साडी व केस ओढून चाळीसगाव तालुक्यातील जुनवणे येथील महिलेचा विनयभंग

क्राईम चाळीसगाव

चाळीसगाव प्रतिनिधी : > तालुक्यातील जुनवणे येथे महिला नाल्यात शौचास गेली असता तिचा एकाने विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुनवणे येथील नाईकनगर भागातील नाल्याजवळ महिला शौचास गेली असता संशयित आरोपी सुनील देविदास चव्हाण याने तिची साडी व केस ओढून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. ही घटना २१ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. घटनेनंतर घरी जाऊन या महिलेने घडलेल्या प्रकाराची माहिती कुटुंबियांना दिली.

याप्रकरणी संदीप जाधव याच्या फिर्यादीवरून २३ रोजी आरोपी सुनील चव्हाण याच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *