जामनेर तालुक्यात तलवार-चाकू हल्ला ; दोन जण गंभीर जखमी

जामनेर प्रतिनिधी >> तालुक्यातील देवपिंप्री ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारावरून गुरूवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास वाद उद्भवला. यातून तलवार व चाकूहल्ला झाला असून दोन जण जखमी झाले. यात परस्परांविरुद्ध तक्रारी दाखल झाल्या आहेत. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मतदानाच्या पूर्वसंध्येला झालेल्या प्रकारामुळे निवडणुकीला गालबोट लागले. एका गटातर्फे भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तुकाराम निकम यांच्यासह सहकाऱ्यांविरूध्द जामनेर पोलिस […]

Read More

राष्ट्रवादीच्या नेत्याकडून राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांचा एकेरी उल्लेख करत जोरदार टीका

जळगाव प्रतिनिधी >> ‘तर मी सीडी लावेन’ असे जाहीर आव्हान भाजप नेत्यांना एकनाथ खडसे यांनी ज्या प्रफुल्ल लोढा यांच्या भरवशावर दिले होते त्या लोढा यांनीच अशी काही सीडी आपल्याकडे नाही, असे आज पत्रकारांसमोर जाहीर केले. या सीडीसाठी खडसे यांनी गृहमंत्र्यांमार्फत पोलिसांवर दबाव आणून आपल्या मित्राच्या आणि भावाच्या घराची ‘झडती’ घ्यायला लावली असून या प्रकरणी आपण […]

Read More

जामनेरचे माजी नगराध्यक्ष ललवाणी यांच्या कारनाम्यांची आमच्याकडे सीडी!

जामनेर येथे भाजपचे पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर, थेट पुरावे देण्याचे आव्हान जामनेर प्रतिनिधी >> माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी रविवारी (दि.२०) पत्रकार परिषदेत सीडी व पेनड्राइव्ह दाखवला. त्यात काय रहस्य दडले आहे? ते योग्य वेळी दाखवून देऊ असे वक्तव्य करत आमदार गिरीश महाजन यांच्यावर आरोपांची राळ उठवली होती. भाजपने मंगळवारी पत्रकार परिषद घेत ललवाणी यांच्या आरोपांचे […]

Read More

२२ वर्षीय डॉक्टर तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

पहूर ता. जामनेर प्रतिनिधी >> डॉक्टर असलेल्या २२ वर्षीय तरुणीने येथील संतोषी माता नगरातील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. संतोषी माता नगरातील रहिवासी शाम नामदेव सावळे यांची मुलगी प्रतिभा शाम सावळे ( वय २२) हिने दुपारी घरी कुणीही नसताना गळफास घेतला. १५ डिसेंबरला दुपारी ३ वाजेच्या सुमारास हा प्रकार […]

Read More

भुसावळचे भाजप आ. संजय सावकारे पुन्हा राष्ट्रवादीत परतण्याचे संकेत ; वाढदिवसाच्या बॅनरबाजीतून गिरीश महाजनांचा फोटो गायब

भुसावळ >> भुसावळ मतदार संघातील आमदार संजय सावकारे यांचा आज वाढदिवस असल्याने भुसावळ सह जिल्ह्यात जाहिरात, पोस्टर झळकली आहेत. मात्र या पोस्टर मध्ये माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांचा एकाही बॅनर मध्ये फोटो नसल्याने राजकीय वर्तुळासह जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने अनेक […]

Read More

मौलवीने महिलेला संमोहित करत अश्लील व्हिडीओ बनवून, दमदाटी देत धर्मपरिवर्तन करून केला निकाह; गुन्हा दाखल

जामनेर प्रतिनिधी >> अश्लिल व्हिडीओ दाखवून धर्मांतर करून निकाह केला, अशी तक्रार एका महिलेने केल्याने नेरी परिसरात खळबळ उडाली. या महिलेच्या तक्रारीवरून पती विरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला. संशयित पसार आहे. अल्ताफ मेहमूद मणियार हा नेरी (ता.जामनेर) येथील मूळ रहिवासी तरूण सन २०१७ पासून मालेगाव येथे वास्तव्यास गेला आहे. तेथे एका विवाहित महिलेशी त्याचे सूत […]

Read More

जिल्ह्यात महिलेच धर्मांतरण : लग्न आणि वासनेचा मांडला बाजार ; काळ्या जादूवाल्या मौलवी बाबाची काली करतूत उघड!

जळगाव प्रतिनिधी >> जामनेर तालुक्यातील नेरी दिगर येथील एका कथित मौलवीने बेशुद्ध अवस्थेत बनविलेल्या अश्लील व्हिडीओचा धाक दाखवून धर्मपरिवर्तन करून केलेल्या लग्नाची थरारक कहाणी. तसेच या बाबाच्या वासनांध कृत्यांची आपबितीची व्यथा एका महिलेने पोलिसांत दिली आहे. धक्कादायक म्हणजे गुन्हा दाखल होऊन एक महिना झाल्यानंतर देखील कुठलीही कारवाई होत नसल्याचा आरोपही पिडीतने केला आहे. या कथित […]

Read More

कृषी कायद्यांच्या विरोधात वाकोद येथे रस्ता रोको आंदोलन

वाकोद ता.जामनेर >>केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात 8 डिसेंबर रोजी देशातील शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती.त्याला प्रतिसाद म्हणून राज्यातील शेतकरी संघटना तसेच महाविकास आघाडी सरकार मधील,काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना,प्रहार या घटक पक्षांच्या वतीनेही भारत बंद पाळला गेला. वाकोद येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते,शेतकरी व सुशिक्षित तरुणांनी कृषी कायद्यांना विरोध म्हणून रास्ता रोको आंदोलन केले.तसेच हे […]

Read More

शेतीच्या बांधावरून वाद झाल्याने शेतकऱ्यास बेदम मारहाण ; ५ जणांविरूद्ध गुन्हा

जामनेर प्रतिनिधी >> तालुक्यातील पळासखेडा मिराचे येथे शेतकऱ्यास बेदम मारहाण प्रकरणी ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शेताचा रस्ता नांगण्याच्या कारणावरून हा वाद झाल्याचे समोर आले. फिर्यादी भागवत दगडू घुगे हे हरभरा पेरणीसाठी आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टरने मशागत करत होते. यावेळी तेथे आलेले संशयित ज्ञानेश्वर कडूबा पाटील, भगवान किसन राजपूत,भरत किसन राजपूत, भीका रामदास राजपूत, भीमराव […]

Read More

मनसेनेचा चिलगाव येथील सभा मंडप परिसरातील अतिक्रमण विरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा

जामनेर भुषण मनोहर जाधव – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चिलगाव येथील सभा मंडप परिसरातील अतिक्रमण काढणे व गाव स्वछता मुक्त व दुर्गंधीमुक्त करणे बाबत आजरोजी प स गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर केले असता या निवेदनात चिलगाव या गावात नुकतेच ग्रा प च्या मालकीच्या जागेत सभा मंडप बांधण्यात येत आहे सदरील सभा मंडप ची जागा च […]

Read More

मनसे विद्यार्थी सेनेचे जामनेर महाविद्यालयास परीक्षा शुल्क व प्रवेश शुल्क माफ करणे बाबत निवेदन

भुषण मनोहर जाधव, जामनेर >> येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात BCA व इतर शाखेतील मुलांच्या बॅक राहिलेल्या मुलांची परीक्षा शुल्क घेऊन देखील परीक्षा न घेतल्याने ते शुल्क परत करणे व प्रवेश फी माफ करणे या बाबत मनविसे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील व तालुकाध्यक्ष किशोर पाटील यांनी नुकतेच प्राचार्य शिरीष पाटील यांना निवेदन दिले. महाविद्यालयात जे […]

Read More

जळगावच्या सेल्समनच्या बॅगेतून ९८ हजार लंपास ; जामनेर-बोदवड बसमधील घटना

बोदवड प्रतिनिधी >> बसमधून प्रवास करणाऱ्या जळगाव येथील सेल्समनच्या बॅगेतून ९८ हजार रुपये लंपास केल्याची घटना शुक्रवारी जामनेर-बोदवड प्रवासादरम्यान घडली. येथे हा प्रकार लक्षात आल्यानंतर येथील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव येथील सुनील ललवाणी हे कापडाचे सेल्समन असून ते २० वर्षांपासून गोधडीवाला टेक्सटाइल जळगाव येथे मार्केटिंग सेल्समनचे काम करतात. ते नेहमी कापड दुकानदारांकडे साडीची […]

Read More

महाविकास आघाडीने जनतेचा भ्रमनिरास केला : आ.गिरीश महाजन

जामनेर >> राज्यातील तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेचा वर्षभरातच पुरता भ्रमनिरास केल्याची टीका आमदार गिरीश महाजन यांनी केली. जामनेर येथे मका व ज्वारी खरेदी केंद्राचा शुभारंभ करताना ते बोलत होते. पाचोरा रस्त्यावरील कोठारी बंधूंच्या गोदाम परिसरात हे केंद्र सुरू झाले. आमदार महाजन म्हणाले की, राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. अतिवृष्टीने […]

Read More

शाळेतील स्कूलबस चालकासोबत पळून गेलेल्या शिक्षिकेला पोलिसांनी काढले हुडकून

जामनेर प्रतिनिधी ::> शाळेत शिक्षिका असलेली महिला शाळेतील स्कूलबस चालकासोबत पळून गेली होती. या महिलेचे अपहरण करून तिचा खून केल्याची फिर्याद कुटुंबीयांनी दिली होती. दरम्यान, १४ महिन्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या महिलेस बुधवारी पुणे येथून हुडकून काढले. जामनेर तालुक्यातील इंग्रजी माध्यमातील शाळेतील २८ वर्षीय शिक्षिका २३ सप्टेंबर २०१९ रोजी बेपत्ता झाली होती. याच दिवसांपासून […]

Read More

प्रहार जनशक्ती पक्षाचे जामनेर तालुकाध्यक्ष यांच्याशी गैरवर्तणूक केल्याबाबत मयूर पाटील यांचे तहसीलदार यांना निवेदन

जामनेर ,भुषण जाधव – दि 3 नोव्हेंबर रोजी प्रहार चे युवा तालुकाध्यक्ष मयूर पाटील यांनी जामनेर तालुका कृषी अधिकारी यांच्या कडे कोरडवाहू विकास प्रकल्प कोदोली अंतर्गत या विषयाची माहिती माहीतीच्या अधिकारात रितसर मागितली असता दि.3 नोव्हेंबर रोजी तालुका कृषी अधिकारी यांच्या दालनात अपिलीस बोलवण्यात आले असता तालुका कृषी अधिकारी यांच्या समोर कृषी सहायक कोदोली यांना […]

Read More

जामनेरच्या चालकाची बेरोजगारीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या

जामनेर प्रतिनिधी ::> लॉकडाऊनपासून बेरोजगार झालेल्या जामनेरातील संतोष विश्वनाथ पवार (वय ४३) यांनी सोमवारी पहाटे खादगाव रोडवरील झाडाला गळफास घेतला. एका खासगी वाहनावर चालक असलेल्या संतोष पवार यांना लॉकडाऊनच्या काळात घरी बसावे लागले. काही दिवस रिक्षा चालवून त्यांनी उदरनिर्वाहाचा प्रयत्न केला. त्यात यश न आल्याने त्यांना नैराश्य आले. परिवाराची होणारी दैना पाहू न शकल्याने ते […]

Read More

अश्लील फोटो व्हायरलची धमकी देत जामनेरच्या तरुणीस ब्लॅकमेल

रिड जळगाव प्रतिनिधी ::> जामनेर येथील तरूणीला आपल्या जाळ्यात ओढत तिचे अश्लील फोटो मिळविले. त्याच फोटोंच्या आधारे शुभम बोरसे याने तरूणीला ब्लॅकमेल केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. तरूणीने दिलेल्या तक्रारीवरून तरुणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मिळालेल्या माहितीनुसार, एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका तरूणीची शुभम कैलास बोरसे या […]

Read More

भाजप पदाधिकाऱ्याचे घर फोडले ; १५ लाखांची चोरी

पहूर प्रतिनिधी ::> भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीचे जामनेर तालुकाध्यक्ष तथा पहूर पेठ येथील खाजानगरातील रहिवासी सलीम शेख गनी यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी गुरुवारी (दि.८) रात्री कपाटातील तब्बल १५ लाखांची रोकड लांबवली. जमिनीचा व्यवहार केल्यानंतर त्यांना ही रक्कम प्राप्त झाली होती. तसेच रविवारी मुलाचे लग्न असल्याने घरी ये-जा वाढली होती. त्यातच ही चोरी झाली. सलीम शेख […]

Read More

जामनेरातील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णाचा मृतदेह रात्रभर होता बेडवर पडून

जामनेर :: > जामनेर उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णाचा मृतदेह रात्रभर वॉर्डातच बेडवर पडून होता. मृतदेहाला दुर्गंध सुटल्याने इतर रुग्णांना रात्र जागून काढावी लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी रुग्णांनी संताप व्यक्त केल्यानंतर मृतदेह शवगृहात हलवण्यात आला. हा प्रकार तीन दिवसांपूर्वी घडला आहे. रुग्णालय प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. जामनेर तालुक्यातील सामरोद येथील बाधित व्यक्तीवर […]

Read More

पोलिस कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य : डॉ. प्रवीण मुंडे

पहूर प्रतिनिधी ::> जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी बुधवारी पहूर पोलिस ठाण्याला भेट दिली. अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवणे आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस अधीक्षक डॉ.मुंडे यांनी पहूर पोलिस ठाण्याची पाहणी करून प्रभारी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. रविवारी पहूर येथील कृषी व्यापाऱ्यास लुटले होते, या गुन्ह्याची माहिती घेतली. यानंतर अवैध व्यवसाय […]

Read More