रिड जळगाव >> देशातील सुप्रसिद्ध महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली असून आज सायंकाळी मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. याबाबत खुद्द अमिताभ बच्चन यांनीच ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.अमिताभ बच्चन यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आपण रुग्णालयात दाखल झालो आहे, असे अमिताभ यांनी नमूद केले आहे. नानावटी रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.