बोदवडात ऑनलाईन कॅशबॅक ऑफरच्या बहाण्याने 99 हजार रुपयांत लुटले

ऑनलाईन-बिनलाइन क्राईम बोदवड

बोदवड प्रतिनिधी ::> फोन-पे वरून कॅशबॅकची ऑफर असल्याची बतावणी करत बँक खात्यातील ९८ हजार ७३१ रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार बोदवड येथे उघडकीस आला. याप्रकरणी बोदवड येथे गुन्हा दाखल झाला.

शहरातील बाजार समितीच्या दुसऱ्या मजल्यावर अनमोल विमा सेवा येथे रवींद्र रमेश पाटील (वय २० रा.प्रभाग क्रमांक १०, महादेव मंदिराजवळ, बोदवड) हे खासगी नोकरी करतात. त्यांना फोन-पे वरून कॅश बॅक ऑफर असल्याचे सांगत ९९३४८२३६२० आणि ७३१९९९८८७८ या क्रमांकावरून कॉल आला.

यानंतर पाटील यांच्या बँक खात्यातून ९८ हजार ७३१ रुपये परस्पर काढून फसवणूक केल्याची घटना १९ ऑक्टोबरला दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी बोदवडला गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस नाईक गजानन काळे करत आहेत.