अर्णब गोस्वामीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; काँग्रेसचे आंदोलन

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव प्रतिनिधी >>अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. ही कारवाई होण्याच्या तीन दिवस आधीच अर्णब गोस्वामीकडे ही माहिती होती. हा देशद्रोहाचा गुन्हा असून त्याच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. यासाठी शुक्रवारी काँग्रेसने राज्यभर आंदोलन केले.

जिल्हा काँग्रेस कमेटीने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन केले. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, प्रदेश उपाध्यक्ष डॉ..उल्हास पाटील, प्रदेश सरचिटणीस डी. जी. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक डॉ..सुरेश पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील, राजीव पाटील, दिलीप पाटील, भगतसिंग पाटील, अॅड. अविनाश भालेराव, देवेंद्र मराठे, सचिन सोमवंशी, मनोज सोनवणे, संजय पाटील, राजाराम पाटील, के. डी. चौधरी, अशोक साळुंखे, रतीलाल चौधरी, पिरन अनुष्ठान, ईश्वर जंगले, श्याम तायडे, प्रदीप सोनवणे, मुजीब पटेल, रामराव पाटील, विवेक नरवडे, देवेंद्रसिंग पाटील, जाकीर बागवान, जगदीश गाढे, जमील शेख, मुक्तदीर देशमुख, ज्ञानेश्वर कोळी, विष्णू घोडेस्वार, शंकर राजपूत, योगेश देशमुख, किरण पाटील, विकास वाघ, अल्ताफ खान, गाेपाळ कुंभार, विजय वाणी, प्रकाश पाटील व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.