ट्रिपल सीट दुचाकीस्वाराची पोलिसाला मारहाण

प्रतिनिधी भुसावळ >> शहरातील खडकारोड परिसरात ट्रिपलसीट फिरणाऱ्या दुचाकीस्वारान पोलिसासोबत हुज्जत घालत मारहाण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी शहर वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी श्रीकृष्ण चाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कृष्णाकुमार उदयसिंग याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा, बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुरूवारी रात्री दाखल झाला. पोलिस कर्मचारी श्रीकृष्ण चाटे हे कर्तव्यावर असताना संशयित कृष्णाकुमार उदयसिंग दुचाकीवर […]

Read More

गोंधळ : कोरोनाची लस न घेताच वॅक्सिनेशन सक्सेसफुलचा मेसेज

प्रतिनिधी| भुसावळ >> जामनेर रोडवरील पंढरीनाथ नगरातील दाम्पत्यास कोरोनाची लस न घेताच ‌‘वॅक्सिनेशन सक्सेसफुल’ असा मेसेज मोबाइलवर आला. यामुळे यंत्रणेचा गलथानपणा समोर आला. यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. तौसिफ खान यांनी दाम्पत्याचे लसीकरण करुन घेतले. वन विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी एस.पी.पाटील व त्यांच्या पत्नी सुषमा पाटील यांनी १३ मार्चला कोविन अॅपवर नोंदणी करुन लसीकरणासाठी ५ एप्रिलची वेळ […]

Read More
civil jalagaon

जळगाव, चोपडा, अमळनेर, भुसावळ तालुक्यांतील सर्व रुग्णालये फुल्ल!

प्रतिनिधी जळगाव >> कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. गेल्या आठवड्याभरात जळगाव शहरासह चोपडा, भुसावळ, अमळनेर तालुक्यात रुग्णसंख्या वाढली आहे. परिणामी रुग्णालये फुल्ल झाल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. गेल्या आठवड्यात जळगाव शहरात २०४५ तर चोपडा तालुक्यात तब्बल २३१५ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून शहरापेक्षा चोपडा तालुक्याची संख्या अधिक झाल्याने आरोग्य यंत्रणा […]

Read More

हॉटसिटी भुसावळचे तापमान पोहोचले ४२ अंशांवर

भुसावळ >> हॉटसिटी असलेल्या भुसावळ शहराचा पारा रविवारी तब्बल ४२ अंशांवर पोहोचला. यंदाच्या उन्हाळ्यात हे आतापर्यंतचे उच्चांकी तापमान ठरले. एप्रिल देखील तापदायक ठरण्याची शक्यता आहे. यंदा मार्चच्या पहिल्याच पंधरवड्यात शहराच्या तापमानाने चाळिशी ओलांडली होती. यानंतर २८ मार्चला रविवारी कमाल तापमान ४२ अंशांवर पोहोचले. यंदाच्या उन्हाळ्यात पहिल्यांदाच कमाल तापमान वाढल्याने शहराची लाहीलाही झाली. याचा जनजीवनावर विशेषता […]

Read More

मृतदेह घेण्यास निघालेल्या रुग्णवाहिकेला अपघात, तीन बचावले

भुसावळ >> नशिराबादजवळील डंपरच्या अपघातात साकेगावच्या चालकाचा मृत्यू झाला. यानंतर जळगाव येथे शवविच्छेदन झाले. या चालकाचा मृतदेह येऊन साकेगावकडे परत येणारी ग्रामपंचायतीची रुग्णवाहिका नशिराबादजवळ बंद पडली. त्यामुळे साकेगाव येथून दुसरी रुग्णवाहिका मदतीसाठी नशिराबादकडे निघाली. पण, या रुग्णवाहिकेला देखील अज्ञात ट्रकचालकाने वाघूर पुलाजवळ धडक दिली. शुक्रवारी दुपारी हा अपघात झाला. त्यात सुदैवाने तिघे बचावले. महामार्गावर भाऊचा […]

Read More

शिवसेनेच्या माजी तालुकाप्रमुखाचा कोरोनामुळे मृत्यू

वरणगाव >> शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख तथा शहरातील रेणुका नगरातील रहिवासी संजीव लक्ष्मण कोलते (वय ५२) यांचा शुक्रवारी सकाळी ११ वाजता कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्यावर डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. सन १९८८ मध्ये वरणगाव येथे शिवसेनेची शाखा स्थापन करून कोलते यांनी कडवट शिवसैनिक म्हणून प्रतिकूल परिस्थितीत संघटनेची बांधणी केली. केवळ वरणगाव शहरच नव्हे, तर […]

Read More

लग्न सोहळ्यात जमावबंदीचे उल्लंघन, दोघांविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी वरणगाव >> कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासन-प्रशासन प्रयत्नशील आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कलम १४४ (जमावबंदी आदेश) लागू केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करत विवाह समारंभ पार पाडल्याने मन्यारखेडा येथील दोघांवर वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मन्यारखेडा येथे २२ मार्च रोजी राजेंद्र अमृत बाविस्कर यांचा मुलगा मुकेश बाविस्कर याचा विवाह होता. या विवाह समारंभात जिल्हाधिकाऱ्यांनी […]

Read More
यावल ग्रामीण रुग्णालय

तापी नदीत बुडाल्याने २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

प्रतिनिधी साकळी >> यावल तालुक्यातील साकळी येथून जवळच असलेल्या पिळोदा गावाजवळील तापी नदीत बुडून २० वर्षीय मेंढपाळ तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. भगवान घमा सरगर (रा. बाघापूर, ता.साक्री, ह.मु.गिरडगाव) असे त्याचे नाव आहे. गिरडगाव येथे काही मेंढपाळ कुटुंबे गेल्या चार महिन्यांपासून मेंढ्या चारण्यासाठी आले आहे. त्यातील भगवान घमा सरगर हा तरुण आपल्या चुलत […]

Read More

विशेष ३० गाड्यांना जुलैपर्यंत मुदतवाढीने प्रवाशांना दिलासा

भुसावळ >> प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने अप-डाऊन मार्गावर १५ विशेष (दोन्ही बाजूने मिळून ३०) गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला होता. या गाड्यांचा कार्यकाळ जून-जुलैपर्यंत वाढवण्यात आला. त्याचा विभागातील प्रवाशांना लाभ होईल. त्यात अप हटिया – एलटीटी (प्रत्येक शुक्रवार) गाडीचा विस्तार २ एप्रिल ते २५ जून, डाउन एलटीटी-हटिया (रविवार) ४ एप्रिल ते २७ जून, अप हावडा-एलटीटी (रविवार, […]

Read More

भुसावळात रात्री उशिरा सुरू असलेल्या हॉटेलला २५ हजारांचा दंड

भुसावळ >> शहरातील वांजोळा रोडवर नियमांचे उल्लंघन करुन रात्री १० वाजेनंतरही सुरु असलेल्या हॉटेल राज परमिट रुमवर, पोलिस व पालिका प्रशासनाने २५ हजार रुपये दंडाची कारवाई केली. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे व मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमुळे नियम मोडणाऱ्यांना इशारा मिळाला आहे. कोरोनाचे नियमांमध्ये सध्या नाईट कर्फ्यू सुरु आहे. मात्र शहरातील अनेक हॉटेल, […]

Read More

सावधान, लग्नात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने वधू-वराच्या पित्याला ठोठावला दंड

प्रतिनिधी कुऱ्हेपानाचे >> सावधान, तुम्ही वधू-वराचे पालक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याने कुऱ्हे पानाचे येथील (ता.भुसावळ) येथील रेणुका नगरातील वधू-वर पित्यासह बँड पथकाला ग्रामपंचायतीने दोन हजार रुपये दंड ठोठावला. लग्न समारंभात कोरोनाचे नियम तोडल्याने झालेली ही गावातील पहिलीच कारवाई ठरली. सोमवारी (दि.१५) रेणुका नगरात लग्न समारंभाचे आयोजन केले होते. […]

Read More

आरोपीची भेट नाकारल्याने या शहरातील एपीआयला धक्काबुक्की

प्रतिनिधी वरणगाव >> अटकेतील आरोपीला भेटू न दिल्याच्या रागातून पोलिसांना शिविगाळ आणि सहायक पोलिस निरीक्षकांना धक्काबुक्की झाल्याचा खळबळजनक प्रकार रविवारी रात्री वरणगाव पोलिस ठाण्यात झाला. याप्रकरणी पोलिसांनी संबंधितास अटक केली. झडतीत त्याच्याजवळ चाकू आढळला. गिरीश देविदास तायडे (वय ३६, रा.खडका, ता.भुसावळ) हा रविवारी (दि.१४) रात्री १० वाजता वरणगाव पोलिस ठाण्याच्या आ‌वारात आला. त्याने वरणगाव पोलिसांच्या […]

Read More
https://www.google.com/search?q=special+six+train+for+travelers+news&rlz=1C1CHBF_enIN914IN914&sxsrf=ALeKk02D1R46BYw9taNSS4trkxoKc4YDvA:1601092929769&source=lnms&tbm=isch&sa=X&ved=2ahUKEwia6NL694XsAhXd73MBHUgtBOcQ_AUoA3oECA0QBQ&biw=1366&bih=625#imgrc=XkWHwVSlE2afRM

१०२ फुकट्या रेल्वे प्रवाशांना ६३ हजार दंड

प्रतिनिधी भुसावळ >> फुटके प्रवाशांवर कारवाईसाठी रेल्वे प्रशासनाने भुसावळ जंक्शनवर शुक्रवारी अचानक तिकीट तपासणी मोहीम राबवली. त्यात १०२ प्रवाशांकडून ६३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील, मंडल वाणिज्य प्रबंधक बी.अरुणकुमार, सहाय्यक प्रबंधक आणि मुख्य तिकीट निरीक्षक अहुवालिया यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तिकीट तपासणी निरीक्षक वाय.डी.पाठक यांच्या नेतृत्वात ही […]

