भाजपाचे जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे मारहाण प्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

Politicalकट्टा कट्टा क्राईम चोपडा

गजेंद्र सोनवणें खाजगी हॉस्पिटलला दाखल

चोपडा ( प्रतिनिधी ) राजेंद्र पाटील ::> अवैध वाळू वाहतुकीची तक्रार केल्याच्या संशयावरून अकुलखेडा-चुंचाळे जिल्हा परिषद गटातील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र पांडुरंग सोनवणे यांना सात जणांकडून भारडू शिवारात घडली होती.या बाबत रात्री उशिरा पर्यंत कोणीच तक्रार दाखल न केल्याने पोलिसांनी स्वतः फिर्याद दिल्याने ग्रामीण पोलीस स्टेशनला नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी पाच आरोपींना चोपडा येथील न्यायालयाने शनिवारी जामीन मंजूर केला आहे.तर जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र सोनवणे शहरातील खाजगी हॉस्पिटलला उपचार घेत असून यांना देखील या घटनेत आरोपी करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र सोनवणे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या विरुद्ध वारंवार महसूल विभागाकडे तक्रार करून भाऊसाहेब हिम्मत बिऱ्हाडे यांचे ट्रॅक्टर पकडून दिल्याच्या संशया वरून जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र सोनवणे यांना जबर मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे.

सदर मारहानीत गावठी कट्ट्याने धाक दाखवला गेल्याने गावठी कट्टा पोलिसांकडून हस्तगत करण्यात आला असून मारहाण करणाऱ्या मध्ये भाऊसाहेब हिम्मत बिऱ्हाडे (रा हिसाळे ता शिरपूर) नंदू छबु शिरसाठ,राजेंद्र बाळकृष्ण बोरसे (दोघे रा.अनवर्दे ),पंडित हिंमत सोनवणे अजय कैलास बाविस्कर,शिवाजी विनायक सैंदाणे (तिघे रा.बुधगाव) बापू महारू कोळी (रा.जळोद ता अमळनेर) तसेच मारहाण झालेल्या गजेंद्र पांडुरंग सोनवणे (रा.हातेड बु!) व सोबत असलेले एकाचे नाव माहीत नाही.अश्या नऊ जणांवर ग्रामीण पोलीस स्टेशनला शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान नऊ पैकी पाच आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन मंजूर केला आहे.यात २७ हजार किंमतीची लोखंडी बनावटीचा कट्टा हस्तगत करण्यात आला आहे . पोहेकॉ संजय येदे यांच्या फिर्यादीवरून नऊ जणां विरोधात भादवि कलम १४३,१४८ १४९,३२४,आर्म ऍक्टस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आराक यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.शिवाजी बाविस्कर करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *