चाळीसगांव येथे आगामी नवरात्र, दसरा या सणांच्या पार्श्वभूमीवर शहर शांतता कमिटीची बैठक संपन्न

Social कट्टा कट्टा चाळीसगाव पाेलिस

चाळीसगाव राज देवरे ::> चाळीसगाव येथे आगामी नवरात्र तसेच दसरा या महत्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच सामाजिक एकोपा कायम अबाधीत रहावा व सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये यासाठी चाळीसगाव पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 15 रोजी सायंकाळी शहर शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली.

आमदार मंगेश चव्हाण, तहसीलदार अमोल मोरे, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गोरे, पोलिस निरीक्षक विजय कुमार ठाकूरवाड यांनी मनोगत व्यक्त केले.

सध्या सर्वत्र कोव्हीड 19 या जिवघेण्याऱ्या संसर्गजन्य कोरोनाचा काळ चालू असल्याने केंद्र व राज्य शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून, सोशल डिस्टनसिंग नियम पाळून, गर्दी न करता पूजेला व आरतीला पाच पेक्षा जास्त व्यक्ती नसाव्यात, सार्वजनिक मंडळाची मूर्ती चार फुट आणि घरघुती मूर्ती दोन फुटापेक्षा जास्त नसावी, मंडळांनी मिरवणूक न काढता देवीची घटस्थापना आणि विसर्जन अगदी साधे पनाने करावे, नवरात्र उत्सव साजरा करतांना मंडळांनी सजावट देखावे न करता माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला जनजागृती कराव्यात. यासह अन्य काही महत्वाचे ठराविक मुद्दे यावेळी सांगण्यात आले, आपण सर्वांनी आगामी सण वरील सूचनांचे तंतोतंत पालन करून साजरे करावे, अशी सूचना वरील मान्यवरांनी आप आपल्या वैयक्तिक भाषणात दिल्या.

या बैठकीला आमदार मंगेश चव्हाण, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गोरे, डीवायएसपी कैलास गावडे, तहसीलदार अमोल मोरे, चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे, मेहुनबारे पोलिस स्टेशनचे एपीआय सचिन बेंद्रे तसेच शहरातील नवरात्र मंडळाचे पदाधीकारी सदस्य व शहरातील ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, लोकप्रतिनिधी नगरसेवक यांच्या सह विविध संस्थातील पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.