चाळीसगाव प्रतिनिधी >> सर्वसामान्य जनतेची साधी पानटपरी असली तरी ते अतिक्रमण नगरपरिषदेच्या वतीने काढण्यात येते मात्र शहरातील नागदरोडवरील पाणी टाकी शेजारील नगरपालिका च्या व्यापारी संकुलासमोर भंगार दुकानदाराने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केल्याने तेथील व्यापारी त्रस्त झाले असून सदर अतिक्रमण काढले जावे अशी मागणी आता होत असून नगरपरिषदेचे मात्र याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील नागद रोडवर पाण्याच्या टाकी शेजारी नगरपरिषदेचे व्यापारी संकुल आहे त्याठिकाणी अनेक व्यापाऱ्यानी दुकाने घेतली आहेत शिवाय त्याच ठिकाणी भंगार व्यावसायिकाने देखील गाळे घेतले आहेत पण गेल्या काही वर्षांपासून या भंगार दुकानदाराने व्यापारी संकुलाच्या मोकळ्या जागेवर त्याचे खरेदी विक्रीचे भंगार ठेवले आहे यामुळे त्या संकुलातील दुकानात ग्राहकांना जाण्यासाठी रस्ता नाही व रस्त्यात पत्रे, लोखंडी गंजलेल्या सळ्या, आदी वस्तू असल्याने ग्राहक घाबरून त्याठिकानच्या दुकानात जात नसल्याने त्या छोट्या व्यापारी दुकानंदारांचे मोठे नुकसान होत असून व्यावसायिक घाबरून दुकाने बंद ठेवतात अथवा आहे त्यापरिस्थतीत आपली दुकाने सुरू ठेवत आहेत. काही महिन्यांपूर्वी चाळीसगाव नागद रस्त्याचे काम सुरू होते त्यावेळी रस्त्याच्या आजूबाजूचे अतिक्रमण नगरपरिषदेने काढून टाकले मात्र त्याच्या शेजारीच भंगार दुकानंदाराने एवढ्या मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून देखील ते काढले नसल्याने नगरपरिषदेचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे का अशी चर्चा आता शहरभरात होत आहे नगरपरिषदेने तेथील छोट्या व्यापाऱयांचा विचार करून व्यापारी संकुलाच्या समोर ठेवलेले भंगार काढण्यास सांगावे व अतिक्रमण केल्याप्रकरणी भंगार व्यावसायिकावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.