Read More

वरणगावच्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू

वरणगाव >> वरणगाव येथील नारी मळ्यातील रहिवासी विजय एकनाथ माळी (वय २८) याचा भोगावती नदीत बुडून मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. वरणगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. मजुरी करून चरितार्थ चालवणाऱ्या एकनाथ माळी यांचा एकुलता एक मुलगा विजय याचा मंगळवारी अक्सा नगरकडे जाणाऱ्या भोगावती नदीत बुडून मृत्यू झाला. गुरुवारी त्याचा मृतदेह […]

Read More

नवीन चावी बनवून देण्याचा बहाणा, कपाटातून दीड लाखाचे दागिने लंपास

भुसावळात दीड लाख रुपयांचे दागिने चोरट्याने लांबवले भुसावळ >> शहरातील सिंधी कॉलनीतील रहिवासी महिला निर्मल कुकरेजा यांनी मंगळवारी (दि.९) दुपारी २.५० वाजता घरातील कपाटाचे लॉक खराब झाल्याचे सांगत नवीन चावी बनवून देण्यासाठी दोन फेरीवाल्यांना बोलावले. या दोघांनी चावी तयार करण्याच्या कामात गुंतल्याचे दाखवून कुकरेजा यांना थोडासा कापूस हवा आहे, असे सांगितले. त्यासाठी कुकरेजा घरात जाताच […]

Read More

भुसावळ शिंदी गावाजवळ आढळला बोदवडच्या शिक्षकाचा मृतदेह

भुसावळ >> बोदवड येथील न.ह.रांका हायस्कूल मधील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक रुबाब इब्राहिम तडवी (वय ५२) हे मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास भुसावळ तालुक्यातील शिंदी गावाजवळ मृतावस्थेत आढळले. कोरपावली (ता.यावल) येथील रुबाब तडवी (ह.मु. फालक नगर, भुसावळ) हे रांका हायस्कूलमध्ये कार्यरत होते. त्यांनी मंगळवारी सुटी घेतली होती. रात्री बोदवड रस्त्यावरील शिंदी गावापासून एक किमी अंतरावर ते […]

Read More

फायनान्स कंपनीने महिलांकडून जमा केले पैसे, कर्ज देण्यापूर्वीच पोबारा

भुसावळ >> शहरातील पांडुरंग टोकीजजवळ २३ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या ‘समय मायक्रो फायनान्स’ कंपनीने प्रत्येकी एक लाखाचे कर्ज देण्याच्या आमिषाने ७९ जणांकडून प्रत्येकी ३ हजार ७५२ रुपये जमा केले. यानंतर जमा झालेली २ लाख ७२ हजार ७०८ रुपयांची रक्कम घेवून कंपनीने कार्यालयास टाळे ठोकून पोबारा केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. यामुळे कर्जासाठी पैसे भरलेल्यांसह एजंट आणि […]

Read More

३० हजारांच्या रोकडसह युवकाला भुसावळात मारहाण ; गुन्हा दाखल

भुसावळ प्रतिनिधी >> शहरातील सुंदर नगराजवळ युवकाला मारहाण करीत त्याच्याकडील 30 हजारांच्या रोकडसह मोबाईल लांबवण्यात आल्याची घटना नुकतीच घडली असून याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. बर्‍हाणपूर जिल्ह्यातील लोणी येथील रहिवासी पराग प्रल्हाद चौधरी याच्या वडीलांवर शहरातील खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असल्याने वडीलांसाठी जेवणाचा डबा […]

Read More

भुसावळात महिलेसह पाच जणांची अत्याचारप्रकरणी चौकशी

भुसावळ प्रतिनिधी >> मध्य प्रदेशातील खरगोन येथील ३५ वर्षीय महिलेवर भुसावळात सोमवारी (दि.२२) रात्री एका तरुणाने अत्याचार केले होते. या आरोपीच्या तपासासाठी तीन पोलिस पथके सक्रिय आहेत. गुरुवारी एका महिलेसह पाच संशयितांची चौकशी करण्यात आली. खरगोन येथील ३५ वर्षीय महिला भुसावळात आली होती. एका अनोळखी तरुणाने तिला दुचाकीवरून ट्रामा केअर सेंटर मागील निर्जन स्थळी नेत […]

Read More

भाजपला भुसावळात खिंडार ! एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत १३ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

जळगाव >> भाजपातून राष्ट्रवादीत पक्षांतर केलेले जेष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जिल्ह्यासह खानदेशात आपला जोर कायम ठेवला आहे. उत्तर महाराष्ट्रात खडसेंचा धडका अद्याप ओसरलेला दिसत नाही. आज भुसावळ नगरपालिकेतील १३ नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी देत खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भुसावळमध्ये अलीकडे घडलेल्या घडामोडींचा आढावा घेतल्यास भाजपच्या चिंता वाढताना दिसत असली, […]

Read More