी यांची उपस्थिती होते.