चाळीसगावच्या तरुणाचा भरधाव ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू

चाळीसगाव प्रतिनिधी >> नाशिकहून आईस भेटण्यासाठी येत असलेला मुलगा हिरापूर रेल्वे स्थानक जवळ भरधाव ट्रकच्या धडकेत जागीच ठार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील चितेगाव येथील विश्वास उत्तमराव शितोळे ( वय ४४) असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव असून नाशिक येथे महिंद्रा कंपनीत […]

Read More

२४ वर्षीय विवाहित तरुणाने अडीचला केले मतदान अन ३ वाजता गळफास घेत आत्महत्या

चाळीसगाव प्रतिनिधी >> ग्रामपंचायतीसाठी मतदान केल्यानंतर अवघ्या अर्धा तासाने वडगाव लांबे (ता.चाळीसगाव) येथील २४ वर्षीय विवाहित तरुणाने घरात गळफास घेत आत्महत्या केली. सचिन डोंगरसिंग घोरपडे असे मृत तरूणाचे नाव आहे. दुपारी २.३० च्या सुमारास सचिनने मतदान केले. तेथून घरी परतल्यावर त्याने आई व मोठ्या वहिनींना मतदानासाठी पाठवले. यावेळी सचिनचे वडील व भाऊ शेतात गेले होते. […]

Read More

एकतर्फी प्रेमातून चाळीसगावात १८ वर्षीय तरूणीवर चाकू हल्ला

चाळीसगाव प्रतिनिधी >> एकतर्फी प्रेमातून तरूणीवर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना तालुक्यातील मेहुणबारे येथे घडली आहे. मेहूणबारे (ता.चाळीसगाव) येथे १८ वर्षीय तरूणी ही राहते. ती चाळीसगाव येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून तिची घरासामोर राहणारा प्रशांत चौधरी याच्याशी तिची ओळख झाली. यातून त्याने प्रेमाची विचारणा केली असता तरूणीने नकार दिला. यानंतर त्याने त्रास देण्यास प्रारंभ […]

Read More

राज्य सरकारमुळे धान्य खरेदी ठप्प : आमदार मंगेश चव्हाण

चाळीसगाव प्रतिनिधी राज देवरे >> तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी नोंदणी केली असताना त्या अंतर्गत मका, ज्वारी व बाजरी या धान्य पिकांची २० टक्केही खरेदी झालेली नाही. केंद्र सरकारने खरेदीचे उद्दिष्ट वाढवण्यासाठी मागितलेली माहितीही राज्यातील महा विकास आाघाडी सरकारने दिली नाही. त्यामुळे या सरकारचे शेतकरी प्रेम केवळ नाटकी असल्याची टीका तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केली आहे. […]

Read More

माजी नगरसेवक चौधरी हल्ल्यात गंभीर जखमी; चाळीसगाव येथील घटना

चाळीसगाव प्रतिनिधी राज देवरे >> शहर पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वीर सावरकर चौकात शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास भाजपच्या माजी नगरसेवकावर माजी नगरसेवकाचा पती व मुलाने धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. यामुळे शहरात खळबळ उडाली. यात जखमी प्रभाकर चौधरी यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत. पोलिस ठाण्यातून हॉटेलवर परतल्यानंतर हा हल्ला झाला. पोलिसांनी घटनास्थळी […]

Read More

महाविकास आघाडीला कृषी कायद्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही- खा. उन्मेष पाटील

चाळीसगाव प्रतिनिधी >> केंद्राचे कृषी कायदे हे शेतकर्‍यांच्या हिताचे असून महाविकास आघाडीला यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे प्रतिपादन खासदार उन्मेष पाटील यांनी केले. ते भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अंत्योदय कार्यालयात आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलत होते. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अंत्योदय कार्यालयात शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रारंभ स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या […]

Read More

चाळीसगावात दोघांनी घेतला गळफास

चाळीसगाव >> तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ७५ वर्षीय वृद्धेसह ३० वर्षाच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. बोरखेडा खुर्द येथील नीलाबाई नामदेव पाटील व रोकडे येथील अरविंद दत्तात्रय पाटील अशी मृतांची नावे आहेत. बोरखेडा खुर्द येथील नीलाबाई नामदेव पाटील या वृद्धेने राहत्या घरात खिडकीच्या लोखंडी गजाला रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २५ रोजी पहाटे […]

Read More

चाळीसगावातील ढोमणे गावाचा पाणीप्रश्न मिटणार : आमदार मंगेश चव्हाण

चाळीसगाव प्रतिनिधी >> तालुक्यातील ढोमणे नळ पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनच्या कामाचे भूमिपूजन रविवारी तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते झाले. आपल्या स्थानिक विकास निधीतून त्यांनी या कामासाठी ८ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तालुक्यातील ढोमणे गावाला घरोघरी नळ पाणीपुरवठा करणारी २५ वर्षांपूर्वीची पाइपलाइन खराब झाल्याने पाणी असूनदेखील नळाद्वारे पाणीपुरवठा करता येत नव्हता. त्यामुळे ढोमणे ग्रामस्थांना […]

Read More

चाळीसगावातील १०० घरांसमोरील अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात हटवले

चाळीसगाव प्रतिनिधी राज देवरे >> शहरातील कुरैशी नगर भागातील अतिक्रमणावर बुधवारी पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. तब्बल १०० घरांबाहेर झालेले अतिक्रमण जेसीबीने हटवण्यात आले. पोलिस बंदोबस्तांत पालिकेने ही कारवाई केली. शहरातील छोटी गुजरी जवळील कुरेशी गल्लीतील बहुतांश रहिवाशांनी पालिकेच्या गटारीवरच १० ते १५ फुट अतिक्रमण केले होते. कुणी जिना तर कुणी संडास, बाथरूमचे बांधकाम केले. […]

Read More

लग्नाचे आमिष दाखवून तरुणास दीड लाखात गंडवले

चाळीसगाव प्रतिनिधी >> वडाळा वडाळी येथील ३२ वर्षीय तरुणाशी एका तरुणीचे लग्न एका टोळीने ठरवले. त्यापोटी नियोजित वराने या टोळीस दीड लाख रूपये दिले. घरात लग्नाची तयारी सुरू असताना व बस्त्यासाठी वराचे कुटुंबीय व नियोजित वधू चाळीसगावी आली असताना वधूसह तिच्या साथीदारांनी पळ काढल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित तरुणी […]

Read More

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

चाळीसगाव प्रतिनिधी >> शहर पोलिसांनी पाटणादेवी रोडवर रविवारी दुपारी गावठी पिस्तुल व मॅक्झिनसह दोघांना अटक केली होती. पोलिसांनी दोघांकडून पिस्तूल व मॅक्झिनसह दोन दुचाकी असा १ लाख १४ हजाराचा ऐवज हस्तगत केला होता. या प्रकरणी अटक केलेल्या दोघांना सोमवारी दुपारी न्यालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. शहरातील घाट रोड परिसरातील हुडको […]

Read More

चाळीसगावात नगरसेवकाच्या घरात गुरुवारी मध्यरात्री चोरी

चाळीसगाव प्रतिनिधी >>शहरातील घाट रोड परिसरातील हुडको कॉलनीत रहिवासी नगरसेवक शेखर देशमुख व अन्य रहिवासी नासिर खाटीक यांच्या घरातून गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी दोन मोबाईल व रोख रक्कम असा ३० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. शहर विकास आघाडीचे नगरसेवक शेखर देशमुख हे परिवारासह आपल्या हुडको कॉलनीतील निवासस्थानी झोपले होते. मध्यरात्री १.४५ वाजेच्या सुमारास चोराने जिन्याच्या दरवाजातून घरात […]

Read More

मुलीच्या विवाहाच्या दिवशीच आईचा मृत्यू

चाळीसगाव प्रतिनिधी >> घरात मुलीच्या लग्नाची लगबग सुरू असताना आईचा मृत्यू झाल्याचा दुर्दैवी प्रसंग मंगळवारी सीतामाई नगरातील भोकरे परिवारावर कोसळला. मात्र, काळजावर दुःखाचा दगड ठेवून परिवाराने हा सोहळा साध्या पद्धतीने पार पाडला. भोकरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने हळहळ व्यक्त होते. संगीता राजेंद्र भोकरे (कोठावदे, वय ५०) असे दुर्दैवाने मृत झालेल्या आईचे नाव आहे. मुलीचे हात […]

Read More

सावधान : पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धेच्या बांगड्या लांबवल्या

चाळीसगाव प्रतिनिधी >> आम्ही पोलिस असून शहरात चोऱ्या होत आहेत. तुमच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून ठेवा, अशी बतावणी करत दोन भामट्यांनी ८० वर्षीय वृद्धेच्या ६० हजार रूपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या लंपास केल्या. ही घटना ७ डिसेंबरला दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास शहरातील भडगाव रस्त्यावर घडली. इंदूबाई धोंडू शिरूडे (वय ८०, रा.बस स्टँड मागे, लक्ष्मीनगर) ही महिला […]

Read More

चाळीसगावात भाजपच्या नगरसेवकाविरुद्ध उपोषण ; सातबारा उताऱ्यात अफरातफर केल्याचा आरोप

चाळीसगाव प्रतिनिधी >> भाजप नगरसेवक शेखर कन्हैय्यालाल बजाज व हिराचंद चंदीराम बजाज यांनी सातबारा उताऱ्यात हेराफिरी करून फसवणूक केल्याचा आरोप टाकळी प्र.चा. येथील मोहन शंकर साठे व गणेश शंकर साठे यांनी केला आहे. या अफरातफरीच्या विरोधात दोघेही सोमवारपासून तहसील कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणास बसले आहेत. २३ नोव्हेंबर २०२० रोजी सरकारी मोजणी पूर्ण केली असून माझा […]

Read More

दुचाकी घसरून चाळीसगाव तालुक्यातील देवळीतील तरुणाचा मृत्यू

चाळीसगाव प्रतिनिधी >> मालेगाव रस्त्यावरील बिलाखेड गावाजवळ मातीच्या ढिगाऱ्यामुळे दुचाकी घसरून तालुक्यातील देवळी येथील ३४ वर्षीय दुचाकीस्वार तरूण ठार झाला. शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. सुनील शिवाजी कोळी असे मृत तरूणाचे नाव आहे. सुनील कोळी हा तरूण इलेक्ट्रिक फिटिंगचे काम आटोपून दुचाकीने देवळीकडे जात होता. बिलाखेड गावाजवळ मातीच्या ढिगाऱ्यामुळे त्याची दुचाकी […]

Read More

चाळीसगाव ग्रामीणच्या पोलिस निरीक्षकपदी संजय ठेंगे रूजू

चाळीसगाव >> ग्रामीणच्या पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी संजय राजाभाऊ ठेंगे हे रुजू झाले आहेत. ठेंगे यांनी रविवारी मावळते पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्याकडून पदभार स्विकारला. अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी या अगोदर पुणे शहर व ग्रामीण येथे सात वर्ष तसेच चोपडा शहर व ग्रामीण यासह गडचिरोली येथे […]

Read More

चाळीसगाव गोळीबार प्रकरणी जळगावच्या तरुणास धुळ्यातून अटक

चाळीसगाव प्रतिनिधी >> चाळीसगाव येथील हुडको परिसरात तरुणावर दुचाकीने आलेल्या दोघांनी गोळीबार केल्याची घटना नुकतीच घडली असून या प्रकरणात जळगाव येथील एका युवकाला पोलिसांनी धुळ्यातून ताब्यात घेतले आहे. तर दुसऱ्या संशयिताच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे. शहरातील नागद रोड परिसरातील हुडको भागातील तरुण जुबेर उर्फ बंबय्या याच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केल्याची घटना घडली होती. […]

Read More

शहीद जवान यश देशमुख यांना दिला शेवटचा निरोप

चाळीसगाव प्रतिनिधी >> पिंपळगाव येथील शहीद जवान यश दिगंबर देशमुख यांच्यावर आज दि.२८ नोव्हेंबर रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जात आहे. अवघ्या २१ व्या वर्षी यश देशमुख यांना वीरगती प्राप्त झाल्याने पूर्ण गाव शोकमग्न असून पिंपळगाव गावाजवळ असलेल्या मोकळ्या माळरानावर हा अंत्यविधी होत आहे. शहीद जवान यश देशमुख यांच्यावर आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास […]

Read More

‘मागून हल्ला केला, पुढून केला असता तर माझ्या यशने 3 जण तरी मारले असते’

रिड जळगाव टीम >> श्रीनगरमध्ये सेनेच्या गस्ती पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पिंपळगावच्या ता. चाळीसगाव २२ वर्षीय जवानाला गुरुवारी दुपारी वीरमरण आले. अवघ्या विशीत हौतात्म्य आलेल्या वीरपुत्राचे वडिल दिगंबर देशमुख यांनी मन हेलावून टाकणाऱ्या भावना व्यक्त केल्या. यश सप्टेंबर महिन्यात घरी आला होता. 2 ऑक्टोबरला परत गेला. 4 दिवसांपूर्वी फोनवर बोलणं झालं होतं, कसे आहात विचारलं […]

Read More