फैजपूर-यावल रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तडस ठार

फैजपूर प्रतिनिधी >> रस्ता ओलांडणाऱ्या तडसाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. फैजपूर ते यावल रस्त्यावर हंबर्डी गावाजवळ ही घटना घडली. गुरुवारी सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी वन प्रेमी अनिल नारखेडे यांना दूरध्वनीद्वारे याबाबत माहिती दिली. तर अजय पाटील, हंबर्डी यांनी यावल वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांना कळवले. घटनास्थळी अनिल नारखेडे व वन […]

Read More

सावद्यात पावणेसात लाखांचा प्रतिबंधित तंबाखूचा साठा जप्त

सावदा >> येथील सावदा–फैजपूर रोडवर सावदा पोलिसांनी शुक्रवारी सकाळी सापळा रचून, ट्रकमधील ६ लाख ७२ हजारांचा प्रतिबंधित तंबाखूचा साठा पकडला. ट्रकसह एकूण १० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी एका संशयिताला अटक केली तर दुसरा पसार झाला. गुप्त माहितीवरून शहरातील डायमंड तोल काट्यासमोर पोलिसांनी सापळा रचला होता. सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास या जागेवर ट्रक (क्र.एम.पी.०९ […]

Read More

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी घेतली आढावा बैठक

यावल, प्रतिनिधी >> तालुक्यातील ग्राम पंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर झाल्यापासुन निवडणुक लढविण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जोळणीसाठी तहसील कार्यालयात नागरीकांनी एकच गर्दी केली असल्याने तहसील कार्यालयास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यावल तालुक्यातील या निवडणुकीसाठी नेमणुक करण्यात आलेल्या निवडणुकी निर्णय अधिकारी यांची एक निवडणुक प्रक्रिया संदर्भातील महत्वपुर्ण […]

Read More

भुसावळ-फैजपूर रस्त्यावर अपघात ; एक जण ठार

यावल >> तालुक्यातील भुसावळ-फैजपूर रस्त्यावर भोरटेकजवळ दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ४४ वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात रविवारी सांयकाळी घडला. विकास धनसिंग पाटील-जाधव (रा. जळगाव) असे मृताचे नाव आहे. रविवारी पाटील हे पाडळसे येथे नातेवाइकांकडे आले होते. सायंकाळी ७.३० वाजता ते पाडळसेहून दुचाकीने (एमएच. १९ एसी.१४४३) जळगावला जाण्यासाठी निघाले. भोरटेक फाट्याजवळ अज्ञात वाहनाने […]

Read More

चंपाषष्ठीदिनी होणारा सावद्यातील खंडेराव महाराज यात्रोत्सव रद्द

सावदा ता. रावेर प्रतिनिधी >> येथे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्ठीला होणारी खंडेराव महाराजांची यात्रा या वर्षी कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आली आहे. येथील जागृत देवस्थान खंडेराव महाराज मंदिर परिसरात दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या चंपाषष्ठीला मोठी यात्रा भरते. मात्र यंदा कोरोना महामारीचे संकट व आरोग्याच्या दृष्टीने येत्या २० डिसेंबर रोजी भरणारी यात्रा रद्द करण्यात येत असल्याचे भगत […]

Read More

फैजपूर शहरात साडेसात लाखांचा गुटखा पकडला

फैजपूर >> घराच्या मागे हिरव्या नेटच्या जाळीचा आडोसा तयार करून लपवलेला ७ लाख ६८ हजार ७६८ रुपयांचा गुटखा जळगावच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने पकडला. फैजपूर येथील मिल्लतनगरात ९ डिसेंबरला सायंकाळी ही कारवाई केली. यानंतर आरोपी शेख मोहसीन शेख युनूस उर्फ कल्लू पसार झाला. बुधवारी सायंकाळी मिल्लत नगर भागात मराठी शाळेच्या मागे शेख मोहसीन शेख […]

Read More

आदिवासी भागातील रस्त्याची दुरुस्ती करा : प्रांताधिकाऱ्यांना निवेदन; आंदोलनाचा इशारा

फैजपूर प्रतिनिधी ::> आदिवासी भागातील बोरखेडा ते तिळया, अंधारमळी व मोहमांडली रस्त्याची पार दुर्दशा झाली असून रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. रस्ते सुधारण्याच्या मागणीसाठी आदिवासी एकता मंचातर्फे येथे प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन देण्यात आले. बोरखेडा ते तिळया, अंधारमळी व मोहमांडली ह्या रस्त्यांची पुरती दैना उडाली आहे. या तिन्ही गावांमध्ये सर्वत्र आदिवासी बांधवांचा रहिवास आहे. दवाखाने, बाजार, […]

Read More

राज्य सरकार विरोधी ९ नोव्हेंबर रोजी किसान मोर्चा : खा. रक्षा खडसे यांची माहिती

यावल प्रतिनिधी ::> केळी पीक विमा व शेतकरी विरोधी राज्य सरकार विरोधातील दि. ०९ नोव्हेंबर च्या किसान मोर्चा संदर्भात फ्रुटसेल सोसायटी न्हावी ता.यावल येथे बैठक घेण्यात आली. यावेळी उत्तर महाराष्ट्र किसान मोर्चा संयोजक सुरेश धनके, नारायणबापू चौधरी, फ्रुटसेल सोसायटी चेअरमन शरद महाजन, श्री.किशोर विठ्ठल कोलते, डॉ.भरत झोपे, श्री.गणेश नेहते, श्री.नरेंद्र नारखेडे, श्री.भोजराज बोरोले, श्री.भानू चोपडे, […]

Read More
यावल ग्रामीण रुग्णालय

बामणोदच्या २१ वर्षीय तरुणास सर्पदंश ; प्रकृती बिघडल्याने गोदावरीत केले दाखल

फैजपूर प्रतिनिधी ::> यावल तालुक्यातील बामणोद येथे एका २१ वर्षीय तरुणाला शेतात काम करताना असतांना सर्पदंश झाला. हा प्रकार लक्षात येताच त्याला तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारांकरिता दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यास जळगाव येथे गोदावरी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. अविनाश गोकुळ सोनवणे असे सर्पदंश झालेल्या तरुणाचे नाव आहे. अविनाश बुधवारी सकाळी शेतात […]

Read More

यावल-चितोडा-फैजपूर रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक, ३ जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

यावल प्रतिनिधी ::> येथील फैजपूर रस्त्यावर यावल-चितोडा दरम्यान दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक होऊन तीन जण जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून जळगावला हलवले आहे. गिरडगाव, ता. यावल येथील रहिवासी गुलशेर नजीर तडवी (वय ३०) व त्यांची आई सलमाबाई नजीर […]

Read More

यावल फैजपूर रस्त्यावर दोन दुचाकींची धडक ; दोन गंभीर जखमी

यावल ::> यावल-फैजपूर रस्त्यावरील चितोडा गावाजवळ दुचाकींच्या अपघातात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. जखमींवर यावल येथे प्रथमोपचार करून जळगावला हलवण्यात आले आहे. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. पिंपरूळ येथील रहिवासी टेकचंद रोहिदास कोल्हे (वय २४) हा तरुण रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दुचाकीद्वारे यावलकडे येत होता. तर यावलकडून […]

Read More

फैजपूरला प्रांतधिकारी कैलास कडलग यांनी स्विकारला पदभार

फैजपूर प्रतिनिधी ::> येथे बदली झालेले प्रांतधिकारी कैलास कडलग यांनी दि. ५ ऑक्टोबर सोमवारी दुपारी पदभार स्विकारला. प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले यांची अहमदनगर येथे विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून बदली झाल्याने त्यांच्या जागेवर तळोदा येथील सरदार सरोवर प्रकल्पावर कार्यरत असलेले उपजिल्हाधिकारी कैलास कडलग यांची नियुक्ती झाल्याने त्यांनी सोमवारी फैजपूर प्रांतधिकारी म्हणून पदभार स्विकारला. यावेळी प्रांतधिकारी कडलग […]

Read More

आय.टी.आय. बेरोजगार विद्यार्थ्यांचे आ. शिरीष चौधरी यांना निवेदन!

फैजपूर प्रतिनिधी, मयुर मेढे ::> महावितरण कंपनी मध्ये दि ७ जुलै २०१९ रोजी विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक या दोन्ही पदाची भरती करणे कामी उपकेंद्र सहाय्यक जाहिरात क्रमांक ०५/२०१९ व विद्युत सहाय्यक जाहिरात क्रमांक ०४/२०१९ अश्या आशयाची जाहिरात महावितरण तर्फे काढण्यात आली होती, यासाठी १ लाखाहून उमेदवारांनी भरती होणेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले होते. या […]

Read More

पथ विक्रेत्यांना १० हजार रुपये कर्ज देण्यास युनियन बँक ऑफ इंडियाची टाळाटाळ

मयूर मेढे, प्रतिनिधी फैजपूर ::> कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने लॉकडाऊन कालावधीमध्ये शहरातील पथ विक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यांना उपजीविका पुन्हा सुरू करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्रशासित पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. या योजनेतून १० हजाराचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. फैजपूर […]

Read More

प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्यासह यावल तहसीलदार कुंवर यांची बदली

यावल ::> जिल्ह्यात बदल्यांचे सत्र सुरु असल्याने फैजपूर उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांची अहमदनगर येथे विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून तर यावल येथील तहसीलदार जितेंद्र कुंवर यांची बदली झाली. फैजपूर उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी अजित थोरबोले यांची विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून अहमदनगर येथे बदली झाली असून त्यांच्या जागी तळोदा येथील उपजिल्हाधिकारी कैलास कडलग […]

Read More

फैजपूरातील युनियन बँक ऑफ इंडियाचा कारभार ढेपाळला ; वेळेच्या एक तास अगोदर बँक बंद

फैजपूर मयूर मेढे प्रतिनिधी ::> येथील युनियन बँक ऑफ इंडियाचा कारभार सध्या कमालीचा ढेपाळला आहे. येथील व्यवस्थापक जयराम टोकरे यांचे नियंत्रण कर्मचाऱ्यांवर नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी मनमानी कारभार सुरू केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक कमालीचे वैैतागले आहे. बँकेची वेळ सकाळी ९ ते दुपारी ३ वाजे पर्यंत आहे. मात्र, बँकेचे कर्मचारी व अधिकारी मनमानी करत बँक वेळेच्या एक […]

Read More

फैजपूरातील युनियन बँक ऑफ इंडियाच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांचे हाल

मयूर मेढे, फैजपूर प्रतिनिधी ::> जगासह भारतातही कोरोना प्रादुर्भावाने थैमान घातले असून महाराष्ट्रातही संक्रमित रुग्णांची संख्या अधिक आढळून येत असल्याने संपूर्ण देशासह महाराष्ट्रही लॉकडाऊन करण्यात आला होते. यामुळे गोर गरीब, हातमजुरी करणारे हताश होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांच्या जनधन खाते धारकांना प्रत्येकी ५०० रु. खाते धारकांच्या खात्यात वर्ग […]

Read More

रावेर-यावल तालुक्यात आर्थिक फसवणूक झाल्यास सरळ पोलिस ठाण्यात तक्रार करा : नरेंद्र पिंगळे यांचे आवाहन

रावेर प्रतिनिधी ::> कोरोना महामारीमध्ये आधीच शेतकरी अडचणी असतांना व्यापाऱ्‍यांनी शेतकऱ्ंयाची आर्थिक फसवणूक करू नये, तथापि फसवणूक झाल्यास सरळ संबधित पोलिस स्थानकात तक्रार देण्याचे अवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी रावेर व यावल तालुक्यातील शेतकऱ्‍यांना केले आहे. रावेर व यावल तालुक्यात शेतकऱ्‍यांकडून केळी किंवा शेतीवर आधारीत इतर पिके घेण्यासाठी बाहेर तालुक्यातून व्यापारी येऊन संबधित […]

Read More

ग्रामसेवकाचा प्रताप ; चक्क बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीत बांधले सार्वजनिक शौचालय

फैजपूर । प्रतिनिधी, मौजे वडगाव निंभोरा रोड वरील बौद्ध समाजाच्या लोकांसाठी असलेल्या स्मशानभूमीत ग्रामपंचायत वडगाव मार्फत अवैधरित्या सार्वजनीक शौचालयाचे बांधकाम करण्यात आलेले आहे. सदर बांधकामासंदर्भात बौद्ध समाजातील लोकांनी अनेकदा तक्रारी देऊनही ग्रामपंचायतीने व ग्रामसेवकांनी याकडे दुर्लक्ष केलेले आहे. सदर सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम बंद करून ते अन्य ठिकाणी करण्यात यावे या संदर्भात दि. २२ जून रोजी […]

Read More

फैजपूर पोलिसांची गावठी दारु, जुगार हद्दपारीसाठी धडाकेबाज कारवाई, तब्बल सहा ठिकाणी छापेमारी १७ आरोपी अटकेत!

पाडळसे ता- यावल वार्ताहर शब्बीर खान : >> फैजपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावामध्ये तीन दिवसापासून गावठी दारु व अवैध धंदाचा समूळ उच्चाटन करण्यासाठी फैजपूर पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे. यामध्ये पाडळसे , भोरटेक , कासवे , न्हावी या गावांमध्ये छापेमारी करून फैजपूर पोलिसांनी तब्बल सतरा आरोपींना अटक केली असून सर्वांवर गुन्हे दाखल केलेला […]

Read More