मनसेच्या जनहित कक्ष जिल्हाध्यक्षपदी यावल येथील चेतन अढळकर यांची निवड

यावल >> मनसेच्या रावेर लोकसभा मतदार संघाच्या जनहित कक्ष जिल्हाध्यक्षपदी यावल येथील चेतन अढळकर यांची नियुक्ती झाली. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसे जनहित कक्ष व विधी राज्याध्यक्ष अॅड.किशोर शिंदे यांच्या हस्ते अढळकर यांना नियुक्तिपत्र देण्यात आले.

Read More

प्रत्येक ग्रामपंचायतला भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिक, युवा सैनिकांनी सज्ज रहावे : गुलाबराव पाटील

धरणगाव >> आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींमधील अधिकाधिक जागा जिंकून भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिक व युवा सैनिकांनी सज्ज रहावे. तर अधिकाधिक ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जागृत राहावे, असे आवाहन शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांनी केले. येथील जी. एस. लॉन येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. धरणगाव तालुक्यातील ७० ग्राम पंचायतींपैकी तब्बल ४७ ग्रामपंचायतीत सार्वत्रिक […]

Read More

कारचालकाला मारहाण करत ३ लाख २९ हजार लुटले ; गुन्हा दाखल

पाचोरा प्रतिनिधी >> कट मारुन पुढे जाणाऱ्या मालवाहू रिक्षाचालकास जाब विचारण्यासाठी कार चालकाने थांबवले. मात्र, रिक्षा चालकाने उलट त्यांनाच मारहाण करुन जवळपास ३ लाख २९ हजारांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना रविवारी रात्री बिल्दी फाट्याजवळ घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील बाळद येथील मूळ रहिवासी व हल्ली जळगावातील खोटे नगरमध्ये राहणारे […]

Read More

भुसावळ-फैजपूर रस्त्यावर अपघात ; एक जण ठार

यावल >> तालुक्यातील भुसावळ-फैजपूर रस्त्यावर भोरटेकजवळ दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ४४ वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात रविवारी सांयकाळी घडला. विकास धनसिंग पाटील-जाधव (रा. जळगाव) असे मृताचे नाव आहे. रविवारी पाटील हे पाडळसे येथे नातेवाइकांकडे आले होते. सायंकाळी ७.३० वाजता ते पाडळसेहून दुचाकीने (एमएच. १९ एसी.१४४३) जळगावला जाण्यासाठी निघाले. भोरटेक फाट्याजवळ अज्ञात वाहनाने […]

Read More

भारतीय जनता युवा मोर्चाची धरणगावात कार्यकारिणी जाहीर

धरणगाव प्रतिनिधी >> धरणगाव शहर भाजप युवा मोर्चा कार्यकारिणी नुकतीच जाहिर करण्यात आली. यात भारतीय युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी भूषण शरद कंखरे यांची निवड करण्यात आली. भाजयुमोचे शहराध्यक्ष भूषण धनगर यांनी ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पी. सी. पाटील, शिरीष बयस, चंद्रशेखर अत्तरदे, अॅड. संजय महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, शेखर पाटील, प्रकाश सोनवणे, पुनिलाल महाजन, […]

Read More

अल्पवयीन मुलीवर नराधम बापाने केला अत्याचार, मुलगी सहा महिन्यांची गरोदर ; गुन्हा दाखल

पारोळा प्रतिनिधी >> व्यसनाधीन बापाने आपल्या स्वत:च्या मुलीवर धमकी देत अत्याचार केला. यामुळे मुलगी सहा महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून कन्हेरे येथील नराधम बापावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कन्हेरे येथील हा नराधम पिता आपली पत्नी, १ मुलगा व मुलीसह राहतो. सहा महिन्यांपूर्वी शालकाचे लग्न असल्याने त्याची पत्नी […]

Read More

पीक विमा कंपनीचा निष्काळजीपणा, सहा गावांतील १५ शेतकऱ्यांना फटका

रावेर >> हवामानावर आधारित केळी पीक विमा घेतला असतानाही झालेल्या नुकसानीपोटी पीक विमा कंपनीच्या निष्काळजीपणामुळे तालुक्यातील ६ गावातील १५ शेतकऱ्यांना लाभ मिळाला नसल्याची तक्रार या शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्हा कृषी अधीक्षक अधिकाऱ्यांनी याची दाखल घ्यावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. हवामानावर आधारित केळी फळ पीक विमा घेण्यासाठी गत वर्षी खानापूर, अटवाडा, अजनाड, निरूळ, चोरवड […]

Read More

एक दिवसाच्या अर्भकाला शेतात टाकून महिला पसार ; यावल तालुक्यातील घटना

किनगाव प्रतिनिधी >> यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात जळगाव -धानोरा रस्त्यावर अज्ञात महिलेने एक दिवसाचे पुरूष जातीचे अर्भक रस्त्याच्या कडेला शेतात टाकून दिल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. मजुरांच्या सतर्कतेमुळे या बाळाला यावल ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथून अर्भकाला जळगावला नेले आहे. रविवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास डांभुर्णी शिवारात नितीन फालक यांच्या गट क्रमांक ७८५ मधील […]

Read More

बोदवडला अंगणातून मोटारसायकल लंपास, चोरट्याविरुद्ध गुन्हा

बोदवड प्रतिनिधी >> शहरातील मन्यार वाड्यातील मोहम्मद आसिफ शेख मेहबूब यांच्या मालकीची काळ्या रंगाची मोटारसायकल अंगणातून चोरट्यांनी लंपास केली. बुधवारी सकाळी ही बाब समोर आली. मंगळवारी मोहम्मद आसिफ यांनी कामावरून आल्यावर ४० हजार रुपये किमतीची मोटारसायकल आपल्या राहत्या घरासमोर अंगणात उभी केली. रात्री ९.३० वाजता गाडी अंगणातच लागलेली होती. पण बुधवारी सकाळी ६.३० वाजता उठल्यावर […]

Read More

रावेर-वाघोदा परिसरात बनावट दोनशेच्या नोटा आढळल्या

मोठा वाघोदा >> रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा, चिनावल, कोचूर, खिरोदा परिसरात शंभर व दोनशेच्या बनावटी नोटा चलनात आल्या आहेत. बाजारात गर्दीच्या ठिकाणी किंवा ग्राहकांची वर्दळ असलेल्या दुकानांवर या नोटा चालवण्यात आल्या आहेत, अशी माहिती संबंधित दुकानदारांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. हुबेहूब दिसणाऱ्या या नोटा गेल्या आठवडाभरात व्यवहारात आल्या आहेत. या बनावटी नकली नोटा चालवणाऱ्यांचे […]

Read More

भाजपचे उपमहापौर खडकेंनी घेतली एकनाथ खडसेंची भेट

जळगाव >> भाजप सोडून राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये दाखल झालेले एकनाथ खडसेंची भाजपचे उपमहापौर सुनील खडके यांनी शुक्रवारी दुपारी भेट घेतली. धावत्या भेटीत काही मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली. खडसेंचे कट्टर समर्थक अशी ओळख असल्याने दोघांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दरम्यान, उपमहापौर खडके यांनी ही भेट औपचारीक होती. त्यात कुठलाही राजकीय उद्देश नव्हता, असे स्पष्ट केले […]

Read More

जिल्ह्यात भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅचवर लाखोंचा सट्टा

जळगाव प्रतिनिधी >> शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सट्ट्याचा व्यवसाय तेजीत आहे. सध्या भारत व ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या कसोटी क्रिकेटवर देखील लाखो रुपयांचा ऑनलाइन सट्टा लावला जात आहे. या प्रकारात सट्टा लावणाऱ्याने जितके पैसे लावले तितकेच पैसे त्याला जिंकल्यावर मिळतात. सामन्यातील प्रत्येक चौकार, गोलंदाज आणि फलंदाज यांची कामगिरी अशा बाबींवर सट्टा घेतला जातो. ५० हजारांपासून पुढील […]

Read More

रावेर तालुक्यात १२ वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य ; गुन्हा दाखल

रावेर प्रतिनिधी >> वडगाव ता. रावेर येथील एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर तालुक्यातील कांडवेल शिवारातील शेतात मोकळ्या जागेवर १२ वर्षीय मुलाला पैश्यांचे आमिष दाखवत संशयित आरोपी गबा उर्फ प्रेमलाल धुडकू भालेराव (वय-२३) रा. कोळोदे ता. रावेर याने […]

Read More

बोदवडच्या तहसिलदारसह मंडलाधिकारी-तलाठी लाच प्रकरणी एसीबीच्या जाळ्यात

बोदवड प्रतिनिधी >> बोदवड तहसील कार्यालयात महिलेच्या नावावर शेती करुन देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागणारे येथील तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी या तिघांना एसीबीच्या पथकाने दोन लाख रुपयांच्या लाच प्रकरणी ताब्यात घेतल्याने खडबड उडाली आहे. बोदवड शहरातील तहसील कार्यालयात शुक्रवारी दुपारच्या वेळी तहसीलदार हेमंत पाटील, तलाठी निरज पाटील व मंडलाधिकारी संजय शिरसाठ अशी एसीबी […]

Read More

बेरोजगारीच्या नैराश्यातून २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या

अमळनेर प्रतिनिधी>> बेरोजगारीच्या नैराश्यातून भिलाली ता.अमळनेर येथील २५ वर्षीय तरुणाने गुरुवारी (दि.१७) राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. दुपारी १ वाजता हा प्रकार उघडकीस आला. अनिल शांताराम माळी असे मृताचे नाव आहे. नाशिक येथे गेलेला अनिल माळी हा पाच-सहा वर्षांपासून खासगी नोकरी करत होता. मात्र, कोरोनामुळे या नोकरीवर देखील टाच आल्याने त्याला घरचा रस्ता धरावा […]

Read More

यावल तालुक्यात ग्रामीण भागात एसटी बस सेवा सुरु करण्याची मागणी

यावल प्रतिनिधी >> जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्वात जास्त उत्पन्न यावल आगार नेहमी देत असतो. लॉकडाऊन जाहीर झाल्याने एसटी बससेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. परंतु, आता जिल्ह्यासह राज्यातील बससेवा सुरळीत झालेली असतांना यावल आगारातून ग्रामीण भागातील बससेवा अद्यापही सुरु करण्यात आली नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून प्रभारी आगर व्यवस्थापकांनी ग्रामीण भागातील बससेवा पूर्ववत सुरु करावी […]

Read More

यावल-निमगाव शिवारात बिबट्या आढळल्याने खळबळ ; सावधानता राखण्याची गरज

यावल प्रतिनिधी >> तालुक्यातील निमगाव शिवारात गुरूवारी पहाटे बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिवारात पाहणी करून बिबट्याच्या पायांचे ठसे घेतले. शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी, अशी सूचना देण्यात आली आहे. निमगाव येथील शेतकरी अरुण जुलालसिंग पाटील यांच्या शेतात गुरूवारी पहाटे बिबट्या दिसला. या बाबत तात्काळ यावल प्रादेशिक वनविभागास माहिती देण्यात […]

Read More

यावलात घराबाहेर उभी असलेली दुचाकीची चोरी, गुन्हा दाखल

यावल >> येथील देशमुख वाड्यातून दुचाकी चोरीला गेल्याने खळबळ उडाली असून मंगळवारी रात्री घडलेली ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी येथील पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशमुख वाड्यातील महादेव मंदिराजवळील रहिवासी रोशन सुभाष चौधरी यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. त्या नुसार त्यांची दुचाकी (क्र. एमएच १९ डीएच ९७०५) मंगळवारी रात्री […]

Read More

चोपडा नगरपरिषद पाणीपुरवठा विभागातील १९-२० ची बिलांची माहिती देण्‍यास लेखापाल व मुख्याधिकाऱ्यांची टाळाटाळ

चोपडा राजेंद्र पाटील प्रतिनिधी >> महेश पवार गटनेता शिवसेना व नगरसेविका चोपडा नगरपरिषद यांनी पाणीपुरवठा विभागातील सन २०१९-२० या वर्षात झालेल्‍या आवस्‍ताव खर्चाबाबत लेखाविभागात माहिती मागितली आहे. पाणी पुरवठा विभागात मागील वर्षात पाईपलाईन रिपेअरि, ट्युबवेल दुरुस्‍ती, रसायने खरेदी, पाणीपुरवठा देखभाल खर्च, वृक्षारोपण व देखभाल या हेड अंतर्गत सन २०१८-१९ मध्‍ये सुमारे ७५.५५ लाख खर्च झाला […]

Read More

घरात घुसून विवाहितेसोबत अंगलट ; चार जणांवर गुन्हा दाखल

अमळनेर >> पाच वर्षांपूर्वीच्या ओळखीचा गैरफायदा घेत चौघांनी घरात अनधिकृत प्रवेश केला. एकाने विवाहितेचा विनयभंग करून अश्लील शिवीगाळ केल्याची घटना १५ डिसेंबरला दुपारी ४ वाजता वर्धमान नगरात घडली. भालेराव नगरातील संदीप धनराज पाटील याने तीन मित्रांसह घरात अनधिकृत प्रवेश केला. विवाहितेसोबत लगट करून शिवीगाळ केली. महिलेने आरडाओरड करताच चौघे पळून गेले. चौघांविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल […]

Read More