मोदींनी ‘ही’ गोष्ट केल्यास आम्ही भाजपमध्ये प्रवेश करू ; बच्चू कडू यांचं मोठं विधान

Politicalकट्टा कट्टा महाराष्ट्र

रिड जळगाव टीम ::> केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना आता राज्याचे मंत्री बच्चू कडू यांनी देखील विरोध केला आहे.

बच्चू कडू यांनी कृषी विधेयकावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

बच्चू कडू म्हणाले की, आम्ही हे बिल जसेच्या तसे स्वीकारायला तयार आहोत. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे नेहमी ५६ इंच छाती असल्याचे सांगतात, तसे नरेंद्र मोदींनी या विधेयकामध्ये केवळ दोन ओळी टाकाव्यात.

शेतकऱ्यांना 50 टक्के नफा धरून भाव देऊ व याच भावात शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करू, असं कृषी विधेयकांमध्ये नरेंद्र मोदींनी नमूद केल्यास आम्ही भाजपात प्रवेश करु,असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *