चोपडा शहरात दीड लाखाचा गुटखा जप्त

प्रतिनिधी चोपडा >> शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पाटीलगढी भागात गुरुवारी सकाळी पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दिड लाखांचा गुटखा व साडेतीन लाखाची रिक्षा असा एकूण पाच लाखाचा मुद्देमाल रंगेहाथ पकडून जप्त केला आहे. पाटील गढी भागात गुरुवारी सकाळी गुटखा व सुगंधित पान मसाल्याची रिक्षा येत असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना मिळाली हाेती. […]

Read More
civil jalagaon

जीएमसीचा हलगर्जीपणा, आदिवासी रुग्णाचा मृत्यू ; मृताच्या नातेवाइकांचा आरोप

प्रतिनिधी जळगाव >> चोपडा तालुक्यातील कोरोना बाधित आदिवासी रुग्णाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला, हलगर्जीपणाने व आदिवासी असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज मिळावे, अशी मागणी करत शहर पोलिस ठाण्यासह राज्यपालांकडे तक्रार केली आहे. प्रदीप पावरा यांना २९ मार्च रोजी सकाळी श्वास घेण्याचा त्रास होत असल्याने […]

Read More
civil jalagaon

जळगाव, चोपडा, अमळनेर, भुसावळ तालुक्यांतील सर्व रुग्णालये फुल्ल!

प्रतिनिधी जळगाव >> कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. गेल्या आठवड्याभरात जळगाव शहरासह चोपडा, भुसावळ, अमळनेर तालुक्यात रुग्णसंख्या वाढली आहे. परिणामी रुग्णालये फुल्ल झाल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. गेल्या आठवड्यात जळगाव शहरात २०४५ तर चोपडा तालुक्यात तब्बल २३१५ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून शहरापेक्षा चोपडा तालुक्याची संख्या अधिक झाल्याने आरोग्य यंत्रणा […]

Read More

पत्नीच्या मृत्यूनंतर दोन तासातच पतीचाही मृत्यू

राजेंद्र पाटील चोपडा >> तालुक्यातील अकुलखेडा येथील कोरोनाग्रस्त ७५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाल्यानंतर केवळ दोन तासातच त्यांच्या पतीचाही मृत्यू झाल्याने गावासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. अकुलखेडा येथील सुमनबाई राजाराम महाजन (वय ७५)यांना कोरोना असल्याने त्यांच्यावर चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताता गुरुवारी दुपारी सुमनबाई महाजन यांचा मृत्यू झाला. या नंतर केवळ […]

Read More

कोरोनाची चाचणी करायची सांगितल्याचा राग आल्याने डॉक्टरांना शिवीगाळ करुन मारण्याची धमकी!

प्रतिनिधी चोपडा >> शहरातील पाटील गढीतील तपस्वी मारोती मंदिराजवळ डॉ. प्रशांत मुरलीधर पाटील याना एकाने शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत चोपडा शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. शहरातील रंगराव आबा नगरमधील रहिवासी असलेले संजय पंढरीनाथ महाजन यांच्या पत्नीला डॉ. प्रशांत पाटील यांनी २४ रोजी सकाळी ११ वाजता कोरोना चाचणी करावी लागेल, असे सांगितले. […]

Read More

जिल्ह्यातील या तालुक्यात आजपासून पुन्हा चार दिवस जनता कर्फ्यू

प्रतिनिधी राजेंद्र पाटील चोपडा >> तालुक्यात कोरोनाने महिन्याभरापासून थैमान घातले आहे. त्यावर उतारा म्हणून प्रशासनाने पुन्हा चार दिवसांची जनता कर्फ्यूत वाढ केली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने २० व २१ या दोन दिवसांचा जनता कर्फ्यू लावला होता. परंतु विविध संघटनांनी तहसीलदारांना निवेदन देऊन जनता कर्फ्यूत वाढ करण्याची मागणी केली. त्यानंतर २२, २३, २४ मार्चपर्यंत कर्फ्यूत […]

Read More

जिल्ह्यातील या शहरात आजपासून तीन दिवस जनता कर्फ्यू

चोपडा >> चोपडा शहरासह तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता चोपडा शहरात सुरु असलेल्या जनता कर्फ्यूत तीन दिवसांची वाढ केली आहे. गेल्या आठवड्यापासून तालुक्यातील कोरोनाची रुग्णांची संख्या तीनशेच्या पार जात आहे. या गोष्टीला आटोक्यात आणण्यासाठी २२, २३ व २४ मार्चपर्यंत जनता कर्फ्यू वाढवण्यात आला आहे. शहरात २० व २१ रोजी जनता कर्फ्यू लागू करण्यात […]

Read More

चोपड्यात कोरोनाचे सलग तिसऱ्या दिवशीही तीनशेच्या पार!

प्रतिनिधी राजेंद्र पाटील चोपडा >> चोपडा तालुक्यात कोरोनाचा कहर गेल्या १८ दिवसांपासून सुरु आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्ण संख्येने त्रिशतक गाठले. १८ रोजी ३१४ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. लग्न सोहळे, साखरपुडे व अंत्ययात्रांना होत असलेल्या गर्दीमुळे तालुक्यात कोरोनाची रुग्ण संख्या दिवसागणिक वाढत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालय रुग्णांनी फुल्ल भरले […]

Read More

चोपड्यात शनिवार-रविवार दोन दिवस कडक लॉकडाऊन

चोपडा राजेंद्र पाटील प्रतिनिधी >> कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी चोपडा शहर शनिवारी आणि रविवारी (दि.२० व २१) लॉकडाऊन करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहेत, अशी माहिती तहसीलदार अनिल गावित यांनी दिली. चोपडा शहरात यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने दोन दिवस शहर बंद पाळण्यात आला होता. त्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उपविभागीय अधिकारी सुमित शिंदे यांनी लॉकडाऊनचे आदेश काढले. […]

Read More

चोपडा पालिकेचा ‘स्वच्छ सर्वेक्षणा’त सहभाग!

प्रतिनिधी राजेंद्र पाटील चोपडा >> स्वच्छ भारत अभियानातील एक महत्वाचे उपांग म्हणजे हागणदारी मुक्त शहर होय. त्या अंतर्गत शहर हागणदारी मुक्त करणे, त्यात सातत्य टिकवणे व प्रत्येक कुटुंबास शौचालय सुविधा उपलब्ध करुन देणे, शौचालयातील मैल्याचे सुयोग्य व्यवस्थापन व त्यावर प्रक्रिया करणे अभिप्रेत आहे. या अंतर्गत निकषांच्या पूर्ततेच्या अनुषंगाने निकष निहाय शहरांना हागणदारी मुक्त शहर, त्यात […]

Read More

चार लाखांची घरफोडी ; दोन घरांमध्ये एकाच वेळी केली चोरी

प्रतिनिधी अडावद >> येथून जवळच असलेल्या वर्डी येथे दोन घरे फोडून चोरट्यांनी दोन्ही घरातील ४ लाख ११ हजार रूपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी रात्री १०.३० ते मंगळवारी पहाटे ५ वाजेदरम्यान घडली आहे. चोपडा तालुक्यातील वर्डी गावातील संतोषी माता नगरातील नवीन प्लाट भागातील रघुनाथ रामकृष्ण पाटील यांच्या गुजर वाड्यातील घराचा कडी-कोयंडा तोडून त्यांच्या […]

Read More

कोरोनाने जिल्ह्यातील या काँग्रेस तालुकाध्यक्षांचा मृत्यू

प्रतिनिधी चोपडा >> काँग्रेसचे चोपडा तालुकाध्यक्ष राजाराम बाबुराव पाटील (वय ६४, रा. तावसे खुर्द)यांचा नाशिक येथील एका खासगी दवाखान्यात कोरोनाचा उपचार घेत असताना मृत्यू झाला. रविवार, १४ रोजी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. रुखणखेडा-तावसे खुर्द विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे ते चेअरमन होते. हतनूर पाटबंधारे विभागाचे निवृत्त अधिकारी व चोपडा तालुका स्थापत्य संघटनेचेही ते सध्या कार्याध्यक्ष […]

Read More

चोपड्याचा तरुणाला पुण्यात पिस्तुल विक्रीच्या प्रयत्नात असताना अटक

चोपडा राजेंद्र पाटील प्रतिनिधी >> येथील रहिवासी असणारा तरूण पिस्तुल विक्रीच्या प्रयत्नात असतांना त्याला पुणे येथील खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. चोपडा येथून एक तरुण पिस्तूल विक्रीसाठी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात आलेला असल्याची गुप्त माहिती खंडणी विरोधी पथकातील पोलीस अमंलदार सचिन अहिवळे यांना समजली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून भूषण महेश मराठे (वय, […]

Read More

सातपुड्यातील आग थांबेना आज मनुदेवी परिसरात पोहोचली वणव्याची धग

आडगाव ता. यावल प्रतिनिधी >> गेल्या १५ दिवसांपासून सातपुड्यात पेटलेला वणवा आता मनुदेवी परिसरातील जंगलात पोहोचला. यामुळे मदतकार्य करणारे वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, वन्यजीवप्रेमींची तारांबळ उडाली. वराड, कृष्णापुर, गुळप्रकल्प, या भागात बऱ्यापैकी वणवा नियंत्रणात आणण्यासाठी वनविभागाला यश आले. त्या भागात वणवा आटोक्यात आला असला तरी आता अडावद, पांढरी भागात शुक्रवारी तर देवझीरी, हंड्या-कुंड्या, वाघझिरा, मनुदेवी, मानापुरी […]

Read More

चोपडा-खरदला कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

राजेंद्र पाटील प्रतिनिधी चोपडा >> तालुक्यातील खरद येथील रहिवासी शेतकरी प्रकाश प्रताप पाटील (वय ५२)यांनी रविवारी सकाळी साडेनऊ वाजता कर्जाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत शेतकरी प्रकाश पाटील यांच्यावर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे कर्ज असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. तर इतर बँकांचे ही कर्ज असण्याची शक्यता आहे. दुपारी चोपडा उप जिल्हा रुग्णालयात […]

Read More

चोपडा नगरपरिषद पाणीपुरवठा विभागातील १९-२० ची बिलांची माहिती देण्‍यास लेखापाल व मुख्याधिकाऱ्यांची टाळाटाळ

चोपडा राजेंद्र पाटील प्रतिनिधी >> महेश पवार गटनेता शिवसेना व नगरसेविका चोपडा नगरपरिषद यांनी पाणीपुरवठा विभागातील सन २०१९-२० या वर्षात झालेल्‍या आवस्‍ताव खर्चाबाबत लेखाविभागात माहिती मागितली आहे. पाणी पुरवठा विभागात मागील वर्षात पाईपलाईन रिपेअरि, ट्युबवेल दुरुस्‍ती, रसायने खरेदी, पाणीपुरवठा देखभाल खर्च, वृक्षारोपण व देखभाल या हेड अंतर्गत सन २०१८-१९ मध्‍ये सुमारे ७५.५५ लाख खर्च झाला […]

Read More

धानोरा येथील हॉटेलातील ५९ हजारांचा मुद्देमाल चोरीला ; गुन्हा दाखल

धानोरा प्रतिनिधी >> चोपडा तालुक्यातील धानोरा गावा नजदीक असलेल्या हॉटेल जत्रा बियरबार व परमीटचे गोडावून अज्ञात चोरट्यांनी फोडून ५९ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीला आहे. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे किशोर मुरलीधर बाविस्कर (वय-३५) रा. अडावद यांचे धानोरा-अडावद रोडवर हॉटेल जत्रा बिअरबार आणि परिमीटचे हॉटेल आहे. त्यांच्या […]

Read More

चोपड्यातील भार्डू शिवारात आढळला बिबट्या!

चोपडा राजेंद्र पाटील प्रतिनिधी >> तालुक्यातील भार्डू येथे १३ डिसेंबरला सकाळी ११ वाजेच्या सुमारास सालगडी बैल बांधण्यास गेला असता त्याच्यावर बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. त्यानंतर रात्री ११ वाजता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्या पकडण्यात यश मिळाले. भार्डू येथील शेतकरी मिलिंद पाटील यांच्या शेतात कामाला असलेला सालगडी नाना पावरा हा सकाळी ११ वाजता शेतात […]

Read More

चोपडा-अडावदला पावसाचा शिडकाव, शेतकऱ्यांची उडाली तारांबळ

अडावद प्रतिनिधी >> अडावद (ता. चोपडा) परिसरात शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. यामुळे काढणीवर आलेला मका व कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अडावद परिसरात शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले. सायंकाळी ७ वाजता तुरळक स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होताच मका व कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांना मेहनत करावी लागली. […]

Read More

यावल-चोपडा रस्त्यावर अपघात, चार जण जखमी

यावल प्रतिनिधी >> चोपडा रस्त्यावर वन विभाग कार्यालयाजवळ दोन दुचाकींचा अपघात होवून ४ जण जखमी झाले. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडला. जखमींवर यावल रुग्णालयात उपचार करून दोघांना जळगावला हलवण्यात आले. गणेश भागवत माळी (वय ३९), मगन दौलत माळी (वय ६५, दोन्ही रा.किनगाव) हे दुचाकीने (एमएच.१९-बी.पी.३८३९) हे यावलला […]

Read More