भादली प्रतिनिधी >> जळगाव तालुक्यातील भादली खुर्द येथे मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास ७५ वर्षीय वृद्धाने घरातील पंख्याला साडीने गळफास लावून आत्महत्या केली.
रघुनाथ पांडुरंग पाटील (वय ७५, रा. भादली खुर्द) असे मृताचे नाव आहे. त्यांचा मृतदेह कुटुंबीयांना पंख्याला साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर कुटुंबीयांनी आक्रोश केला.
मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला होता. वृद्धाच्या आत्महत्येमागचे कारण स्पष्ट झालेले नाही.
या प्रकरणी भादली खुर्दचे पोलिस पाटील सुरेश बोरसे यांच्या माहितीवरुन तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.