चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिलखोड येथे कौटुंबिक वादातून झालेल्या हाणामारीत भांडण सोडवायला गेलेल्या एकाचा खून झाला आहे, तर दुसरा गंभीर जखमी आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील पिलखोड येथे काका – पुतण्यात कौटुंबिक वादा सुरु होता. काका पुतण्याचा काका – पुतण्याचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या गावातील व्यक्ती धोंडु सुपडु पाटील (वय 62) हे गेले असता त्याना हाणामारीत डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा खुन झाला आहे. तर सचिन धोंडू पाटील (वय 28 ) हा गंभीर जखमी झाला आहे. जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच मेहुणबारे पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.