पुणे, मुंबईला जाण्यासाठी दोन विशेष रेल्वे गाड्या

भुसावळ >> रेल्वे गाड्यांना होत असलेली प्रवाशांची गर्दी पहाता रेल्वे प्रशासनाने पुणे-जम्मूतवी आणि मुंबई-फिरोजपूर या दोन विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. यामुळे प्रवाशांना सुखकर प्रवासाला मदत होईल. जागेचा प्रश्न काही अंशी सुटण्यास मदत होईल. ०१०७७ डाऊन पुणे-जम्मुतवी विशेष गाडी १ डिसेंबरपासून पुणे स्टेशनवरून दररोज सायंकाळी ५.२० वाजता सुटेल. ती तिसऱ्या दिवशी जम्मुतवीला सकाळी १०ला पोहोचेल. […]

Read More

सुनसगावात शेतमजुराची गळफासने आत्महत्या

भुसावळ >> तालुक्यातील सुनसगाव येथील शेतमजुराने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली भानुदास हरी कंखरे (धनगर) (वय ४५) असे मृताचे नाव आहे. गुरुवारी (दि. २६) गोठ्याजवळ त्यांनी गळफास घेतल्याचे आढळले. तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यू नोंद झाली.

Read More

शॉर्टसर्किटमुळे वरणगावात दोन एकरावरील ऊस खाक ; चार लाखांचे नुकसान

वरणगाव >> शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याने वरणगाव फॅक्टरी रस्त्यावरील शेतात दोन एकरावरील ऊस जळाल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेत संबंधित शेतकऱ्याचे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. फुलगाव येथील शेतकरी अनिल शालिग्राम चौधरी (वय ५५) यांनी गट नंबर १३५, १३६ मधील शेतात ऊस लावला होता. बुधवारी अचानक शेतातील वीजखांबावर असलेल्या तारांचे दोन झंपर तुटून शॉर्टसर्कीट […]

Read More

वरणगाव फॅक्टरी येथील कर्मचारी वसाहतीत २० वर्षीय युवकाची आत्महत्या

वरणगाव प्रतिनिधी >> वरणगाव फॅक्टरी येथील कर्मचारी वसाहतीमधील टाईप टू क्वार्टर नंबर २७ मधील रहिवासी अजय दिलीप मतकर (वय २०) याने राहत्या घरात पंख्याला साडी बांधून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास घडली. अजय मतकर असे मृताचे नाव आहे. अजय याची आई वरणगाव फॅक्टरीत नोकरीस असून तो आईसोबत राहत होता. तसेच मुक्ताईनगर […]

Read More

भुसावळातील नगरसेवकाच्या भावाला चाकू दाखवून लुटले

भुसावळ प्रतिनिधी >> शहरातील दीनदयाळ नगरातील फकीर गल्ली, मशिदीच्या मागील भागात चाकूचा धाक दाखवून सत्ताधारी भाजप नगरसेवकाच्या भावाला धमकावत तीन भामट्यांनी लूटले. त्याच्याकडील चार हजार ९०० यांची रोकड लांबवल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी एकाला अटक केली. नगरसेवक महेंद्रसिंग उर्फे पिंटू ठाकूर यांचे बंधू तथा रिक्षाचालक अनिल ठाकूर (रा. सिंधी कॉलनी, मोहन रॉकेल डेपोजवळ, […]

Read More

धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी युवक गंभीर जखमी, उपचारादरम्यान ओढवला मृत्यू

भुसावळ >> धावत्या रेल्वेतून ३४ वर्षीय अनोळखी युवक पडल्याची घटना १४ नोव्हेंबरला घडली होती. वरणगाव-मन्यारखेडा रेल्वे लाईनवरील खांबा क्रमांक ५२ जवळी हा युवक जखमी अवस्थेत आढळला होता. त्याच्यावर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान १६ रोजी दुपारी त्याचा मृत्यू झाला. अनोळखी मृताची उंची पाच फूट सहा इंच, रंग गोरा, नाक सरळ, मिशी जाड, दाढी […]

Read More

भुसावळात अनोळखी वृद्धेचा मृतदेह आढळला

भुसावळ प्रतिनिधी >> रेल्वे स्थानकावरील पीआरएस कार्यालय ते दर्गा दरम्यान १६ रोजी ६५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. मृत महिलेची उंची ४.७ फूट, रंग निमगोरा, केस पांढरे-काळे, शरीर बांधा सडपातळ, अंगात लाल रंगाचे ब्लाऊज, पिवळसर रंगाच्या फुलांची साडी, जांभळ्या रंगाचे स्वेटर बिनबाहीचे असे वर्णन आहे. ओळख पटवावी, असे आवाहन […]

Read More

बनावट नंबर प्लेटची मोटारसायकल वापरणाऱ्या भुसावळातील तिघांना अटक

भुसावळ प्रतिनिधी >> भुसावळातील चोरलेली मोटारसायकल बनावट नंबरने वापरून बेवारस स्थितीत सोडून देणाऱ्या तीन मोटरसायकल चोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ८ ते १० महिन्यांपूर्वी तालुक्यातील तळवेल गाव शिवारातून मोटरसायकल क्रमांक (एम.एच १९, सी.एच. ४४२६) ही चोरीला गेली होती. याबाबत वरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळातील न्यु आंबेडकर […]

Read More

भुसावळात महिला डॉक्टरची केली २९ हजारांत फसवणूक ; दुचाकी विक्रीच्या बहाण्याने ऑनलाइन गंडा

भुसावळ >> वेबसाइटवर दुचाकी विक्रीची जाहिरात टाकून दोन भामट्यांनी भुसावळातील महिला डॉक्टरची २९ हजार रुपयात फसवणूक केल्याची घटना नुकतिच घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. डॉ.रश्मी कुंदन कोटेचा (सराफ बाजार, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार १८ नोव्हेंबरला त्यांनी ओएलएक्स या वेबसाइटवर दुचाकी (क्रमांक-एम.एच.०३-डी.बी.७८८०) विक्री होत असल्याची जाहिरात पाहिली. त्यामुळे डॉ.कोटेचा यांनी जाहिरातीमधील क्रमांकावर संपर्क साधला. […]

Read More

बिहारच्या विजयाचा जल्लोष, खडसे समर्थकांची गैरहजरी

भुसावळात भाजपमधील गटबाजी उघड भुसावळ प्रतिनिधी ::> बिहार निवडणुकीतील विजयानिमित्त शहर भाजपने बुधवारी जामनेररोडवरील आमदार संजय सावकारे यांच्या कार्यालयासमोर विजयोत्सव साजरा केला. या जल्लोषात भाजपचे नगराध्यक्ष रमण भोळे, शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, स्वीकृत नगरसेवक प्रा. सुनील नेवे आदींसह खडसे समर्थक भाजपेयी गैरहजर होते. बिहार विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसह गुजरात, मध्यप्रदेशातील पोटनिवडणुकीत भाजपने उल्लेखनीय यश मिळवले. यानिमित्त शहर […]

Read More

पाटलीपुत्र एक्स्प्रेसमधून लांबवली प्रवाशाची बॅग

भुसावळ :: > अप पाटलीपुत्र एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाची बॅग चोरट्याने लंपास केल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. बॅगेत साडेचार हजार रुपयांचा ऐवज होता. याप्रकरणी जीआरपीत गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा इटारसी जीआरपीकडे वर्ग केला आहे. भाईंदर पूर्व येथील रहिवासी राजेंद्र त्रिपाठी हे मंगळवारी पहाटे झोपलेले असताना त्यांची बॅग अज्ञात चाेरट्याने लांबवली.

Read More

फटाके विक्रेत्यांनी नियमांचे पालन करावे, मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन

भुसावळ प्रतिनिधी ::> दिवाळीसाठी शहरातील डॉ. आंबेडकर मैदानावर सुमारे १२५ ते १५० फटाक्यांची दुकाने थाटली जाणार आहेत. या दुकानांसाठी यंदा पालिकेने कठोर नियमावली राबवली आहे. १० बाय १२ फूट आकारातील प्रत्येक दुकानात अग्नीशमन यंत्रणा सज्ज ठेवण्याची सक्ती आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास फटाके विक्री परवाना रद्द करण्याचा इशारा मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी दिला. डॉ. आंबेडकर मैदानावर […]

Read More

भुसावळ बसस्थानकाच्या स्लॅबचे तुकडे कोसळून प्रवासी होताय जखमी, बस आगाराचे दुर्लक्ष

भुसावळ प्रतिनिधी ::> येथील बसस्थानकाची दोन दशकांपूर्वी उभारलेली इमारत जीर्ण झाली आहे. त्यामुळे छताच्या स्लॅबचे तुकडे कोसळून प्रवासी जखमी होत आहेत. गेल्या आठवड्यातच यावल येथील प्रवासी महिलेच्या डोक्यावर स्लॅबचा तुकडा कोसळून महिला जखमी झाली होती. या घटनेनंतरही आगार व्यवस्थापनाने बोध घेतला नाही. अद्यापही स्लॅबची डागडुजी न झाल्याने पुन्हा दुर्घटनेचा धोका वाढला आहे. गेल्या आठवड्यात यावल […]

