३० हजारांच्या गावठी कट्ट्यासह तरुणास चाळीसगाव पोलिसांनी केली अटक

क्राईम चाळीसगाव पाेलिस सिटी न्यूज

चाळीसगाव प्रतिनिधी राज देवरे ::> काल रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास शहरातील घाटरोड परिसरात नगरपालिका शॉपिंग कॉम्प्लेक्सजळील चहाच्या टपरी शेजारी आरोपीस गावठी कट्ट्यासह चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रेसनोट च्या माहितीनुसार, घाटरोड परिसरात नगरपालिका कॉम्प्लेक्स जवळील चहाच्या टपरीजवळ एक तरुण गावठी कट्यासह उभा आहे. त्यावरून त्यांनी सदर माहिती वरिष्ठांना दिल्यावरून पोलीस निरीक्षक विजय कुमार ठाकुरवाड, सपोनि एन. ए. सैय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक भगवान उमाळे, पंकज पाटील, पो कॉ निलेश पाटील, अमोल पाटील यांनी 18 रोजी रात्री 10.20 वाजता आरोपी चांद सलीम सैय्यद (वय- 23) रा. नागद रोड झोपडपट्टी चाळीसगाव यास 30 हजाराचा गावठी कट्टा, मॅगझीन, 3 जिवंत काडतूससह अटक केली आहे. त्याचा साथीदार मात्र फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला असून तपास सपोनि एन. ए. सैय्यद करीत आहेत.