चाळीसगांव कन्नड घाटात पाच ते सहा किलोमीटर वाहनांची रांगच रांग

क्राईम चाळीसगाव
Subscribe Please

चाळीसगांव राज देवरे :>> धुळे-औरंगाबाद महामार्गावरील चाळीसगाव कन्नड घाट जवळपास पाच ते सहा किलोमीटर वाहनांची रांगच रांग आज बघायला मिळाली.

क्रेनच्या साहाय्याने मालवाहतूक ट्रक वर काढतांना.

धुळे औरंगाबाद महामार्गावरील कन्नड घाटात आज सायंकाळी अडीच ते तीन तास वाहतूक खोळंबली होती. कन्नड घाटाच्या दरीत गाडी कोसळलेली असल्याने महामार्ग पोलिसांच्या मार्फत मालवाहातुक गाडी क्रेन लावून वर काढायचे काम सुरू होते.

घाटात वाहतूक ठप्प

म्हणून हा घाट जाम झाला असून जवळपास पाच ते सहा किलोमीटर वाहनांची रांग घाटात व घाटाच्या खाली लागलेले होती. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. वाहतूक सुरळीत करण्यास महामार्ग पोलीस कर्मचारी व सामाजिक नागरिक वाहनांना वाट दाखवत कन्नड घाटात असलेली लांबच लांब असलेली वाहतुकीची रांग मोकळी करण्यास वाट दाखवत होते.

या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यापासून ते माल वाहतुक गाडी काढण्यासाठी व क्रेन चालकांना मदत करण्याचे काम महामार्ग पोलीस कर्मचारी नितीन ठाकूर, दिनेश चव्हाण, पांडुरंग पाटील, रियान खान, सोपान पाटील, नरेश सोनवणे, योगेश दिलदार, नरेंद्र सिसोदे, जितू माळी हे करीत होते.

1 thought on “चाळीसगांव कन्नड घाटात पाच ते सहा किलोमीटर वाहनांची रांगच रांग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *