शिरसोली जळगाव प्रतिनिधि ::> एकीकडे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी दिली. तर दुसरीकडे शिरसोली येथील १५० तरुणांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या तरुणांनी जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्यांमध्ये सूर्यवंशी बारी पंचाचे उपाध्यक्ष अनिल ताडे, रघुनाथ सुंने, उत्तम सुंने, देवराम नागपुरे, रमेश सुंने, कैलास काटोले यांच्यासह उर्वरित युवकांनी प्रवेश केला. याप्रसंगी प्रकाश रोकडे, सचिन पवार, गिरीश वराडे व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
