बोदवड तालुक्यात २७ वर्षीय महिलेचा विनयभंग; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

क्राईम निषेध पाेलिस बोदवड

बोदवड >> तालुक्यातील वडजी येथील महिलेच्या विनयभंग प्रकरणी दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. शुक्रवारी रात्री ८ वाजता २७ वर्षीय महिला घराजवळील शौचालयात गेली असता संतोष पुंडलिक सावकारे याने तिचा विनयभंग केला. या प्रकाराने फिर्यादीचा भाऊ संतोष व प्रदीप सावकारे यांना समजावण्यासाठी गेला असता त्याच्या हातावर चाकूने वार केले. या प्रकरणी संतोष पुंडलिक सावकारे, प्रदीप गोविंदा सावकारे यांचेवर गुन्ह दाखल झाला.