यावल तालुक्यातील ग्रा.पं.निवडणूक उमेदवारांची सोशल मिडियामध्ये बदनामी ; गुन्हा

Politicalकट्टा अट्रावल कट्टा क्राईम निवडणूक यावल सिटी न्यूज

यावल प्रतिनिधी >> अट्रावल ग्राम पंचायतच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारांची सोशल मिडीयातून बदनामी केल्याप्रकरणी संबंधित ग्रुपसह एका विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यात ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असुन, गावपातळीवर ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व उमेदवारांनी आपआपल्या प्रचारात आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे यंदा मात्र प्रथम निवडणुकीत सोशल नेटवर्कच्या माध्यमातुन प्रचार मोठया प्रमाणावर वाढला आहे. यातचं निवडणुकीचे प्रचार करतांना एकमेकांविरूद्ध चिखलफेक व बदमामी करण्याच्या प्रकारात वाढ होतांना देखील दिसत आहे. यावल तालुक्यातील प्रसिद्ध अट्रावल ग्रामपंचायत निवडणुकीत आमदारांसह ११ उमेदवारांची सोशल नेटवर्कवर बदनामीकारक मजकूर टाकू बदनामी केल्याप्रकरणी संबंधीत ग्रुपसह एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

संदेश यशवंत पाटील (रा.अट्रावल, ता.यावल) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गावातील डिगंबर पंडीत कोळी याने आपल्या मोबाईलच्या सोशल नेटवर्कवर अट्रावल ग्रामपंचायतीच्या सार्वत्रीक पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस प्रणित महाविकास एकता पॅनलच्या प्रचार प्रॉम्प्लेटचा फोटो काढुन बदनामी कारक मजकुर लिहुन स्टेटसवर ठेवत गावातील जय वाल्मिक संघटना ग्रुप ह्या व्हाट्सअप ग्रुप वर पाठवून बदनामी केली असुन आमदार शिरीष चौधरी यांची तसेच महाविकास एकता पॅनलच्या ११ उमेदवार यांची बदनामी केल्याप्रकरणी संबंधित ग्रुप सह एकाविरुद्ध व अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त असुन , या घटनेचा तपास पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार हे करीत आहे.