परिस्थिती गंभीर आहे, रुग्णसेवा सुरु ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने तुमच्या सोबत – आ.मंगेश चव्हाण

आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतली खाजगी कोविड सेंटरच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांची बैठक, चाळीसगाव – कोरोनाच्या पहिल्या लाटेत सरकारी व खाजगी कोविड सेंटर च्या माध्यमातून आपण चांगले काम केले त्यामुळे आपण चाळीसगाव तालुक्यात कोरोनावर नियंत्रण मिळवू शकलो मात्र दुसरी लाट अधिक तीव्र असून रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे, परिस्थिती गंभीर आहे, सर्व […]

Read More

जळगाव जिल्हा परिषदेतही सत्तांतरासाठी खडसेंकडून हालचाली

प्रतिनिधी जळगाव >> जिल्हा परिषदेतील आपल्याच एकेकाळच्या समर्थक पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळेनासे झाल्याने महाविकास आघाडीच्या माध्यमातून तिथे सत्तांतर घडवून आणण्याच्या हालचाली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सुरू केल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळी त्या अनुशंगाने खडसे यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली असून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे गटनेते या बैठकीला उपस्थित होते. जळगाव महानगरपालिकेत नुकतेच शिवसेनेने सत्तांतर […]

Read More

आमदार मंगेश चव्हाण यांना दर सोमवार, मंगळवारी लावावी लागणार चाळीसगाव पोलिस ठाण्यात हजेरी

प्रतिनिधी जळगाव >> महावितरणचे अधीक्षक अभियंता मोहम्मद फारुक शेख यांना मारहाण केल्याप्रकरणी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांना सोमवारी जिल्हा न्यायालयाने अटीशर्तींवर जामीन मंजूर केला. न्यायाधीश छाया पाटील यांच्या न्यायालयात आमदार चव्हाण यांच्यासह सर्व संशयितांच्या जामीन अर्जावर दोन्ही पक्षांचे युक्तिवाद १ एप्रिल रोजी पूर्ण झाले होते. दरम्यान, सोमवारी न्यायालयाने सर्वांना जामीन अर्ज मंजूर केले. […]

Read More

जळगावातील बंडखोरी केलेल्या त्या २७ भाजपच्या नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी तब्बल ३० हजार पानांची याचिका!

जळगाव >> भारतीय जनता पक्षाला जळगाव शहर मनपाच्या निवडणुकीत नामुष्की पत्करावी लागली राज्यातील नगरसेवकाची ही मोठी फूट ठरली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आ.गिरीश महाजन यांनी या फुटीर नगरसेवकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला होता. जळगाव मनपाच्या महापौर निवडणुकीत भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करून मतदान करणाऱ्या भाजपच्या २७ नगरसेवकांना अपात्र घोषित करण्यासाठी पक्षातर्फे […]

Read More

या शहरातील नगरसेविकेची शिवसेनेला सोडचिठ्ठी

चाळीसगाव >> येथील शिवसेनेच्या नगरसेविका व गेल्या काही दिवसांपासून भाजपसोबत असलेल्या विजया प्रकाश पवार यांनी शिवसेना तालुका महिला संघटक पदाचा राजीनामा दिला आहे. शनिवारी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांना पाठवला आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्या भूमिकेला पाठींबा म्हणून आपण राजीनामा आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. मी देखील […]

Read More

चाळीसगावात मशाल रॅली काढणाऱ्या नगरसेवकांसह ३० जणांवर गुन्हा

राज देवरे प्रतिनिधी चाळीसगाव >> आमदार मंगेश चव्हाण यांच्या अटकेच्या निषेधार्थ मशाल रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांमध्ये भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष, शहराध्यक्ष, नगरसेवक व माजी पं.स. सदस्यांचा समावेश आहे. २७ रोजी सायंकाळी ७ ते ७.३० वाजे दरम्यान शहरात विश्रामगृह ते तहसील कार्यालय […]

