चाळीसगांवातील अवैद्य उत्खनन तात्काळ थांबवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनचे तहसीलदार यांना निवेदन

चाळीसगाव सिटी न्यूज

नगरपालिकेच्या नावाखाली बाहेर होतोय मुरुमाचा पुरवठा..?

का करतेय..? प्रशासन याकडे कानाडोळा..

चाळीसगाव प्रतिनिधी राज देवरे >> शहरा लगतच खडकी बायपास येथील एमआयडीसी भागातील खदानीत मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू आहे हे भूमाफिया प्रशासनाची फसवणूक करून लाखो रुपयांचा प्रशासनाचा महसूल बुडवत आहे.

शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार उत्खनन न करता मनमानी पद्धतीने मोठ्या यंत्राचा वापर करत आहे जेसीबी, पोकलांड सारख्या यंत्रांचा वापर करून तसाच सुरुंग लावून अवैध पद्धतीने उत्खनन करीत आहेत या भागातून मुरूम डबर खडीचे उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे यामुळे पर्यावरणाची ही हानी खूप मोठ्या प्रमाणात होत आसुन यापूर्वी याच संदर्भात तहसीलदारांकडे तोंडी तक्रारी केल्या आहेत तसेच अनेक वृत्तवाहिन्यांनी वृत्तपत्रात बातम्या देखील प्रसिद्ध केल्या आहेत मात्र याबाबत कुठलीही दखल प्रशासनाकडून घेण्यात आलेली नाही. याठिकाणी कुंपणच शेत खात आहे का असा सवाल आता जनतेच्या मनात उपस्थित झाला आहे. प्रशासन भूमाफिया समोर हातबल झाले आहे का?

होत असलेल्या अवैधरित्या उत्खननाबाबत प्रशासन कानाडोळा का करत आहे? होत असलेल्या उत्खनना कडे प्रशासन का फिरकत नाही असा देखील सवाल आता जनतेच्या मनात उपस्थित झालेला आहे प्रशासनाने कठोर कारवाई करावी असे निवेदन चाळीसगाव इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन यांनी तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडिया चे अध्यक्ष महिंद्र सूर्यवंशी, उपाध्यक्ष खेमचंद कुमावत, सचिव गफ्फार शेख, सहसचिव आनंद गांगुर्डे, रोहित शिंदे, दीपक गडरी, रणधीर जाधव, राजेंद्र देवरे, वैभव पवार, शुभम पाटील आदी उपस्थित होते.