जळगावात १४ महिलांची साडे तेरा लाख रुपयांची फसवणूक

जळगाव प्रतिनिधी >> १४ महिलांची १३ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक करत बचत गटाच्या माध्यमातून लघू उद्योगासह पैशाचे आमिष दाखवत महिलांना गंडविले असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वत्सला रमेश पाटील (वय-५९) रा. आदर्श नगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संगीता नीरज जोशी, नीरज जोशी, जागृती नीरज जोशी, संतोष जयनारायण […]

Read More

नशिबादजवळच्या शोरूममधील विम्याच्या पैशांचा अपहारप्रकरणी दोघांवर गुन्हा

नशिराबाद >> जळगाव-भुसावळ रोडवरील नशिबादजवळच्या सरस्वती फोर्ड या चारकीच्या शोरुमध्ये विमा भरण्यासाठी आलेल्या ग्राहकाचे पैसे जमा न करता कॅशिअर आणि महिला कर्मचाऱ्याने अपहार केला तसेच शोरूम मालकाची फसवणूक आणि दमदाटी करत शिवीगाळ केल्याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरस्वती फोर्ड शोरुममधील दीपा बबन पाटील उर्फ दीपा विलास पाटील ही महिला इन्शुरन्स एक्सिकेटीव्ह […]

Read More

चाकूचा धाक दाखवत दुकानदारास लुटणाऱ्या दोघांना अटक

जळगाव प्रतिनिधी >> कपाट खरेदीचा बहाणा करून दुकानात शिरलेल्या दोन भामट्यांनी दुकानदारास चाकूचा धाक दाखवत पैसे व मोबाइल लांबवले होते. २ नोव्हेंबर रोजी रात्री ७.३० वाजता शाहूनगर भागात ही घटना घडली होती. या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयितांना गुरुवारी अटक केली. दीपक चैनराज ललवाणी (वय ३२, रा. मुसळी फाटा, ता. धरणगाव) व दीपक […]

Read More

चोपडा तालुक्यातून अट्टल घरफोड्याला एलसीबीकडून अटक

चोपडा प्रतिनिधी >> तालुक्यातील सुटकार येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोड्या व दुचाकी चोरी करणाऱ्या संशयिताला मंगळवारी ताब्यात घेतले आहे. प्रदीप लोटन कोळी (वय २७ रा.सुटकार ता.चोपडा) असे त्याचे नाव आहे. सुटकार गावातील युवक जळगाव व चोपडा शहरात घरफोडी करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी […]

Read More

जळगावातील सपकाळे खुनातील पाचव्या संशयिताला १६ दिवसांनी अटक

जळगाव प्रतिनिधी >> माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश याच्या खुनातील पाचवा संशयित १६ दिवसांनी पोलिसांच्या हाती लागला. आकाश मुरलीधर सपकाळे (वय २३, रा. कांचननगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. यापूर्वी गणेश दंगल सोनवणे, विशाल संजय सपकाळे, रूपेश संजय सपकाळे, महेश राजू निंबाळकर या चौघांना अटक करण्यात आली होती. तर आकाश हा शुक्रवारी […]

Read More

दारूच्या नशेत युवकाची विहरीत उडी घेऊन आत्महत्या ; पोलिसांचा अंदाज

जळगाव >> तालुक्यातील शिरसोली येथे एका युवकाने विहरीत उडी घेत आत्महत्या केली असून ही घटना शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली असल्याचे बोलले जात आहे. याबाबत जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अस्कामात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर माहिती अशी की, शिरसोली ता. जळगाव प्र.न. येथील रविंद्र यशवंत वाघ (वय ४०) यांनी सटवाई शेती शिवारातील भागवत […]

Read More

जिल्ह्यात नवमतदारांनी नोंदणी करावी, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आवाहन

जळगाव >> निवडणूक आयोगामार्फत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. १ जानेवारी २०२१ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरीकांनी १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत नमुना अर्ज भरुन मतदार म्हणून नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. एकापेक्षा अधिक ठिकाणी नावाची नोंद असल्यास, किंवा कायमस्वरुपी […]

Read More

जळगावात जुन्या वादातून एकाला शिवीगाळ करत मारहाण ; चार जणांविरोधात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी >> मोहाडी रोडवर जुन्या वादातून ६० वर्षीय व्यापाऱ्याला गुरूवारी रात्री महिलेसह अज्ञात तीन व्यक्तींनी शिवीगाळ करत मारहाण केल्याची घडली असून याप्रकरणी ४ जणांविरूध्द रामानंद नगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, रमेश छारुमल तिंडवाणी वय ६० रा. रविंद्र नगर यांनी पायल सोनवणे यांच्यासह इतरांविरोधात पोलिसात केसेस केलेल्या […]

Read More

शिवाजीनगरातील जेके जिनींगमध्ये उभ्या असलेल्या ट्रकच्या बॅटऱ्या लांबविल्या ; पोलीसात तक्रार

जळगाव प्रतिनिधी >> शिवाजी नगर भागातील जेके जिनींग परिसरात उभ्या असलेल्या सहा ट्रकच्या कॅबिनमधून वायरी तोडत चोरट्यांनी बॅटर्‍या लांबविल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. सतत महिन्याभारांपासून ट्रकमधील बॅटर्‍या चोरीला जात असल्याने ट्रकचालकांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गुरुवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास जे.के. जिनिंगच्या मोकळ्या मैदानात नेहमीप्रमाणे […]

Read More

वीस महिन्यात अनेकदा अश्लिल मॅसेज ; जळगावातील १९ वर्षीय तरुणीची पोलिसांत धाव

जळगाव प्रतिनिधी >> शहरातील १९ वर्षीय तरुणीला अनोळखी नंबरावरून सतत अश्लील संदेश पाठविणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरुद्ध जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील गुजराल पेट्रोल पंपाच्या भागातील १९ वर्षीय तरुणी हि आपल्या आई व भावासोबत राहते. हि तरुणी शिक्षण घेत असून सध्याला लॉकडाऊन असल्याने घरीच अभ्यास सुरु आहे. या तरुणीकडे अँड्रॉइड फोनातील […]

Read More

जळगावात किरकोळ कारणावरून दांपत्यास केली मारहाण

जळगाव प्रतिनिधी >> घरात राहणारे भाडेकरू कुठे गेले आहे, अशी विचारणा करीत पाच जणांनी एका दांपत्यासह त्यांच्या नातेवाइकांना फायटर, दगडांनी मारहाण केली. ही घटना १८ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता रायपूर येथे घडली. भिमसिंग परदेशी (वय ४८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १८ रोजी रात्री ९ वाजता त्यांच्या घरी सचिन सोनार, शिला परदेशी, नीता रमेश परदेशी, सागर […]

Read More

खोडसाळपणा; पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणाने एटीएममध्ये धुराच्या अलार्मजवळ पेटती सिगारेट ओढली ; पुढे काय झाले ?

जळगाव प्रतिनिधी >> एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचे चक्क आतमध्ये सिगारेट ओढून धुराच्या अलार्मजवळ नेली. त्यामुळे एटीएम केंद्रात धूर झाल्यानंतर नागरिकांनी या तरुणास ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. पवन रवींद्र लोखंडे (वय २९, रा. गजानन कॉलनी) असे या तरुणाचे नाव आहे. पवन हा गुरुवारी दुपारी ३.३० वाजता गणेश कॉलनीतील एका एटीएम केंद्रात गेला होता. […]

Read More

जळगावात आकाशवाणी चौकातील महामार्गावर कारने घेतला पेट

जळगाव >> महामर्गावरील आकाशवाणी चौकात सिग्नलवर उभ्या कारने अचानक पेट घेतला. ही बाब वेळीच लक्षात आल्यामुळे कारमधील चौघे तात्काळ बाहेर निघाल्याने त्यांचे प्राण वाचले. ही घटना बुधवारी दुपारी २ वाजता घडली. दीपक अडकमोल असे कार मालकाचे नाव आहे. ते मुळचे कासोदा (ता. एरंडोल) येथील रहिवासी आहे. बुधवारी ते चार मित्रांसह कारने (क्रमांक जीजे-०५, सीएच-९४४९) भुसावळ […]

Read More

नवऱ्याने तोंडावर उशीने दाबून केला कांचनचा खून ; माहेरच्यांचा आरोप

जळगाव >> शहरातील कांचननगर परिसरातील रहिवासी प्रमोद शेटे या तरुणाची पत्नी कांचन शेटे (वाणी) हिच्या मृत्युनंतर प्रमोदने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्त्या केल्याने एकच खळबळ उडाली. पत्नी या जगात नसल्याने आपल्यालाही जगण्यात रस (इंट्रेस्ट) नाही, असे म्हणत त्याने तोंड न दाखवताच रेल्वेखाली स्वतःला झोकून दिले. दरम्यान, तिच्या तोंडावर उशीने दाबून कांचनचा खून करण्यात आल्याचा आरोप तिच्या […]

Read More

पिंप्राळ्यात मध्यरात्री दोन मोटारसायकली पेटवल्या

जळगाव ::> पिंप्राळा परिसरातील गणपतीनगरात घरासमोरील ओट्यावर लावलेल्या दोन मोटारसायकली अज्ञाताने पेटवून दिल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. राहुल गबरू पवार (वय २४) यांच्याकडे (क्रमांक एमपी-१२, एमव्ही-९२४२) आणि (क्रमांक एमपी-१२, एमएक्स-५३४९) क्रमांकाच्या दोन मोटारसायकली आहेत. मंगळवारी रात्री ११ वाजता जेवण करून सर्वजण झोपले. मध्यरात्री १.३० वाजता अज्ञाताने दोन्ही दुचाकी पेटवून दिल्या. घरासमोरील वॉचमन राधेश्याम पवार यांनी […]

Read More

जळगावात प्रेयसीसाठी पत्नीसह मुलांना काढले घराबाहेर ; सासू, पतीसह प्रेयसीवर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी ::> पत्नी, पत्नीचा संसार सुरळीत सुरू असताना त्याची दोघांमध्ये एन्ट्री झाली. पतीचे नातेवाईक म्हणून ती घरात वावरत होती. पत्नीला तिच्यावर संशय आला. मात्र, दोघांचे फोटो बघितल्यानंतर सत्यता पटली. प्रेयसीसाठी पतीने स्वत:च्या पत्नीसह मुलांना घराबाहेर हकलले. अखेर पती, पत्नी और वो चा वाद पोलिस ठाण्यात पोहोचला आणि सासू, पतीसह त्याच्या प्रेयसीविरुध्द तालुका पोलिस ठाण्यात […]

Read More

पोलिसांत एफआयआर दाखल झाल्यानंतर ३१ पीडितांना १८ लाखांचे अर्थसाहाय्य

जळगाव ::> जिल्ह्यात ऑगस्टअखेर अनुसूचित जातीचे २३ तर अनुसूचित जमातीचे १५ अशा एकूण ३८ गुन्ह्यांचा पोलिस तपास सुरू आहे. तपासावर त्यापैकी १४ गुन्ह्यांची निर्गती पोलिस विभागाने केली आहे. उर्वरित २४ व सप्टेंबपर्यंत दाखल झालेले ६ असे एकूण ३० गुन्ह्यांमध्ये पोलिस तपास सुरू आहे. त्याचबरोबर सप्टेंबरमध्ये ३१ पीडितांना एफआयआर दाखल झाल्यानंतर १८ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर […]

Read More

जळगावात माजी महापौर अशोक सपकाळेंच्या मुलाचा खून

जळगाव प्रतिनिधी ::> माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश (वय २८, रा. शिवाजीनगर) याचा अज्ञात तरुणांनी खून केल्याची घटना बुधवारी रात्री ११.३० वाजता शिवाजीनगरातील स्मशानभूमीजवळ घडली. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राकेश सपकाळे व त्याच्या लहान भावाचे काही दिवसांपूर्वी शनिपेठेतील तरुणांशी भांडण झाले होते. तेव्हापासून या दोन्ही गटात तणाव […]

Read More

जळगावात पोलिसांकडून अट्टल दुचाकीचोरास अटक; पाच चोरीचा गाड्या हस्तगत

जळगाव ::> शहरातील विविध भागातून दुचाकी चोरीस जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशात एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी एका अट्टल दुचाकीचोरास अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. भय्या उर्फ गोपाळ लुका बाविस्कर (वय ३२, रा. कन्हेरे, ता. अमळनेर) असे अटक केलेल्या दुचाकीचोराचे नाव आहे. १५ ऑक्टोबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीजवळून मोहसीन शाह सलिम […]

Read More

जळगावात तिघांकडून दोघांवर चाकूहल्ला ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी ::> जळगावातील नाथावडा परिसरात तीन जणांकडून दोघांना जबरदस्त मारहाण करत चाकू हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली असून एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाथावाडा परिसरातील गुरुवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास हिरामण एकनाथ जोशी या रिक्षाचालकास तीन जणांनी बेदम मारहाण केली. मिळालेल्या माहितीनुसार, नाथवाडा येथे कालभैरव […]

Read More