Read More

भुसावळात १९ वर्षीय तरुणावर चाकू हल्ला ; गुन्हा दाखल

भुसावळ प्रतिनिधी ::> शहरातील कालिंका माता मंदीराजवळ दोन दुचाकींवर येऊन अज्ञात हल्लेखोरांनी चाकूहल्ला केला. यात वैभव राजू महाजन वय १९ रा. खेडी गंभीर जखमी झाला असून ही घटना मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भुसावळ तालुक्यातील खेडी येथे रहिवासी वैभव राजू महाजन वय-१९ हा गॅरेज मेकॅनिकचे […]

Read More

भुसावळात ऑनलाइन ओटीपी विचारून सव्वा तीन लाखांना चुना ; गुन्हा दाखल

भुसावळ प्रतिनिधी :: फोनवर ओटीपी विचारून भामट्याने बँक खात्यातून तीन लाख २१ हजार रुपये ऑनलाइन लंपास केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मंगळवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शहरातील इंद्रायणी कॉलनीतील रहिवासी दिवाकर कान्हेकर यांना सोमवारी सायंकाळी अज्ञात संशयिताचा फोन आला होता. फोनवर संशयिताने आम्ही बॅँकेतून बोलत आहोत. तुमचा बॅकेचा खाते […]

Read More

प्राध्यापक युवतीवर अत्याचार ; सोशल मीडियावर दिले होते लग्नाचे आमिष ; तीन महिन्यांतर आरोपी अटकेत

भुसावळ प्रतिनिधी ::> अमरावती येथील मूळ रहिवासी असलेल्या तरुणीशी सोशल मीडियावर संशयिताने मैत्री केली. नंतर लग्नाचे आमिष देवून तिच्यावर अत्याचार केल्याने बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील पसार संशयित निश्‍चय बसंत पालिवाल (वय २६, रा.पिपरीया, ता.होशंगाबाद, मध्यप्रदेश) याला पोलिसांनी कणकवली (जि.सिंधूदुर्ग) येथून अटक केली. शनिवारी त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पीडीता […]

Read More

४० वर्षीय नराधामाकडून १३ वर्षीय बालिकेचा विनयभंग ; गुन्हा दाखल

भुसावळ प्रतिनिधी ::> भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथे १३ वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. याप्रकरणी ४० वर्षीय संशयितावर गुन्हा दाखल झाला आहे. कुटुंबिय कामासाठी बाहेर गेल्याने मंगळवारी १३ वर्षीय बालिका घरी एकटीच होती. यावेळी संशयित सोपान उत्तम कोळी याने घरात प्रवेश तिचा विनयभंग केला. मुलीने आरडाओरड केल्याने संशयित कोळी घरातून पळून गेला. सायंकाळी […]

Read More

अनिल चौधरी यांच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

भुसावळ ::> महिलेस जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात मंगळवारी अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. शहरातील ममता सनांसे (रा. पूजा कॉम्प्लेक्समागील सदगुरू हौसींग सोसायटी) यांना अनिल चौधरी यांच्यात गाळे विक्रीचा व्यवहार ठरला होता. त्यापोटी महिलेने ६० लाख ७० हजार रूपये आरटीजीएसद्वारे चौधरी यांना दिले. गाळा विकणारे चौधरी व […]

Read More

भुसावळ-कंडारी येथे ३० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

भुसावळ ::> शहरालगतच्या कंडारी येथील रहिवासी अनिल रमेश कोरी (वय ३०) यांनी राहत्या घरात बुधवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. या घटनेमागील कारण स्पष्ट झालेले नाही. हवालदार इकबाल सय्यद, समाधान पाटील यांनी घटनास्थळी पंचनामा केला. वरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला.

Read More

३९ वर्षीय तरुणाची तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या

भुसावळ ::> तापी नदीच्या पुलावरून उडी घेत साकरी (ता.भुसावळ) येथील युवकाने सोमवारी दुपारी ३ वाजता आत्महत्या केली. संतोष भोळे (वय ३९) असे मृताचे नाव आहे. पुलावरून उडी घेताच नदीपात्रातील खडकावर आपटल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेत मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढला. शहर पोलिस ठाण्यात अकस्मात […]

Read More