चोपड्यात गांजा तस्कराला अटक ; ८ किलो गांजासाहित १ लाख ४० हजाराचा माल जप्त

क्राईम चोपडा

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील ::> दि. ५ ऑक्टोबर रोजी शहरातील कारगील चौकातून अवैध दारू व बनावट हत्यार तस्करी बाबत चोपडा पोलिसांना माहिती मिळाल्याने एकास अटक करून १ लाख ४२ हजार १०० रुपयाचा माल जप्त केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एक जण अवैध दारू व गांजासह बनावट हत्यार घेऊन जात असल्याची माहिती चोपडा पोलिसांना मिळाली. त्यानुसार आज ५ ऑक्टोबर रोजी यावल कडून आरोपी राकेश हुंध्या बारेला रा. जामठी ता. वरला जि. बडवाणी (मध्यप्रदेश) येथून दुपारी चार वाजेच्या सुमारास दुचाकीवरून अवैध माल घेऊन जात असताना त्यास सापळा रचून अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, राकेश बारेला याच्याजवळ मोटारसायकल क्र. MP04.MJ342 ने ८ किलोच्या जवळपास गांजा व अमली पदार्थ वाहनासह त्याच्याकडून १ लाख ४२ हजार १०० रुपयाचा माल चोपडा पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आले आहे.

कारवाई यांनी केली.
सदरील कारवाई ही चोपडा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, सपोनि मनोज पवार, पोहेकॉ. जितेंद्र सोनवणे, पोहेकॉ. प्रकाश मथुरे, हेमंत कोळी ,प्रमोद पवार आदींनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *