भुसावळ तालुका पोलिसांनी ६० लिटर गावठी दारू केली जप्त…

भुसावळ

भुसावळ>> मिरगव्हाण येथे गावठी दारूची चोरट्या मार्गाने विक्री करताना भुसावळ तालुका पोलिसांनी एकास पकडले असून त्याच्या ताब्यातून दोन कॅन मधील ५ हजार ४०० रुपये किंमतीची ६० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली असून ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक फौजदार सुनील चौधरी, हवालदार विठ्ठल फुसे, संजू मोंढे, विजय पोहेकर,जगदीश भोई व होमगार्ड शेकोकारे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *