चाळीसगावात भाजपच्या नगरसेवकाविरुद्ध उपोषण ; सातबारा उताऱ्यात अफरातफर केल्याचा आरोप

Politicalकट्टा आंदोलन कट्टा चाळीसगाव निषेध

चाळीसगाव प्रतिनिधी >> भाजप नगरसेवक शेखर कन्हैय्यालाल बजाज व हिराचंद चंदीराम बजाज यांनी सातबारा उताऱ्यात हेराफिरी करून फसवणूक केल्याचा आरोप टाकळी प्र.चा. येथील मोहन शंकर साठे व गणेश शंकर साठे यांनी केला आहे.

या अफरातफरीच्या विरोधात दोघेही सोमवारपासून तहसील कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणास बसले आहेत. २३ नोव्हेंबर २०२० रोजी सरकारी मोजणी पूर्ण केली असून माझा पोटहिस्सा हा पूर्ण करून मिळावा व बजाज यांनी सन १९९७ पासून आपल्या जमिनीचा जो कब्जा घेतला, त्या २३ वर्षाची नुकसान भरपाई मिळावी.

तसेच बजाज यांनी पदाच्या बळावर कागदपत्रात अफरातफर करून०.२६ आर सातबारा नवीन बोगस केल्याबद्दल त्यांच्या विरूद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी मोहन शंकर साठे व गणेश शंकर याठे यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदाराकडे केली आहे.

या प्रकरणी चौकशी करावी या मागणीसाठी मोहन शंकर साठे व गणेश साठे यांनी सोमवार पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.