३० हजारांच्या रोकडसह युवकाला भुसावळात मारहाण ; गुन्हा दाखल

क्राईम भुसावळ

भुसावळ प्रतिनिधी >> शहरातील सुंदर नगराजवळ युवकाला मारहाण करीत त्याच्याकडील 30 हजारांच्या रोकडसह मोबाईल लांबवण्यात आल्याची घटना नुकतीच घडली असून याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

बर्‍हाणपूर जिल्ह्यातील लोणी येथील रहिवासी पराग प्रल्हाद चौधरी याच्या वडीलांवर शहरातील खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असल्याने वडीलांसाठी जेवणाचा डबा घेण्यासाठी तो शनिवारी रात्री छायादेवी राका नगरात राहणार्‍या बहिणीकडे दुचाकी (क्र.एम.एच.19-7712) ने जात असताना वाटेत सुंदर नगरजवळ मोबाईल वाजल्याने तो थांबला.

त्याचवेळी चार अज्ञात संशयीतांनी त्याच्या डोक्यावर वार केला. त्यामुळे अर्धवट बेशुद्ध होताच संशयितांनी परागच्या खिशातून पाकिट व मोबाईल काढून घेतला असून ही घटना शनिवारी रात्री ८:१५ वाजेच्या सुमारास घडली आहे.

दरम्यान, पाकिटात 30 हजार रुपये, एटीएम, कागदपत्रे, व्हीजिटींग कार्ड होते. पोलिसांना माहिती कळताच रविवारी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. परीरसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयीतांचा शोध घेतला जात आहे.