१० रुपयांचे आमिष दाखवून बालकासोबत अनैसर्गिक कृत्य

क्राईम चाळीसगाव

तरुणाविरोधात चाळीसगावात गुन्हा दाखल

चाळीसगाव प्रतिनिधी ::> शहरालगतच्या टाकळी प्र.चा. येथील ९ वर्षाच्या बालकाला १० रूपयांचे आमिष दाखवून अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या तरुणाविरोधात चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. २८ रोजी दुपारी २.४५ वाजेच्या सुमारास येथील एका घराच्या पायरीवर ही घटना घडली. पाेलिसांनी संशयितास अटक केली.

९ वर्षाचा बालक गल्लीत सायकल फिरवत होता. संशयित बंटी उर्फ रोहित भरत पवार (रा. भगवा चौक, टाकळी) याने दहा रुपयांची नोट दाखवून तुला पिक्चर दाखवतो, असे म्हणून त्याला जवळ घेत अनैसर्गिक कृत्य केले. पीडित बालक तीव्र विरोध करुनही संशयिताने त्याच्या मानेला पकडून त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. हा प्रकार पीडित बालकाच्या काकाने पाहिला.

यानंतर त्यांनी अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या संशयिताच्या दिशेने वीट मारून फेकली. मात्र, संशयित पळून गेला. त्यानंतर पीडित बालकाच्या घरच्यांनी या प्रकाराची माहिती पाेलिसांना कळवली. पाेलिसांनी आरोपीला अटक केली.

याप्रकरणी बालकाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून बंटी उर्फ रोहित भरत पवार याच्या विरूद्ध शहर पोलिस ठाण्यात कलम ३७७ व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२च्या कलम ४ नुसार गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *