२७ फेब्रुवारी जळगाव जिल्हा कोरोना अपडेट्स वाचा थोडक्यात !

रिड जळगाव टीम >> जळगाव जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आज २८८ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळल्याने प्रशासनाची दिवसेंदिवस डोकेदुखी वाढत आहे. तर दुसरीकडे १५६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज एकाचा मृत्यू झाला आहे. जळगाव शहर – १३९, जळगाव ग्रामीण-०८, भुसावळ- १४, अमळनेर- ०८, चोपडा-१५, पाचोरा-१३, भडगाव-११, धरणगाव-०३, यावल-०५, एरंडोल-२२, जामनेर-१५, रावेर-०२, पारोळा-०४, […]

Read More

जळगावात विवाहितेचा दोन लाख रुपयांसाठी छळ

जळगाव >> सदगुरूनगरातील विवाहितेस सासरच्यांनी २ लाख रुपयांसाठी छळ व मारहाण केली. ही घटना १० मार्च २०१९ ते २८ मे २०१९ दरम्यान घडली. या प्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध एमआयडीसीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

जिल्ह्यात होमगार्ड २ महिन्यांपासून मानधन नसल्याने त्रस्त

जळगाव प्रतिनिधी >> बंदोबस्तासाठी पोलिसांवरील ताण हलका करण्यासाठी होमगार्डची मदत घेतली जाते. मात्र, दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील होमगार्डला मानधन मिळालेले नाही. जिल्ह्यात सुमारे १६०० होमगार्ड सेवेत आहेत. कोरोना काळात त्यांनी पोलिसांच्या बरोबरीने बंदोबस्त केला आहे. त्यावेळी त्यांचे मानधन नियमित झाले होते. आता नोव्हेंबर महिन्यापासून होमगार्डला मानधन नाही. त्यातच ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या होमगार्ड कर्मचाऱ्यांना आता नियमित […]

Read More

जळगावच्या डी-मार्टला ५० हजार रुपये ठोठावला दंड

जळगाव प्रतिनिधी >> कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात असताना डी-मार्ट या मॉलमध्ये प्रचंड गर्दी आढळून आली होती. त्यामुळे महापालिकेने मंगळवारी डी-मार्टला सील ठोकले होते. याप्रकरणी पालिकेने डी-मार्टला ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. तसेच शुक्रवारी बोर्ड ऑफ डायरेक्टरविरूध्द गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे उपायुक्त संतोष वाहुळे यांनी सांगितले. मनपाने बुधवारी डी-मार्ट प्रशासनाला नोटीस बजावल्यानंतर […]

Read More

२५ फेब्रुवारी जळगाव जिल्हा कोरोना अपडेट्स वाचा थोडक्यात!

जळगाव >> आज मिळालेल्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आज २७९ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १३८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जळगाव शहर – १२२, जळगाव ग्रामीण-०९, भुसावळ- ०४, अमळनेर-०२, चोपडा-३३, पाचोरा-१०, भडगाव-०१, धरणगाव-०२, यावल-०५, एरंडोल-०१, जामनेर-१८, रावेर-०१, पारोळा-०२, चाळीसगाव-४५, मुक्ताईनगर-२०, बोदवड-०१, इतर जिल्ह्यातील-०३ असे एकुण […]

Read More

जळगावात हळदीच्या कार्यक्रमात डीजे जप्त ; गुन्हा दाखल

जळगाव >> आशाबाबानगर येथे २३ रोजी रात्री हळदीच्या कार्यक्रमात बेकायदेशीरपणे डीजे वाजवल्याने पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करीत डीजे जप्त केला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ५० पेक्षा जास्त नागरिकांनी सार्वजनिक कार्यक्रमात गर्दी करू नये असे स्पष्ट आदेश असताना नागरिकांकडून त्यांचे उल्लंघन केले जात आहे. २३ रोजी रात्री आशाबाबानगर येथे बापूराव श्रावण पाटील यांनी हळदीचा कार्यक्रम आयोजित केला होता. […]

Read More

राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील यांचा राजीनामा

जळगाव >> जिल्हा राष्ट्रवादीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील यांनी प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. तीन वर्षापासून या पदावर काम करीत असल्याने नवीन तरुण महिलेला संधी मिळावी म्हणून राजीनामा देत असल्याचे पत्रात म्हटले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पंधरा दिवसांपूर्वी जिल्हा दौऱ्यावर येऊन गेले होते. स्वत: महिला जिल्हाध्यक्षा व मुलगा अभिषेक पाटील हे महानगराध्यक्ष […]

Read More

रात्री नऊ वाजेनंतरही सुरू असलेल्या दोन बियरबारवर कारवाई

जळगाव प्रतिनिधी >> कोरोना रोखण्यासाठी प्रशासन विविध पातळ्यांवर काम करीत आहेत. नियम तयार करीत आहेत. अशात बियरबार, हॉटेल्स यांना रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या बसस्थानक परिसरातील हॉटेल श्री स्टार पॅलेस व कालिंका माता मंदिर परिसरातील हॉटेल जलपरी यांच्यावर २३ रोजी रात्री कारवाई करण्यात आली. गर्दी टाळण्यासाठी हॉटेल्स व बियरबारमध्ये […]

Read More

‘तू लग्न कसे करते ते पाहतो’ असे म्हणत तरुणीला लग्नाच्या दोन दिवस आधी धमकी

प्रतिनिधी जळगाव >> दोन दिवसांवर लग्न येऊन ठेपलेल्या एका तरुणीस ‘तू लग्न कसे करते ते पाहतो’ असे म्हणत तरुणाने धमकी देऊन विनयभंग केला. ही घटना जळगाव तालुक्यात मंगळवारी सायंकाळी ७ वाजता घडली. रोहन साहेबराव सपकाळे (रा. अंजाळे, ता. यावल) या तरुणाने तरुणीला धमकी दिली आहे. रोहन हा गेल्या अनेक दिवसांपासून या तरुणीची छेड काढतो आहे. […]

Read More

रेल्वेस्थानकात स्क्रीनिंग केल्यानंतर मिळतो प्रवेश

जळगाव >> रेल्वेस्थानकात प्रवेशद्वारातच स्क्रिनिंग आणि साहित्याचे सॅनिटायझेशन केले जाते. त्यानंतरच प्रवाशांना रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जातो. फलाटावरही तिकिटाच्या व्यतीरिक्त कुणी फिरत तर नाही ना? याची तपासणी रेल्वे सुरक्षा बलाचे पथक सातत्याने करीत असल्याचे दिसते.

Read More

दिल्लीतील पथ संचलनात जळगावची समृद्धी संत प्रजाकसत्ताक दिनी करणार देशाचे नेतृत्व

जळगाव प्रतिनिधी >> २६ जानेवारी निमित्ताने दिल्लीत होणाऱ्या सैन्य दलाच्या आणि एनसीसीच्या परेडकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेले असते. दिल्ली येथील राजपथावर २६ जानेवारीला होणाऱ्या संचलनात मूळजी जेठा महाविद्यालयची एन.सी.सी. युनिट ची छात्र सैनिक सिनिअर अंडर ऑफिसर समृद्धी हर्षल संत ही ऑल इंडिया परेड कमांडर म्हणून पद भूषविणार आहे. यावर्षी एन.सी.सी.(NCC)महाराष्ट्र डायरेक्टरेट मधून केवळ २६ छात्र […]

Read More

पत्नी माहेरी गेलेली असताना पतीची राहत्या घरात आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी >> पिंप्राळा येथे पत्नी मुलांसह माहेरी गेलेली असताना पतीने स्वत:च्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. अनिल शंकर पाटील (वय ३८, रा. पिंप्राळा) असे मृत प्रौढाचे नाव आहे. अनिल हा व्यवसायाने प्लंबर होता. त्याची पत्नी ही दोन मुलांसह माहेरी निघून गेलेली आहे. शनिवारी रात्री […]

Read More

प्रेमविवाहाला कुटुंबीयांनी नकार दिल्याने प्रेमीयुगुलाने घेतले विष

जळगाव प्रतिनिधी >> मोठ्या बहिणीच्या दिरावर दीड वर्षांपासून प्रेम जडले. पण त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबीयांनी प्रेमविवाहाला नकार दिला. त्यामुळे युवतीसह युवकाने १९ जानेवारी रोजी ममुराबाद शिवारातील शेतात दुपारी दीड वाजता विषारी द्रव प्राशन केले. त्यात ब्रेनडेड झालेल्या युवतीचा उपचारादरम्यान रविवारी सकाळी सव्वाआठ वाजता रुग्णालयात मृत्यू झाला. युवकाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. मोहिनी […]