Read More

शिवसेनेच्या माजी तालुकाप्रमुखाचा कोरोनामुळे मृत्यू

वरणगाव >> शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख तथा शहरातील रेणुका नगरातील रहिवासी संजीव लक्ष्मण कोलते (वय ५२) यांचा शुक्रवारी सकाळी ११ वाजता कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्यावर डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. सन १९८८ मध्ये वरणगाव येथे शिवसेनेची शाखा स्थापन करून कोलते यांनी कडवट शिवसैनिक म्हणून प्रतिकूल परिस्थितीत संघटनेची बांधणी केली. केवळ वरणगाव शहरच नव्हे, तर […]

Read More

जळगावातील २७ भाजप बंडखोर नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी हालचाली सुरु

रिड जळगाव टीम >> जळगाव महापालिका महापौर निवडणुकीत २७ बंडखोर नगरसेवकांमुळे स्पष्ट बहुमताची सत्ता गेल्याची बाब भाजपाच्या चांगलीच जिव्हारी लागली असून बंडखोर नगरसेवकांना धडा शिकवण्याची जबाबदारी नाशिक भाजप पदाधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. प्रशासकीय पत्रव्यवहारात मातब्बर मानले जाणारे भाजप गटनेता जगदीश पाटील यांनी आता नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा प्रस्ताव येत्या दोन दिवसात विभागीय आयुक्तांकडे सादर करण्याचा निर्णय […]

Read More

कोविड सेंटरमधील जेवणाचा दर्जा सुधारा : महापौर जयश्री महाजन

प्रतिनिधी जळगाव >> महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये जेवणाचा दर्जा राखला जात नसून अस्वच्छतेसंदर्भात तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर जयश्री महाजन यांनी बुधवारी इकरा कोविड केअर सेंटरमध्ये पाहणी केली. अधिकाऱ्यांना जेवणाचा दर्जा सुधारताना साफसफाईवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी डॉ.विजय घोलप आणि इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. इकराच्या कोविड सेंटरमध्ये कोरोनाचे रुग्ण […]

Read More

जळगावातील प्रस्तावित रस्त्यांच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आश्वासन

धुळे बोढरे रस्त्यास मंजुरी दिल्याबद्दल खासदार उन्मेश पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रत्यक्ष भेटून मानले आभार जळगाव >> जिल्ह्याच्या दळणवळणास चालना मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या धुळे ते बोढरे राष्ट्रीय महामार्ग 211 या मार्गासाठी गेल्या पंधरवड्यात 1007 कोटी रुपयाच्या कामांची निविदा प्रसिद्ध झाल्याने या परिसरातील सांस्कृतिक, आध्यात्मिक औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असून जळगाव मतदारसंघातील […]

Read More

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘हा’ निर्णय घेण्यात आल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मानले मोदी सरकारचे आभार

मुंबई >> देशातील ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्य केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेतच्या नुकत्याच झालेल्या व्हीसीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी ही मागणी केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. कोविडचा वाढता प्रादुर्भाव […]

Read More

रखडलेल्या रस्त्यावरून भाजपच्या सभापतींचा भाजपलाच ‘घरचा आहेर’

प्रतिनिधी मुक्ताईनगर >> नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १३ मध्ये संबंधित ठेकेदाराने केलेल्या रस्त्यांची सहा महिन्यातच दुरवस्था झाली असून बरेच रस्ते अपूर्णावस्थेतच आहेत. त्यामुळे ठेकेदारावर कारवाईच्या मागणीसाठी थेट सत्ताधारी भाजपच्या शिक्षण सभापती कुंदा अनिल पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. ठेकेदारावर कारवाई न केल्यास व कामे सुरू न झाल्यास नगरपंचायतीसमोर उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला […]

Read More

‘आता काय आमचा बाजार उठवल्यावर सीडी लावणार का?’ सोशल मीडियावर व्हायरल!

