माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा बोदवड पंचायत समितीतून हटवला फोटो

बोदवड सिटी न्यूज

बोदवड ::> पंचायत समितीच्या बांधकाम विभागात लावलेला एकनाथ खडसे यांचा फोटो काढण्यासंदर्भात युवासेनेने मंगळवारी, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) आर.बी.सपकाळे यांना निवेदन दिले. तसेच फोटो न हटवल्यास आंदोलनाचा ईशारा दिला. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटात खडसे यांचा फोटो काढण्यात आला.

ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकानुसार शासकीय कार्यालयात जिल्हास्तरीय अथवा राज्यस्तरीय राजकीय व्यक्तींचे फोटो लावण्यास प्रतिबंध आहे. तरीही बोदवड पंचायत समिती कार्यालयातील शाखा अभियंत्यांच्या दुर्लक्षामूळे बांधकाम विभागात खडसे यांचा फोटो लावलेला होता. त्यामुळे ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकाचे उल्लंघन झाले असल्याने हा फोटो तात्काळ काढण्याची मागणी युवासेनेने केली होती. त्यानुसार खडसे यांचा फोटो हटवण्यात आला.

निवेदन देतांना युवासेना ऊपजिल्हा प्रमुख पवन सोनवणे, शिवसेना तालुका संघटक शांताराम कोळी, शहरप्रमूख हर्षल बडगुजर, संजय महाजन, कलीम शेख, अमोल व्यवहारे, दीपक माळी, नईम खान, योगेश राजपूत, अमोल पाटील, धनराज पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *