जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा फरार आरोपी अखेर पोलिसांच्या गजाआड

भुसावळ

भुसावळ प्रतिनिधी गिरीश पवार :>> येथील इराणी मोहल्ल्यात एकावर प्राणघातक हल्ला करणार्‍या मोहंमद अली लियाकत अली या आरोपीला बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने गजाआड केले आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेले वृत्त असे की, दिनांक १८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास शहरातील इराणी मोहल्ला येथे फिर्यादी नामे मुकदरअली सलीमअली जाफरी (वय – ४० रा. ख्वाजा नगर अमळनेर) हे भुसावळ येथील ईराणी मशिदीतुन नमाज पडुन बाहेर आले होते.

याप्रसंगी आरोपी नामे मोहंमद अली लियाकत अली (वय – २८ रा.ईराणी मोहल्ला भुसावळ) व फिर्यादीस अख्तर अली से झगडा करेंगा तो मे तुम्हे जिंदा नही छोडुंगा असे बोलुन मोहंम्द अली लियाकत अली ईराणी याने त्याच्या जवळ असलेल्या चाकुने फिर्यादिस उजव्या हाताच्या खांदयावर व उजव्या बाजुला पोटात वार केले. यात ते गंभीर जखमी झाले होते.

या अनुषंगाने मुकम्मर अली यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २०.८.२०२० रोजी भु.बा.पेठ पो.स्टे ला भाग ५ गु.र.न ७८६/२०२० भा.द.वी क.३०७( जीवे ठार मारण्याच्या उदेशाने गंभीर दुखापत करणे ) ५०४,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून या गुन्हयातील आरोपी हा फरार झाला होता.

दरम्यान, आरोपी मोहमंद अली लियाकत अली ईराणी हा रेल्वेने बाहेर गावी पळुन जान्याच्या तयारीत असतांना स्टेशन परीसरात आला असल्याची गुप्त माहीती पो.नि. दिलीप भागवत यांना मिळाल्याने त्यांनी पथक तयार करून त्याला अटक केले.

ही कारवाई पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले, अप्परअधिक्षक भाग्यश्री नवटके, डीवायएसपी गजानन राठोड, बाजारपेठ पोलीस स्थानकाचे निरिक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.अनिल मोरे, पो.ना रविंद्र बिर्‍हाडे, समाधान पाटील, किशोर महाजन, रमण सुरळकर,महेश चौधरी पो.कॉ कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी,बंटी कापडणे; होमगार्ड गौरव शाक्या, रविंद्र वरणकर यांच्या पथकाने केली. या गुन्हयाचा तपास स.पो.नि.अनिल मोरे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *