भाजपचे आमदार राजूमामा भोळे यांना कोरोनाची लागण

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव प्रतिनिधी >> जळगावचे आमदार तथा भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी घेऊन काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

जळगावचे आमदार तथा भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांची कोविड चाचणी पॉझिटीव्ह आलेली आहे. आ. राजूमामा भोळे यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून आपल्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेऊन स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.