भुसावळ शहरातील धम्मनगरात भांडणातून तलवारीने डोक्यावर वार ; एकावर गुन्हा दाखल

क्राईम भुसावळ

भुसावळ >> शहरातील धम्मनगरात लाकडी बल्ली काढण्यावरून हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री १० ते १०.३० वाजता घडली. या घटनेत तलवारीचा वापर करण्यात आला. त्यामुळे शहर पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

धम्मनगरातील रहिवासी प्रमोद भिका नरवाडे यांनी घरी जातांना रस्त्यावरील लाकडी बल्ली काढली. त्याचा राग आल्याने दीपक शंकर खराटे यांनी नरवाडे यांना शिविगाळ केली. तसेच तलवारीने प्रमोद नरवाडे यांच्या दोक्यावर वार केला. या प्रकरणी नरवाडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *