भुसावळातील रेल्वे हॉस्पिटलमध्ये स्फोट, २ कर्मचारी जखमी

क्राईम भुसावळ

भुसावळ प्रतिनिधी >> रेल्वे हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या खोलीत असलेल्या एसी यंत्रणेत गॅस भरत असतांना अचानक सिलिंडरचा स्फोट झाल्याने त्यात दोन कर्मचारी जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडली. शशी शंकर व अखिलेश कुमार असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्यावर रेल्वे हॉस्पिटलमध्येच उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.

रेल्वे हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या मजल्यावर ऑपरेशन थिएटरच्या जवळील खोलीत वातानुकूलीत यंत्रणेचे काम रेल्वेच्या इलेक्ट्रीक विभागातील कर्मचाऱ्यांकडून सुरू होते, याच वेळी तेथे सिलिंडरचा स्फोट झाला. यात दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.