नवोदय विद्यालयासाठी १३ फेब्रुवारीला प्रवेश चाचणी

धुळे प्रतिनिधी :>> तालुक्यातील नकाणे येथील नवोदय विद्यालयात सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील नववीच्या प्रवेशासाठी निवड चाचणी (लॅटरी एन्ट्री) १३ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी १२.३० या कालावधीत होणार आहे. नववीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षा जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी (लॅटरल एन्ट्री) २०२१ चे ऑनलाइन अर्ज १५ डिसेंबरपर्यंत www.navodaya.gov.in किंवा nvsadmissionclassnine.in या […]

Read More

चिमठाणेत विवाहितेची आत्महत्या, दोघांची कारागृहात रवानगी

धुळे प्रतिनिधी ::> शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील विवाहिता शीतल धनगर हिच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तिचा पती व सासूला अटक केली आहे. दोघांची मंगळवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. चिमठाणे गावातील शीतल नवल धनगर या विवाहितेने सोमवारी सकाळी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली होती. या प्रकरणी मृत शीतलच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल […]

Read More

सर्प पकडण्याचे धाडस युवकाच्या आले अंगलट

शहादा प्रतिनिधी ::> तालुक्यातील लोणखेडा येथे सर्प पकडण्याचे धाडस करणाऱ्या सोळा वर्षाच्या मुलाला सापानेे दंश केला. सुदैवाने या मुलावर वेळीच उपचार झाल्याने त्याचा जीव वाचला. लोणखेडा येथील एका दुकानात साप असल्याची माहिती मिळाल्याने जुनेद शेख, राहुल शर्मा, विनोद सोनवणे हे तिन्ही मित्र या ठिकाणी गेेले. त्यानंतर त्यांनी आम्ही सर्पमित्र आहोत अशी खोटी माहिती दिली. त्यानंतर […]

Read More

रस्ते दुरुस्तीसाठी आमदार राजेश पाडवी यांनी घेतला पुढाकार

तळोदा ::> तालुक्यातील विविध भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे उसाची वाहतूक करताना चालकांना कसरत करावी लागते. या पार्श्वभूमीवर आमदार राजेश पाडवी यांनी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जेसीबी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे काम वेगात होत आहे. ऊस तोडणीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी तालुक्यात मजूर दाखल झाले आहे. शेतातील रस्ते अरुंद असून, बऱ्याच ठिकाणी फरशी धसली […]

Read More

राज्यपाल कोश्यारींच्या हस्ते राजेंद्र बंब यांचा काेराेना याेद्धा म्हणून सत्कार

धुळे ::> येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जीवनलाल बंब यांचा राज्यपाल भगतसिंग काेश्यारी यांच्या हस्ते काेराेना याेद्धा म्हणून गाैरव करण्यात अाला. महापाैर चंद्रकांत साेनार, ऋषीकेश भामरे, साेनल बंब, अाचल बंब, कुणाल साेनार, अावेश खान अादी उपस्थित हाेते. लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर राजेंद्र बंब, साेनाली बंब यांनी मास्क वाटपासह विविध सामाजिक उपक्रम राबवले. या उपक्रमाची माहिती महापाैर चंद्रकांत […]

Read More

शेतीच्या वाटे हिश्श्यावरून शेतकऱ्याला शिवीगाळ, दमदाटी करत कुऱ्हाडीने मारहाण

धुळे ::> तालुक्यातील आर्वी गावात शेतीच्या वाटेहिश्श्यावरून शेतकऱ्याला शिवीगाळ, दमदाटी करत कुऱ्हाडीने मारण्यात आले. याप्रकरणी चौघांविरुद्ध धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्वी येथील शेतकरी शिवाजी नथ्थू पाटील यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या जमिनीवर त्यांनी शेती करू नये, या कारणावरून रमेश पाटील, संगीता रमेश पाटील, सिंधुबाई पाटील, सुभाष लखा […]

Read More

पाय घसरून विहिरीत पडल्याने अल्पवयीन मुलीचा मृत्यू

धुळे ::> तालुक्यातील बल्हाणे शिवारात विहिरीत बुडाल्यामुळे मुलीचा मृत्यू झाला. भारती गर्दे असे मृत मुलीचे नाव आहे. बल्हाणे गावातील शेतकरी ईश्वर हिरामण गर्दे नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी आले होते. त्यांच्यासोबत पत्नी अरुणा, मुलगी भारती व मुलगा हेमंत होता. सकाळी आठ वाजेपासून गर्दे कुटुंब शेतात कापूस वेचणी करत होते. दुपारी चौघांनी शेतात जेवण केले. या वेळी भारती […]

