माजी नगरसेवक चौधरी हल्ल्यात गंभीर जखमी; चाळीसगाव येथील घटना

Politicalकट्टा कट्टा क्राईम चाळीसगाव

चाळीसगाव प्रतिनिधी राज देवरे >> शहर पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वीर सावरकर चौकात शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास भाजपच्या माजी नगरसेवकावर माजी नगरसेवकाचा पती व मुलाने धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. यामुळे शहरात खळबळ उडाली. यात जखमी प्रभाकर चौधरी यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत.

पोलिस ठाण्यातून हॉटेलवर परतल्यानंतर हा हल्ला झाला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल नव्हता. जखमीचे जबाब घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना औरंगाबाद पाठवल्याचे पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड म्हणाले.