खासदार रक्षा खडसेंच्या मुक्ताईनगर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Politicalकट्टा कट्टा मुक्ताईनगर

मुक्ताईनगर >> तालुक्यातील बोरखेडा (जुने) येथील भारतीय जनता पक्षाचे माजी उपसरपंचासह कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि.९) शिवसेनेत प्रवेश केला.

मुक्ताईनगर येथील आमदार कार्यालयात शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांचे उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

यावेळी शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, माजी उप जिल्हाप्रमुख गोपाळ सोनवणे, बोरखेडा जुने येथील ज्ञानेश्वर पाटील, विनोद चव्हाण, सागर पाटील, शिवाजी पवार, बाळू पाटील (हिवरे), स्वीय सहायक प्रवीण चौधरी, प्रशांत पाटील यांची उपस्थिती होती. प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी उपसरपंच वनील चव्हाण, रमेश चव्हाण, रामदास बोरसे, रंगलाल चव्हाण, सुभाष चव्हाण, मोतीलाल जाधव, नवल चव्हाण यांचा समावेश आहे.