कर्ज, नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
पाडळसरे >> येथून जवळच असलेल्या सबगव्हाण येथील जिजाबराव माधवराव पाटील (वय ४५) या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून, बुधवारी सकाळी ९ वाजता स्वत:च्या शेतात निंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत जिजाबराव पाटील यांच्याकडे सहा बिघे कोरडवाहू शेती आहे. त्यात त्यांनी यंदा कापूस लागवड केली होती. मात्र, बोंडअळी आणि अतिवृष्टीमुळे त्यांना कपाशीचे अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. […]
Read More