शहिद भगतसिंग वाडा,भालोद येथे रक्तदान शिबीर संपन्न

Social कट्टा यावल

यावल प्रतिनिधी :>>
दि.२५ अॉगस्ट २०२० रोजी
कै.गिरधर शेठ नेहेते फाऊंडेशन व एकता गणेश उत्सव शहिद भगतसिंग वाडा,भालोद यांच्या मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.त्यासाठी जळगांव येथील माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीचे सहकार्य मोलाचे ठरले. त्यात एकूण ३९ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

शिबीराचे उद्घाटन जळगांव जिल्हा बँक संचालक मा.श्री.गणेश दादा नेहेते यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री.नितीन लहू चौधरी,मनोज जावळे,मोहन जावळे,भास्कर पिंपळे,गिरीष महाजन ,भालोद गावचे पोलीस पाटील लक्ष्मण लोखंडे हे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुरलीधर इंगळे ,शिरीष नेहेते,राजेंद्र नेहेते,धनराज इंगळे,रोशन इंगळे,प्रशांत परतणे,हेमंत परतणे,देवेंद्र नेहेते,प्रतिक भिरुड ,स्वप्निल बरडे,सेवकराम नेहेते , लोकेश वारके व एकता गणेश मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक अमोल परतणे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम हा सर्व कार्यकर्त्यांनी तोंडाला मास्क लावून व सोशल डिस्टंन्सिग या नियमांचे पालन करून पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *