एकाच कुटुंबातील ५ जणांचा कोरोनाने घेतला बळी!

प्रतिनिधी सावदा >> येथील शिवाजी चौकातील रहिवासी परदेशी कुटुंबावर काळाने घाला घातला. या परिवारात यापूर्वी अवघ्या चार दिवसात चौघांचा मृत्यू झाला होता. हा दु:खाचा डोंगर कमी म्हणून की काय याच कुटुंबातील राजूसिंग परदेशी (वय ५९) यांनी ३१ मार्चला रात्री ११.३० वाजता जिल्हा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सात दिवसांत एकाच कुटुंबातील ५ जण दगावल्याने संपूर्ण शहर […]

Read More

सावदा शहर पुढील पाच दिवस बंद ? ही अफवा आहे की सत्य ? जाणून घेण्यासाठी बातमीवर क्लिक करा.

सावदा >> सावदा शहर पुढील ५ दिवस बंद असल्याबाबत सध्या अफवा पसवण्यात येत आहे. मात्र सावदा शहर बंद होण्याबाबत किंवा ठेवण्याबाबत मा जिल्हाधिकारी जळगाव तथा प्रमुख जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडून आदेश प्राप्त नाहीत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवा वर विश्वास ठेऊ नये असे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे. तसेच ज्या दुकानदार,फळ विक्रेते,भाजी विक्रेते,व इतर किरकोळ विक्रेते ,हॉस्पिटल्स, […]

Read More

सावदा येथील गुरांचा बाजार बंद, सुमारे ४० लाखांची उलाढाल ठप्प

सावदा >> येथे रविवारी भरणारा आठवडे बाजार तसेच गुरांचा बाजार रद्द करण्यात आला होता. मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी तीन दिवस आधी या संदर्भात शहरात दवंडी दिली होती. रविवारी या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी झाली. दोन्ही बाजार बंद असल्यामुळे सावद्यात आठवडे बाजारातून होणारी उलाढाल ठप्प होती. एकही शेतकरी आणि व्यापारी बाजारात हजर नव्हता. आठवडे बाजार तसेच गुरांच्या […]

Read More

सावद्यात पावणेसात लाखांचा प्रतिबंधित तंबाखूचा साठा जप्त

सावदा >> येथील सावदा–फैजपूर रोडवर सावदा पोलिसांनी शुक्रवारी सकाळी सापळा रचून, ट्रकमधील ६ लाख ७२ हजारांचा प्रतिबंधित तंबाखूचा साठा पकडला. ट्रकसह एकूण १० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी एका संशयिताला अटक केली तर दुसरा पसार झाला. गुप्त माहितीवरून शहरातील डायमंड तोल काट्यासमोर पोलिसांनी सापळा रचला होता. सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास या जागेवर ट्रक (क्र.एम.पी.०९ […]

Read More

रावेर-वाघोदा परिसरात बनावट दोनशेच्या नोटा आढळल्या

मोठा वाघोदा >> रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा, चिनावल, कोचूर, खिरोदा परिसरात शंभर व दोनशेच्या बनावटी नोटा चलनात आल्या आहेत. बाजारात गर्दीच्या ठिकाणी किंवा ग्राहकांची वर्दळ असलेल्या दुकानांवर या नोटा चालवण्यात आल्या आहेत, अशी माहिती संबंधित दुकानदारांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. हुबेहूब दिसणाऱ्या या नोटा गेल्या आठवडाभरात व्यवहारात आल्या आहेत. या बनावटी नकली नोटा चालवणाऱ्यांचे […]

Read More

रावेर तालुक्यातील ४८ ग्रा.पं.साठी३७ निवडणूक निर्णय अधिकारी

रावेर प्रतिनिधी >> राज्यात जाहीर झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांतर्गत रावेर तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी या प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. तालुक्यात ४८ ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ३७ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे तहसीलदार उषाराणी देवगुणे […]

Read More

चंपाषष्ठीदिनी होणारा सावद्यातील खंडेराव महाराज यात्रोत्सव रद्द

सावदा ता. रावेर प्रतिनिधी >> येथे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्ठीला होणारी खंडेराव महाराजांची यात्रा या वर्षी कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आली आहे. येथील जागृत देवस्थान खंडेराव महाराज मंदिर परिसरात दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या चंपाषष्ठीला मोठी यात्रा भरते. मात्र यंदा कोरोना महामारीचे संकट व आरोग्याच्या दृष्टीने येत्या २० डिसेंबर रोजी भरणारी यात्रा रद्द करण्यात येत असल्याचे भगत […]

Read More

भाजपचा रावेरला आजपासून दोन दिवसीय अभ्यास वर्ग

रावेर प्रतिनिधी >> रावेर लोकसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शनिवारपासून दोन दिवसीय अभ्यास वर्ग आयोजित करण्यात आला आहे. भाजपतर्फे येथील विवरा रस्त्यावरील मायक्रो व्हिजन शाळेच्या मागील हनुमान मंदिरात शनिवार व रविवार असा दोन दिवस हा वर्ग सुरू राहणार आहे. माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील, जिल्हाध्यक्ष […]

Read More

निंभोरा-विवरा रस्त्याची वर्षभरात अवस्था बिकट

निंभोरा प्रतिनिधी ::> येथील सबस्टेशन मार्गे असलेल्या विवरा रस्त्याच्या काही भागाची अतिशय दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. मागील वर्षी जिल्हा परिषदेमार्फत या रस्त्याचे काम झाले होते. मात्र, गुणवत्तेबाबत ओरड असल्याने अवघ्या वर्षभरात रस्त्यावरील खडी निघाली. आता रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. गावाच्या सुरुवातीला असलेल्या रस्त्यात पाणी साचत […]

Read More

मोठा वाघोदा येथे बसस्टँण्ड परीसर व चिनावल फाट्यावर गतीरोधक बसवण्याची कमलाकर माळी यांची मागणी

सावदा-वाघोदा प्रतिनिधी ::> बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर असलेल्या मोठे वाघोदा येथील बस स्थानक परीसर व चिनावल व निंभोरा फाट्यावर रावेर रोडवर गतीरोधक बसवण्यात यावा अशी मागणी वाघोदा येथील कमलाकर माळी यांनी केली आहे. हा संपूर्ण परीसर केळीसाठी प्रसिद्ध असल्यामुळे या महामार्गावर वाहनांची वर्दळ खुप असते. तसेच हा हायवे असल्याने वाहने सुसाट धावतात. या हायवेच्या दोन्ही बाजुने गाव […]

Read More

रावेर-खिरोद्यात मराठा समाजाचे आ.शिरीष चौधरींना निवेदन

रावेर प्रतिनिधी ::> मराठा आरक्षणावरील न्यायालयीन स्थगिती तत्काळ उठविण्याची मागणी सकल मराठा समाज रावेर तालुकाच्या वतीने आमदार शिरीष चौधरी यांना खिरोदा येथे जाऊन निवेदन देण्यात आले. मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरीम स्थगिती उठवावी. चालु आर्थिक वर्षांपासून समाजाच्या विद्यार्थ्यांना फी परतावा राज्य सरकारकडून मिळावा. राज्यात होणाऱ्या भरती तत्काळ थांबवाव्यात. आण्णसाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला १ हजार […]

Read More

शिवसेनेने रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी दिला आंदोलनाचा इशारा

सावदा प्रतिनिधी ::>शहरातून जाणाऱ्या महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर साईबाबा मंदिर, डॉ.अविनाश बऱ्‍हाटे याच्या दवाखान्याजवळ तसेच रावेर रोडवरील एलआयसी बिल्डींग समोर बऱ्‍हाणपूर ते अकलेश्वर या हायवे रोडवर काही महिन्यापासून ठिकठिकाणी मोठ खड्डे पडलेले आहेत. कित्येक महिन्यापासून स्थानिक लोक या महामार्गाच्या दुरुस्तीची मागणी करीत आहेत. तरीही याकडे दुर्लक्ष होत असल्याने आता शिवसेनेने रस्ता दुरुस्तीच्या […]

Read More

रावेर-यावल तालुक्यात आर्थिक फसवणूक झाल्यास सरळ पोलिस ठाण्यात तक्रार करा : नरेंद्र पिंगळे यांचे आवाहन

रावेर प्रतिनिधी ::> कोरोना महामारीमध्ये आधीच शेतकरी अडचणी असतांना व्यापाऱ्‍यांनी शेतकऱ्ंयाची आर्थिक फसवणूक करू नये, तथापि फसवणूक झाल्यास सरळ संबधित पोलिस स्थानकात तक्रार देण्याचे अवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी रावेर व यावल तालुक्यातील शेतकऱ्‍यांना केले आहे. रावेर व यावल तालुक्यात शेतकऱ्‍यांकडून केळी किंवा शेतीवर आधारीत इतर पिके घेण्यासाठी बाहेर तालुक्यातून व्यापारी येऊन संबधित […]

Read More

सावद्यातील जखमी महिलेस आमदारांनी दिली मदत

सावदा : >> येथील शनीनगर परिसरात घराची भिंत कोसळून आशाबाई अरुण कुंभार ही निराधार महिला जखमी झाली. ही माहिती कळताच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी महिलेस ५ हजार रुपयांची मदत दिली. भिंत कोसळून आशाबाई त्याखाली दाबल्या गेल्या. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. ही माहिती आमदार पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमी आशाबाई यांची विचारपूस व […]

Read More

रावेर-यावल-चोपडा केळी उत्पादकांची व्यथा ; भाव आहे तर माल नाही!

रावेर : जळगाव, रावेर ,यावल चोपडा या भागातील केळी मागणी व्यापारीकडून वाढली आहे. मात्र जुनारी व पिल बागांमध्ये मध्ये केळी माल अल्प प्रमाणात आहे. चोपडा भागात माल आहे, तरीही पाहिजे तसा माल नाही. सद्यस्थितीत केळीला बऱ्या पैकी मागणी आहे. मात्र, केळी बागांमध्ये पाहिजे तेवढा माल नाही दरसाल प्रमाणे या ही वर्षी भाव आहे तर माल […]

Read More

🚨सावधानतेचा इशारा : हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडले !

जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पातुन 44821 क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडला आहे. पाणलोट क्षेत्रातील संततधार पावसामुळे पाणी पातळीत सतत वाढ होणार असल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. जिल्ह्यातील हतनूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सध्या धरणाचे 36 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहे. सध्या धरणातून तापी नदीपात्रात १ लाख २१ हजार ४३० […]

Read More

सावद्यातील खून प्रकरणी ३ संशयितांना पोलिसांनी केली अटक

सावदा >> येथे मस्कावद रस्त्या लगत असलेल्या ख्वाजा नगर परिसरात शनिमंदिर जवळ दि २० ऑगस्ट रोजी सायंकाळी एका ५० वर्षीय व्यक्तीचा डोक्यात वार करून निर्घुण खून केल्याची घटना घडली यात तपास करीत तीन संशयित युवक राजू शाह दाऊद शाह,अजहर खान अयूब खान, शाहरुख खान कलीम खान याना ताब्यात घेण्यात आले आहे. येथील ख्वाजा नगर परिसरातील […]

Read More

रावेर तालुक्यातील सावदयात भर दिवसा एकाचा निर्घृण खून

सावदा प्रतिनिधी >> शहरात भर दिवसा एका प्रौढ व्यक्तीचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावदा येथील ख्वाजा नगर परिसरात आज सायंकाळी तिघा अज्ञात इसमांनी रईस दिलदार चौधरी उर्फ रईस दंगा (५०) या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला चढवून त्याचा खून केल्याची घटना घडली. सावद्यात भर दिवसा खून झाल्याची बातमी […]

Read More

सावद्यात 15 कोरोना अहवाल पॉझिटिव्ह तर एकाच घरात 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ ; रुग्णांची संख्या ३६ वर!

प्रतिनिधी >> सावदा येथील एका ट्रान्सपोर्ट मालकाच्या भाऊ कोरोनाबाधित आढळला होता. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेवून ट्रान्सपोर्ट वरती क्वारंटाईन करण्यात आले होते. आज त्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी एकाच कुटंबातील 4 अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहे. त्यात 3 महिला व 1 पुरुषाचा समावेश आहेत. त्यातील महिलांचे वय 35,37,20 व पुरुषाचे वय 25 वर्षीय […]

Read More

अहवाल येण्यापूर्वीच रुग्णालयातून पलायन, सावद्यात गुन्हा दाखल

सावदा प्रतिनिधी : > येथील एक रुग्ण जळगाव येथील कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता. त्याचा स्वॅब नमुन्यांचा अहवाल येण्यापूर्वीच या रुग्णाने दवाखान्यातून पळ काढला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती. या रुग्णाला पुन्हा जळगावला हलवण्यात आले. मात्र, या प्रकरणी पालिकेचे कर्मचारी अविनाश गवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रुग्णाविरोधात कलम १८८, २६९, २७० व आपत्तीव्यवस्थापन […]

Read More