Read More

विवाहितेचा छळ; पाच जणांवर केला गुन्हा दाखल

धुळे ::> तालुक्यातील मोराणे येथे माहेर असलेल्या विवाहितेचा सासरी छळ केला. विवाहितेच्या तक्रारीनुसार रवींद्र भरत बागुल यांच्यासोबत २४ एप्रिल २०१५ रोजी विवाह झाला. लग्नात मानपान कमी दिल्याचे कारण पुढे करून पती रवींद्र बागुल, सासरा भरत साहेबराव बागुल, आशाबाई भरत बागुल, सुवर्णा शैलेश सूर्यवंशी, सीमा प्रफुल्ल पाटील यांच्याकडून त्रास दिला जाऊ लागला असे तक्रारीत नमूद आहे. […]

Read More

चितोडरोड परिसरात रिक्षातून जप्त केला ५० हजारांचा मद्यसाठा

धुळे प्रतिनिधी ::> शहरातील चितोडरोड परिसरात पोलिसांनी छापा टाकून विदेशी मद्याची बेकायदेशीररीत्या वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. अन्य एक जण फरार झाला आहे. कारवाईत रिक्षासह सुमारे ५० हजारांचा मद्यसाठा जप्त केला.शासकीय दूध डेअरी परिसरातून जाणाऱ्या रिक्षातून (एमएच १९, ४३५) मद्याची वाहतूक केली जात होती. पोलिसांनी हे वाहन अडवून तपासणी केल्यावर त्यात चार बॉक्समध्ये मद्यसाठा मिळून […]

Read More

बेपत्ता झालेल्या तरुणाचा शेतातील विहिरीत आढळला मृतदेह

धुळे::> तालुक्यातील हेंद्रूण गावातून बेपत्ता झालेल्या संजय एंडाईत या तरुणाचा मृतदेह गुरुवारी शेतविहिरीत आढळला. याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.हेंद्रूण येथील संजय नथ्थू एंडाईत हे बुधवारी राहत्या घरातून बेपत्ता झाले होते. नैसर्गिक विधीला जात असल्याचे कारण सांगून ते घराबाहेर पडले होते. त्यानंतर गाव शिवारातील […]

Read More

शिंदखेडा तालुक्यातील पिंप्राड शिवारात ट्रकच्या धडकेत युवकाचा मृत्यू

धुळे ::> शिंदखेडा तालुक्यातील पिंप्राड शिवारात भरधाव वेगातील ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्यामुळे तरुण ठार तर एक जण जखमी झाला. दीपक शेलार असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरून ट्रक (एमपी-०९-एचएच ०९९६) सुसाट वेगात निघाला होता. या ट्रकने मोटारसायकलला ( एमएच-१८-बीजे-५८८४) धडक दिली. त्यात एक तरुण ठार झाला तर […]

Read More

धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेच्या ७३ शाखांमध्ये मिळणार मायक्रो एटीएम सुविधा

धुळे प्रतिनिधी ::> धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेच्या सर्व शाखांमध्ये आता मायक्रो एटीएमची सुविधा सुरु झाली आहे. मायक्रो एटीएममध्ये कोणत्याही बँकेच्या ग्राहकाला पैसे काढण्याची सुविधा देण्यात आली आहे. या सुविधेमुळे ग्राहकांची सोय होणार आहे. जिल्हा बँकेतर्फे शेतकरी सभासदांना रुपे केसीसी कार्डद्वारे पीक कर्जपुरवठा करण्याचे नियोजन आहे. तसेच जिल्हा बँकेच्या सभासदांना पैसे काढण्यासाठी ज्या गावात एटीएम […]

Read More

सात महिन्यांनंतर कापडणे-धुळे मिनिडोअर धावल्या ; मास्क लावल्यानंतरच प्रवाशांना परवानगी

कापडणे प्रतिनिधी ::> लॉकडाऊनमुळे सुमारे सात महिन्यांपासून प्रवासी वाहतूक करणाऱ्या मिनिडोअर बंद होत्या. ही सेवा आता पुन्हा सुरू झाल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला आहे. प्रवाशांना मास्क लावल्यानंतरच मिनिडोअरमध्ये बसण्यास परवानगी दिली जात आहे. येथील शंभराहून जास्त मिनिडोअर चालक धुळे ते कापडणे अशी प्रवासी वाहतूक करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यानंतर सुमारे सात महिन्यांपासून ही सुविधा बंद […]

Read More

शिवसेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात

शिरपूर ::> तालुक्यात शिवसेनेतर्फे प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार बभळाज येथून अभियानाला सुरुवात झाली. तालुक्यात १ लाख सदस्यांची नोंदणी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, उपजिल्हाप्रमुख भरतसिंह राजपूत, विभाभाई जोगराणा, विधानसभा संघटक छोटूसिंग राजपूत, शहरप्रमुख मनोज धनगर, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष नन्ना जाधव, […]

Read More

१५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण; गुन्हा दाखल

धुळे ::> साक्री तालुक्यातील मालपूर येथील १५ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने एकावर संशय व्यक्त केला आहे. मालपूर येथील १५ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे. सर्वत्र शोध घेतल्यानंतरही ती आढळली नाही. एटीडीचा अर्ज भरण्यासाठी जाते असे कारण सांगून ती घराबाहेर पडली होती. केतन उत्तम पानपाटील याच्या मोटारसायकलवरून जाताना पीडित मुलीला तिच्या […]

Read More

जिल्ह्यातील कॉलेज सुरू करण्यासाठी विद्यापीठ निर्णयाच्या प्रतीक्षेत

जळगाव प्रतिनिधी ::> कोरोनामुळे सात महिन्यांपासून विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालये बंद आहे. यूजीसीने १ नोव्हेंबरपासून विद्यापीठे सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, महाराष्ट्र शासनाकडून पत्र आल्यानंतरच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सुरू करण्याबाबत निर्णय होणार असल्याने विद्यापीठ शासन निर्णयाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोरोनामुळे २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यामुळे विद्यापीठे, शैक्षणिक […]

Read More

अंतिम वर्षाच्या वंचित विद्यार्थ्यांसाठी १८ ते २३ नोव्हेंबर दरम्यान परीक्षा देण्याची पुन्हा संधी

जळगाव प्रतिनिधी ::> कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सद्या सुरू असलेल्या अंतिम वर्ष / अंतिम सत्र (बॅकलॉगसह) परीक्षेपासून विविध कारणाने वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी १८ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत एमसीक्यु पॅटर्ननुसार ऑनलाइन परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. उन्हाळी २०२० मधील अंतिम वर्ष / अंतिम सत्राच्या बॅकलॉगसह परीक्षा १२ ऑक्टोबरपासून सूरू झाल्या आहेत. या परीक्षा […]

Read More

युवकांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा

धडगाव प्रतिनिधी ::>पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रमांतर्गत तालुक्यातील उमराणी बुद्रुक येथील युवकांनी गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यावर वनराई बंधारा बांधला. तालुक्यातील उमराणी ब्रुद्रुक गावाजवळून चार नाले वाहतात. या नाल्याचे पाणी वाहून जाते. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाई जाणवते. या पार्श्वभूमीवर गावातील युवकांनी या नाल्यावर श्रमदानातून वनराई बंधारा बांधला. त्यामुळे पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. कृषीसेवक वामन पावरा, प्रा. […]

Read More

वडिलांच्या वर्षश्राद्धाला मुलीने केले मुंडण

धुळे प्रतिनिधी ::> शहरातील गणेशनगर, भोई सोसायटीत वडिलांच्या वर्षश्राद्धाला कन्येने मुंडण केले. त्याबद्दल प्रा.बबिता वाडिले त्यांचा सत्कार करण्यात आला. संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रा. वैशाली पाटील व जिल्हा सचिव दीपाली पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. प्रा. वैशाली पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. विमल वाडिले, सरस्वती शिवदे, माधुरी वाडिले, अरुणा चव्हाण, संगीता तायडे, […]

Read More

शिरपूर : मुंबई-आग्रा महामार्गावरील बिजासन घाटात धावत्या ट्रकने घेतला पेट

शिरपूर ::> मुंबई-आग्रा महामार्गावरील बिजासन घाट पोलिस चौकीच्या समोर मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास चालत्या ट्रक ( ट्रेलर) ला अचानक आग लागली. आग ही त्याच्या केबिनमध्ये लागली होती. चालकाने उडी मारून आपला जीव वाचवला. पोलिसांनी व स्थानिक लोकांनी पाणी टाकून सदर आग विझवली. या घटनेत ट्रक ( ट्रेलर) चे केबिन पूर्णपणे जळाले आहे. या ट्रकमध्ये […]

Read More