रिड जळगाव : मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारच्या मागे शुक्लकाष्ट लागल्याचे दिसत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षासमोर तर सारख्या अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे विरोधकांनी राष्ट्रवादीला हैरान करून सोडले आहे. सुरुवातीला पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. यानंतर थेट सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंवरही अत्याचाराचे आरोप एका महिलेने […]

Read More

एसटी कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण करावे : आमदार भोळे, मंगेश चव्हाण यांची मागणी

जळगाव >> बेस्टच्या सेवेसाठी जळगावसह विविध आगारातून दर आठवड्याला एसटीतील चालक, वाहकांसह इतर कर्मचारी जात आहेत. जळगावातील कर्मचारीदेखील दोन वेळा मुंबईला जाऊन आले. मात्र, आता कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने, जळगाव विभागातील कर्मचाऱ्यांना बेस्टच्या सेवेतून वगळून त्यांना कोरोना लस द्यावी, अशी मागणी आमदार सुरेश भोळे व आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी आणि विभाग नियंत्रकांकडे केली आहे. […]

Read More

जळगावात गृहमंत्री देशमुख यांची प्रतिमा जाळून भाजपचे आंदोलन

जळगाव >> गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले असल्याची माहिती परमबीरसिंग यांच्या लेटरमधून उघड झाली आहे. या प्रकरणात गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. रविवारी भाजपतर्फे गृहमंत्री देशमुखांच्या मागणीसाठी टॉवर चौकात निषेध आंदोलन केले. या वेळी गृहमंत्र्यांविरोधात घोषणा देण्यात आल्या. गृहमंत्र्यांच्या प्रतिमेला काळे फासून महिलांकडून चप्पल मारण्यात […]

Read More

भाजपच्या २७ बंडखोर नगरसेवकांना दाखवला बाहेरचा रस्ता!

जळगाव >> महाराष्ट्रात राजकीय घडामोडीमध्ये सध्याला चांगलेच वातावरण तापले असून आज जळगाव शहर महानगरपालिकेत महापौर निवडीप्रसंगी भाजपातून बंडखोरी करत शिवसेनेला मदत केलेल्या नगरसेवकांना भाजपने सोशल मीडियाच्या ग्रुपमधून बाहेर काढले आहे. जळगाव मनपा महापौर निवडीच्या राजकीय घोळात भाजपच्या २७ नगरसेवकांनी बंडखोरी करत शिवसेनेला मदत केली होती. भाजपकडून नगरसेवकांवर कायदेशीर कारवाई करण्याची कार्यवाही सुरू आहे परंतु भाजपने […]

Read More

खा. रक्षा खडसेंकडून आ. गिरीश महाजनांची पाठराखण !

जळगाव >> माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही महाजनांना आरोप केले होते. तसेच आता राजकारणात यश-अपयश येत असते. जळगाव महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाची सत्ता गेली असली तरी पक्षाचे नेते, माजी मंत्री गिरीश महाजन अपयशी झाले, असे म्हणता येणार नाही, अशी […]

Read More

नगरसेवकांच्या नाराजीची गिरीश महाजन यांना होती कल्पना

प्रतिनिधी जळगाव >> विकास कामे होत नसल्याने नागरिकांचा रोष वाढत आहे. त्यामुळे भाजपतील नगरसेवकांमध्ये नाराजी वाढली आहे याबाबत माजी मंत्री गिरीश महाजन यांना कल्पना दिली होती, अशी माहिती नवनिर्वाचित उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. शुक्रवारी मावळते उपमहापौर सुनील खडके यांच्याकडून पाटील यांनी पदभार स्वीकारला. महापालिकेत भाजपला खिंडार पाडत शिवसेनेने सत्ता काबीज केली आहे. […]

Read More

जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण!

जळगाव प्रतिनिधी >> महाराष्ट्राचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून त्यांनी आपल्या संपर्कातील लोकांनी चाचणी करून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्री गा. गुलाबराव पाटील हे ठाणे येथून महापालिका निवडणुकीची सूत्रे हलवत होती. त्यांना थोडी लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी चाचणी केली. यात […]

Read More

चोपड्यात शनिवार-रविवार दोन दिवस कडक लॉकडाऊन

चोपडा राजेंद्र पाटील प्रतिनिधी >> कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी चोपडा शहर शनिवारी आणि रविवारी (दि.२० व २१) लॉकडाऊन करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहेत, अशी माहिती तहसीलदार अनिल गावित यांनी दिली. चोपडा शहरात यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने दोन दिवस शहर बंद पाळण्यात आला होता. त्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उपविभागीय अधिकारी सुमित शिंदे यांनी लॉकडाऊनचे आदेश काढले. […]

Read More