Read More

अर्णब गोस्वामीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; काँग्रेसचे आंदोलन

जळगाव प्रतिनिधी >>अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. ही कारवाई होण्याच्या तीन दिवस आधीच अर्णब गोस्वामीकडे ही माहिती होती. हा देशद्रोहाचा गुन्हा असून त्याच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. यासाठी शुक्रवारी काँग्रेसने राज्यभर आंदोलन केले. […]

Read More

जळगाव शहराच्या विकासासाठी १० कोटींचा निधी प्राप्त !

जळगाव प्रतिनिधी>> शहराच्या विकासासाठी विविध योजनेंतर्गत १० कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाला असून त्या अंतर्गत शहरातील विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. विकासकामांमध्ये शक्यतो रस्त्यांच्या डांबरीकरणाला प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली. जळगाव शहराच्या विकासासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री आ. गिरीश महाजन, आ. सुरेश भोळे यांच्या पाठपुराव्याने नगरोत्थान योजनेअंतर्गत ५ […]

Read More

22 जानेवारी जळगाव जिल्हा कोरोना अपडेट्स वाचा थोडक्यात!

जळगाव प्रतिनिधी >> कोरोना अहवालात आज जिल्ह्यातून २६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. आज २९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजच्या अहवालात सात तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहे. जळगाव शहर-८, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-२, अमळनेर-१, चोपडा-३, पाचोरा-०, भडगाव-२, धरणगाव-१, यावल-०, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-५, पारोळा-०, चाळीसगाव-३, मुक्ताईनगर-१, बोदवड-० असे एकुण २६ बाधित रूग्ण आढळले आहे. […]

Read More

एकनाथ खडसेंची अटक टाळण्यासाठी आटापिटा, मात्र दिलासा देण्यास ईडीचा विरोध

मुंबई >> भाजपातून राष्ट्रवादीमध्ये पक्षांतर झालेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी ईडीच्या नोटीसविरोधात याचिका दाखल केली आहे. ईडीने अटकेची कारवाई करू नये, यासाठी एकनाथ खडसे यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. ईडीने आपले प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले. त्यानुसार एकनाथ खडसेंना अटकेपासून दिलासा देण्यास ईडीचा विरोध आहे. एकनाथ खडसेंच्यावतीने वकिलांनी युक्तिवाद केला. […]

Read More

विटेनरला तरुण शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू

जळगाव >> शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या राकेश हिंमत जाधव (वय २४, रा. विटनेर, ता. जळगाव) या तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास विटनेर शिवारात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राकेश जाधव हा तरुण विटनेर येथे कुटुंबियांसह वास्तव्यास होता. गॅरेज चालवून व सोबत […]

Read More

‘तुला मुलीच होतात’ या कारणावरुन विवाहितेचा छळ; ६ जणांवर गुन्हा

जळगाव >> ‘तुला मुलीच होतात’ या कारणावरुन विवाहितेचा पतीसह सासरच्या लोकांनी छळ केला. गितांजली उर्फ भावना संदीप चौधरी (रा. भवरखेडा, ता. धरणगाव) असे विवाहितेचे नाव आहे. त्यांना दोन मुली आहेत. दरम्यान, या कारणावरुन तिचा पती संदीप चौधरीसह सासरच्या ६ जणांनी सातत्याने मारहाण करुन छळ केला. तसेच घर बांधणे व प्लॉट घेण्यासाठी माहेराहून तीन लाख रुपये […]

Read More

हिस्ट्रीशीटर महिलेचा एसपींच्या कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव प्रतिनिधी >> पिंप्राळा हुडकोतील हिस्ट्रीशीटर महिलेने जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय परिसरात अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५.४५ वाजता ही घटना घडली. शारदा श्रावण मोरे असे या महिलेचे नाव आहे. तिचा मुलगा गौरव सुरवाडे याचे ११ जानेवारी रोजी कोणीतरी अपहरण केले. या संदर्भात शारदा मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रामानंदनगर […]

Read More