नातींनी केले आजोबांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; खिर्डीच्या बढे कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

प्रतिनिधी खिर्डी >> रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द येथील अविनाश बढे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या घरात कर्ता पुरुष दुसरा कोणी नसल्याने बढे यांच्या १५ वर्ष वयाच्या उत्कर्षा व भाविका या नातींनी बढे यांना अखेरचे पाणी देऊन अग्निसंस्कार केले. तर मुलींनी खांदा देऊन कुटुंब प्रमुखाचे अंतिम संस्कार केले. या घटनेने बढे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आाहे. […]

Read More

गावठी हातभट्टी उध्वस्त, एकाला अटक ; फैजपूर पोलिसांची कारवाई

मयूर मेढे, फैजपूर, फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील कासवे (ता. यावल) शिवारातील तापी नदीच्या पात्रात सार्वजनिक ठिकाणी गावठी हातभट्टीची दारू गाळण्याची भट्टी फैजपूर पोलिसांनी नष्ठ करत एकाला ताब्यात घेतले आहे. यावेळी कच्चे रसायन व दारु तयार करण्याचे साहित्य म्हणजेच २१.५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जगन कौतुक तायडे (रा.कासवे) […]

Read More

फैजपूर पोलिसांचा अॅक्शन मोड ; रस्त्यावरच थांबवून होणार कोरोना टेस्ट

मयूर मेढे : फैजपूर प्रतिनिधी, एकीकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी १४ एप्रिलच्या रात्रीपासून कडक निर्बंध लावण्याची घोषणा केली आहे. शिवाय, रात्रीची संचारबंदी यापुर्वीच लागू आहे. तरी देखील अनेकजण कारण नसताना बाहेर फिरतात. या पार्श्वभुमीवर फैजपूर शहरात रात्रीच्या वेळी रस्त्यावरून फिरणाऱ्यांची फैजपूर पोलिसांनी अँटीजेन टेस्ट करण्यास व विनामास्क फिरणाऱ्याकडून दंड वसूल करण्यात सुरवात केली आहे. कोरोनाच्या […]

Read More

परिस्थिती गंभीर आहे, रुग्णसेवा सुरु ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने तुमच्या सोबत – आ.मंगेश चव्हाण

आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतली खाजगी कोविड सेंटरच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांची बैठक, चाळीसगाव – कोरोनाच्या पहिल्या लाटेत सरकारी व खाजगी कोविड सेंटर च्या माध्यमातून आपण चांगले काम केले त्यामुळे आपण चाळीसगाव तालुक्यात कोरोनावर नियंत्रण मिळवू शकलो मात्र दुसरी लाट अधिक तीव्र असून रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे, परिस्थिती गंभीर आहे, सर्व […]

Read More

चोपडा शहरात दीड लाखाचा गुटखा जप्त

प्रतिनिधी चोपडा >> शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पाटीलगढी भागात गुरुवारी सकाळी पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दिड लाखांचा गुटखा व साडेतीन लाखाची रिक्षा असा एकूण पाच लाखाचा मुद्देमाल रंगेहाथ पकडून जप्त केला आहे. पाटील गढी भागात गुरुवारी सकाळी गुटखा व सुगंधित पान मसाल्याची रिक्षा येत असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना मिळाली हाेती. […]

Read More

साकळीत दोन दिवसीय कडकडीत लॉकडाऊन ठेवला जाणार का ?

साकळी ता.यावल (वार्ताहर) जिल्हाधिकारी जळगाव यांचे आदेशानुसार कोरोना या महामारीला आळा घालणेसाठी व शासनाकडून पुढील आदेश येईपावेतो नियमानुसार आज दि.१० वार-शनिवार व उद्या दि.११ वार-रविवार या दोन्ही दिवशी तसेच यापुढील येणाऱ्या शनिवार व रविवार रोजी प्रशासनाकडून कडकडीत लॉकडाऊन जाहीर केलेला असल्याने साकळी येथे कोणीही आठवडे बाजार किंवा भाजीपाला विक्रीची मंडई भरवू नये किंवा तसा भरवणेचा […]

Read More

ट्रिपल सीट दुचाकीस्वाराची पोलिसाला मारहाण

प्रतिनिधी भुसावळ >> शहरातील खडकारोड परिसरात ट्रिपलसीट फिरणाऱ्या दुचाकीस्वारान पोलिसासोबत हुज्जत घालत मारहाण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी शहर वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी श्रीकृष्ण चाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कृष्णाकुमार उदयसिंग याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा, बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुरूवारी रात्री दाखल झाला. पोलिस कर्मचारी श्रीकृष्ण चाटे हे कर्तव्यावर असताना संशयित कृष्णाकुमार उदयसिंग दुचाकीवर […]

Read More

मला डॉक्टरांचा अभिमान !! या कोविड सेंटरला ३५ खासगी डॉक्टर देताहेत मोफत सेवा

प्रतिनिधी >> अमळनेर तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असून शासकीय वैद्यकीय सेवा तोडकी पडू लागल्याने प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्या आवाहनानुसार किमान ३५ खासगी जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर शासकीय कोविड सेंटरला आलटून पालटून मोफत सेवा देत आहेत. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण दाखल करून त्यांच्यावर उपचार करणे सुलभ झाले आहे. तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आणि अत्यवस्थ असणाऱ्या रुग्णांची संख्या […]

Read More

जिल्ह्यात २१ एप्रिलपर्यंत ३७ (३) कलम जारी, जमावबंदी आदेश लागू

जळगाव >> कोरोना संक्रमणाची दुसरी लाट सुरु असून संसर्गावर नियंत्रण सुरू आहे. तरी देखील जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने शासनाने काही अटी व मार्गदर्शक तत्वे निर्गमित केलेले आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात २१ एप्रिल, २०२१ पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) जारी करण्यात आले आहे. या […]

Read More

गोंधळ : कोरोनाची लस न घेताच वॅक्सिनेशन सक्सेसफुलचा मेसेज

प्रतिनिधी| भुसावळ >> जामनेर रोडवरील पंढरीनाथ नगरातील दाम्पत्यास कोरोनाची लस न घेताच ‌‘वॅक्सिनेशन सक्सेसफुल’ असा मेसेज मोबाइलवर आला. यामुळे यंत्रणेचा गलथानपणा समोर आला. यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. तौसिफ खान यांनी दाम्पत्याचे लसीकरण करुन घेतले. वन विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी एस.पी.पाटील व त्यांच्या पत्नी सुषमा पाटील यांनी १३ मार्चला कोविन अॅपवर नोंदणी करुन लसीकरणासाठी ५ एप्रिलची वेळ […]

Read More
civil jalagaon

जीएमसीचा हलगर्जीपणा, आदिवासी रुग्णाचा मृत्यू ; मृताच्या नातेवाइकांचा आरोप

प्रतिनिधी जळगाव >> चोपडा तालुक्यातील कोरोना बाधित आदिवासी रुग्णाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला, हलगर्जीपणाने व आदिवासी असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज मिळावे, अशी मागणी करत शहर पोलिस ठाण्यासह राज्यपालांकडे तक्रार केली आहे. प्रदीप पावरा यांना २९ मार्च रोजी सकाळी श्वास घेण्याचा त्रास होत असल्याने […]

Read More

नशिराबादला ४३ वर्षीय प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

प्रतिनिधी नशिराबाद >> मुक्तेश्वर नगरातील ४३ वर्षीय प्रौढाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. ते पाहून कुटूंबियांनी एकच आक्रोश केला. याबाबत सुधाकर धोबी यांच्या खबरी वरून नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सुनील दत्तु बोदडे हे सकाळी पत्नीला कामावर सोडुन घरी आले आणि गळफास घेतला. त्यांच्या भाच्याच्या […]

Read More

आमदार मंगेश चव्हाण यांना दर सोमवार, मंगळवारी लावावी लागणार चाळीसगाव पोलिस ठाण्यात हजेरी

प्रतिनिधी जळगाव >> महावितरणचे अधीक्षक अभियंता मोहम्मद फारुक शेख यांना मारहाण केल्याप्रकरणी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांना सोमवारी जिल्हा न्यायालयाने अटीशर्तींवर जामीन मंजूर केला. न्यायाधीश छाया पाटील यांच्या न्यायालयात आमदार चव्हाण यांच्यासह सर्व संशयितांच्या जामीन अर्जावर दोन्ही पक्षांचे युक्तिवाद १ एप्रिल रोजी पूर्ण झाले होते. दरम्यान, सोमवारी न्यायालयाने सर्वांना जामीन अर्ज मंजूर केले. […]

Read More

लग्नात ५० पेक्षा जास्त वऱ्हाडी आल्याने येवतीला वधू पित्यावर गुन्हा दाखल

प्रतिनिधी बोदवड >> तालुक्यातील येवती येथे रविवारी लग्नसमारंभात ५० पेक्षा जास्त वऱ्हाडी आढळल्याने सरपंचांच्या तक्रारीवरून लग्न आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नात डीजे लावून समारंभ सुरू होता. तेथे शंभर ते दीडशे वऱ्हाडी जमले होते. त्यामुळे सरपंच संजय पाटील यांच्या फिर्यादीवरून वधूचे वडील भारत बोदडे, भगवान सोनवणे (रा.येवती), विकास झनके, राहुल भारंबे, मिलिंद पाटील (रा.दुधलगाव […]

Read More
civil jalagaon

जळगाव, चोपडा, अमळनेर, भुसावळ तालुक्यांतील सर्व रुग्णालये फुल्ल!

प्रतिनिधी जळगाव >> कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. गेल्या आठवड्याभरात जळगाव शहरासह चोपडा, भुसावळ, अमळनेर तालुक्यात रुग्णसंख्या वाढली आहे. परिणामी रुग्णालये फुल्ल झाल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. गेल्या आठवड्यात जळगाव शहरात २०४५ तर चोपडा तालुक्यात तब्बल २३१५ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून शहरापेक्षा चोपडा तालुक्याची संख्या अधिक झाल्याने आरोग्य यंत्रणा […]

Read More

२१ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, घटनेचे कारण अस्पष्ट

प्रतिनिधी जळगाव >> आसोदा गावात राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. एक एप्रिल रोजी ही घटना घडली. या घटनेमागचे कारण स्पष्ट झाले नाही. चेतन दिलीप चौधरी (वय २१, रा. आसोदा) असे मृत तरुणाचे नाव आहे. चेतन याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना त्याचे नातेवाईक भरत चौधरी यांच्या लक्षात आली. त्यांनी […]

Read More

साकळीचे बस स्टँड ठरत आहे ‘ शोपीस ‘!

■महिला प्रवाश्यांची मोठी गैरसोय■दुरुस्तीची मागणी साकळी ता.यावल (वार्ताहर) येथील बसस्टॅन्डची फार मोठया प्रमाणात पडझड झाल्याने दुरावस्था झालेली आहे.तर आता हे बसस्टँड शेवटची घटिका मोजत असून ते बसस्टँड नुसते नावालाच उरले आहे. या बस स्टॅन्ड मध्ये बसायला जागा नसल्यामुळे महिला प्रवाशांना कुठे बसावे ?असा प्रश्न पडत असतो. याठिकाणी बसायला जागा नसल्याने महिला प्रवाशां सह सर्व प्रवाशांची […]

Read More

कोरोनाला रोखण्यासाठी पुन्हा जिल्ह्यात हे शहर उद्यापासून ३ दिवस बंद

अमळनेर प्रतिनिधी>> शहर व ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण पाहता प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी पुन्हा शनिवार व रविवार असे दोन दिवस तर पालिकेने सोमवारी शहरात बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अमळेनर शहरात तीन दिवस कडकडीत बंद पाळला जाणार आहे. सोमवारी जनता कर्फ्यू असल्याने शहरातील आठवडे बाजार बंद राहणार आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची साखळी […]

Read More

एकाच कुटुंबातील ५ जणांचा कोरोनाने घेतला बळी!

प्रतिनिधी सावदा >> येथील शिवाजी चौकातील रहिवासी परदेशी कुटुंबावर काळाने घाला घातला. या परिवारात यापूर्वी अवघ्या चार दिवसात चौघांचा मृत्यू झाला होता. हा दु:खाचा डोंगर कमी म्हणून की काय याच कुटुंबातील राजूसिंग परदेशी (वय ५९) यांनी ३१ मार्चला रात्री ११.३० वाजता जिल्हा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सात दिवसांत एकाच कुटुंबातील ५ जण दगावल्याने संपूर्ण शहर […]

Read More

रावेर तालुक्यातील २७ वर्षीय विवाहितेवर अत्याचार

प्रतिनिधी रावेर >> तालुक्यातील केऱ्हाळा बुद्रूक येथील २७ वर्षीय विवाहितेवर त्याच गावातील व्यक्तीने लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून अरुण सुभाष प्रजापती याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. आरोपी मात्र पसार झाला आहे. केऱ्हाळा बुद्रूक येथील २७ वर्षीय पीडित विवाहिता २६ मार्चला दुपारी १२ वाजता अरुण सुभाष प्रजापती याच्या राहत्या घराच्या छतावर दाळ वाळत घालण्यासाठी […]

Read More