भुसावळ-कंडारीत ३० वर्षीय युवतीची आत्महत्या

आत्महत्या क्राईम भुसावळ

भुसावळ >> शहरालगतच्या कंडारी येथे अंजली किसन वाघमारे (वय ३०) या युवतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

नागसेन कॉलनीतील रहिवासी अंजली किसन वाघमारे या युवतीने रविवारी दुपारी ४ वाजता आत्महत्या केली. सहायक पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी, हवालदार नागेंद्र तायडे, विकास बाविस्कर यांनी घटनास्थळी पंचनामा केला. युवतीचा मृतदेह पालिका रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. विच्छेदनानंतर वस्तुस्थिती समोर येणार आहे.