भाजपला भुसावळात खिंडार ! एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत १३ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

जळगाव >> भाजपातून राष्ट्रवादीत पक्षांतर केलेले जेष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जिल्ह्यासह खानदेशात आपला जोर कायम ठेवला आहे. उत्तर महाराष्ट्रात खडसेंचा धडका अद्याप ओसरलेला दिसत नाही. आज भुसावळ नगरपालिकेतील १३ नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी देत खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भुसावळमध्ये अलीकडे घडलेल्या घडामोडींचा आढावा घेतल्यास भाजपच्या चिंता वाढताना दिसत असली, […]

Read More

महाजन-बढे यांच्या भेटीमुळे वरणगावचे राजकारण तापले

वरणगाव >> वरणगाव पालिका निवडणुकीचे पघडम वाजण्यास सुरुवात होताच पडद्याआड राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यादृष्टीने माजी मंत्री गिरीश महाजन आणि संजय सावकारे यांनी वरणगाव गाठून चंद्रकांत बढे यांची घेतलेली भेट राजकीय पटलावर लक्षवेधी ठरली आहे. ही भेट बढे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून झालेली असली तरी गेल्या काही महिन्यात शहरातील राजकीय घडामोडी पाहता भाजपने पालिका […]

Read More

एकनाथ खडसेंची अटक टाळण्यासाठी आटापिटा, मात्र दिलासा देण्यास ईडीचा विरोध

मुंबई >> भाजपातून राष्ट्रवादीमध्ये पक्षांतर झालेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी ईडीच्या नोटीसविरोधात याचिका दाखल केली आहे. ईडीने अटकेची कारवाई करू नये, यासाठी एकनाथ खडसे यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. ईडीने आपले प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले. त्यानुसार एकनाथ खडसेंना अटकेपासून दिलासा देण्यास ईडीचा विरोध आहे. एकनाथ खडसेंच्यावतीने वकिलांनी युक्तिवाद केला. […]

Read More

२४ वर्षीय विवाहित तरुणाने अडीचला केले मतदान अन ३ वाजता गळफास घेत आत्महत्या

चाळीसगाव प्रतिनिधी >> ग्रामपंचायतीसाठी मतदान केल्यानंतर अवघ्या अर्धा तासाने वडगाव लांबे (ता.चाळीसगाव) येथील २४ वर्षीय विवाहित तरुणाने घरात गळफास घेत आत्महत्या केली. सचिन डोंगरसिंग घोरपडे असे मृत तरूणाचे नाव आहे. दुपारी २.३० च्या सुमारास सचिनने मतदान केले. तेथून घरी परतल्यावर त्याने आई व मोठ्या वहिनींना मतदानासाठी पाठवले. यावेळी सचिनचे वडील व भाऊ शेतात गेले होते. […]

Read More

वडिलांच्या अंत्यविधीनंतर तिन्ही भावांनी केले मतदान

ऐनपूर >> येथील रहिवासी सुखदेव वामन महाजन (वय ७९) यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार झाले. या दु:खाच्या प्रसंगातही त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी अंत्यविधीनंतर मतदान केले. त्यात त्यांच्या तिन्ही मुलांचाही समावेश होता. वाॅर्ड क्रमांक तीनमध्ये असलेल्या या मतदारांनी लोकशाहीचा आदर करत मतदानाला प्राधान्य दिले.दु:खातही स्व.महाजन यांच्या पत्नी, तीन मुले, तीन सुना […]

Read More

भाजपच्या जि. प. सदस्य पल्लवी सावकारेंचे नाव मतदार यादीतून गायब

भुसावळ >> निंभोरा-पिप्रींसेकम या गटातील भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांचे नाव मतदार यादीतून गायब झाले आहे. याबाबत सावकारे यांनी प्रांत, तहसीलदारांकडे तक्रार केली. सावकारे गेल्या चार ते पाच वर्षांपासून याच गटात मतदान करतात. मतदारांच्या अंतीम याद्या तयार झाल्या त्यावेळी त्यांचे नाव यादीत होते. मात्र, आता त्यांचे नाव मतदार यादीत नाही. शुक्रवारी मतदानावेळी मतदार […]

Read More

जामनेर तालुक्यात तलवार-चाकू हल्ला ; दोन जण गंभीर जखमी

जामनेर प्रतिनिधी >> तालुक्यातील देवपिंप्री ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारावरून गुरूवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास वाद उद्भवला. यातून तलवार व चाकूहल्ला झाला असून दोन जण जखमी झाले. यात परस्परांविरुद्ध तक्रारी दाखल झाल्या आहेत. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मतदानाच्या पूर्वसंध्येला झालेल्या प्रकारामुळे निवडणुकीला गालबोट लागले. एका गटातर्फे भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तुकाराम निकम यांच्यासह सहकाऱ्यांविरूध्द जामनेर पोलिस […]

Read More

यावल तालुक्यातील ग्रा.पं.निवडणूक उमेदवारांची सोशल मिडियामध्ये बदनामी ; गुन्हा

यावल प्रतिनिधी >> अट्रावल ग्राम पंचायतच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारांची सोशल मिडीयातून बदनामी केल्याप्रकरणी संबंधित ग्रुपसह एका विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यात ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असुन, गावपातळीवर ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व उमेदवारांनी आपआपल्या प्रचारात आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे यंदा मात्र प्रथम निवडणुकीत सोशल नेटवर्कच्या माध्यमातुन प्रचार मोठया प्रमाणावर वाढला आहे. […]

Read More

निवडणुकीमुळे बहिणाबाई चौधरी विद्यापीठाने पुढे ढकलल्या परीक्षा

जळगाव प्रतिनिधी >> ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान असल्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांच्या १५ जानेवारीला होणाऱ्या ऑनलाइन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१मधील कला, विज्ञान व वाणिज्य पदवी, व्यवस्थापनशास्त्र अभासक्रमांतर्गत २, ४ व ६ या सत्रातील बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन एमसीक्यू स्वरूपात ५ जानेवारीपासून सुरू होत आहेत. जिल्ह्यात […]

Read More

रावेरात शिवसेनेची उद्या जिल्हा बैठक ; संपर्कप्रमुख येणार

रावेर >> शिवसेना जळगाव लोकसभा मतदारसंघाची बैठक शुक्रवारी शहरात आयोजित करण्यात आली आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत हे उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी दुपारी २ वाजता सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, आंबेडकर मार्केट येथे ही बैठक होईल. बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत उपस्थित राहणार आहेत. बैठकीला आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, […]

Read More

अमळनेर पंचायत समितीच्या सभापतीची आज होणार निवड

अमळनेर प्रतिनिधी गजानन पाटील >> अमळनेर पंचायत समितीच्या सभापती रेखा नाटेश्वर पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सभापती पदाची निवडणूक २४ डिसेंबरला सकाळी ११ वाजता घेण्यात येणार आहे. निवडणुकीस पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार मिलिंद वाघ राहतील. त्यांना गटविकास अधिकारी संदीप वायाळ सहाय्य करतील. ही जागा जनरल महिला राखीव असल्याने यात महिलांमध्ये चुरस रंगणार […]

Read More

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आजपासून नामनिर्देशन स्वीकृती

जळगाव प्रतिनिधी >> जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुक १५ जानेवारीला होणार आहे. यासाठी बुधवारपासून (ता.२३) प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयात नामनिर्देशन अर्ज विक्री व स्वीकृती केली जाणार आहे. यासाठी ११ ते दुपारी ३ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. तहसील कार्यालयातून विक्रीतहसील कार्यालयातून या अर्जाची विक्री व अर्ज स्वीकृत केले जाणार […]

Read More

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी घेतली आढावा बैठक

यावल, प्रतिनिधी >> तालुक्यातील ग्राम पंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर झाल्यापासुन निवडणुक लढविण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जोळणीसाठी तहसील कार्यालयात नागरीकांनी एकच गर्दी केली असल्याने तहसील कार्यालयास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यावल तालुक्यातील या निवडणुकीसाठी नेमणुक करण्यात आलेल्या निवडणुकी निर्णय अधिकारी यांची एक निवडणुक प्रक्रिया संदर्भातील महत्वपुर्ण […]

Read More

जळगाव जिल्हा ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस लावणार ताकद

जळगाव >> ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्हाभरात निवडणुकीच्या राजकीय तयारीला वेग आला आहे. यासंर्दभात काँग्रेस पक्षाने सोमवारी पक्ष कार्यालयात बैठक घेऊन आढावा घेतला. या वेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पूर्ण ताकदीने ग्रामपंचायत निवडणुक लढण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. बैठकीला जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, जिल्हा प्रभारी प्रकाश मुगदीया, प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, […]

Read More

प्रत्येक ग्रामपंचायतला भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिक, युवा सैनिकांनी सज्ज रहावे : गुलाबराव पाटील

धरणगाव >> आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींमधील अधिकाधिक जागा जिंकून भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिक व युवा सैनिकांनी सज्ज रहावे. तर अधिकाधिक ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जागृत राहावे, असे आवाहन शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांनी केले. येथील जी. एस. लॉन येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. धरणगाव तालुक्यातील ७० ग्राम पंचायतींपैकी तब्बल ४७ ग्रामपंचायतीत सार्वत्रिक […]

Read More

रावेर तालुक्यातील ४८ ग्रा.पं.साठी३७ निवडणूक निर्णय अधिकारी

रावेर प्रतिनिधी >> राज्यात जाहीर झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांतर्गत रावेर तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी या प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. तालुक्यात ४८ ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ३७ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे तहसीलदार उषाराणी देवगुणे […]

Read More

यावल तालुक्यातील ४७ ग्रा.पं.च्या निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर

यावल प्रतिनिधी >> तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मंगळवारी येथील तहसीलदार महेश पवार यांनी अधिसूचना जाहीर केली. तसेच संपूर्ण ग्रामपंचायत निहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक देखील करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या सोमवारी प्रसिद्ध झाल्या होत्या. तर आता निवडणूक अधिसूचना जाहीर झाल्यानंतर तालुक्यातील त्या -त्या गावांमध्ये तलाठी कार्यालयात ही निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. तहसील […]

Read More