गुटखाविक्रीचे रॅकेट; भुसावळात तीन संशयितांना केली अटक

क्राईम भुसावळ

भुसावळ प्रतिनिधी >>शहरातील खडका चौफुलीवर बाजारपेठ पोलिसांनी २३ रोजी ५३ हजारांचा गुटखा पकडला होता. याप्रकरणातील संशयिताने गुटख्याचा साठा जळगावातून आणल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यामुळे बाजारपेठ पोलिसांनी जळगावातील सिंधी कॉलनीतून शुक्रवारी तीन संशयितांना अटक केली. तसेच ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

संशयिताने सिंधी कॉलनी भागातील जे.बी.ट्रेडर्स नावाचे दुकान पोलिसांना दाखवले. त्यामुळे मुख्य संशयित गिरीश राजेलदास खानचंदानी (वय ३५रा.डी-मार्ट जवळ, जळगाव), जयेंद्र मनोहरलाल स्वामी (वय २६, रा.आदर्शनगर, जळगाव) व शेख शकील शेख मासूम (वय ४१, रा.खंडेरावनगर जळगाव) यांना ताब्यात घेऊन ७२ हजार १८७ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.