अमळनेर येथील कोविड सेंटरमधून सकाळी बाधित रुग्ण बेपत्ता… संध्याकाळी रस्त्यावर बेवारस स्थितीत आढळला मृतदेह..

अमळनेर

अमळनेर :- येथील कोविड सेंटर मधून काल दि. १० रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास बेपत्ता झालेल्या एका पॉझीटिव्ह रुग्णाचा मृतदेह बेवारस स्थितीत रस्त्याच्या कडेला संध्याकाळी आढळला. याआधीही एक रुग्ण बेपत्ता होवून त्याचा अपघात झाल्याने मयत झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर ही दुसरी घटना असून यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सदर मयत तालुक्यातील वावडे येथील ५० वर्षीय वयस्क आहेत. सकाळी सदर रुग्ण बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली होती. त्यानंतर संध्याकाळी एक बेवारस मृतदेह नगरपालिकेच्या जवळील रस्त्याच्या कडेला आढळून आला. सदर मृतदेह बेपत्ता कोरोना बाधित रुग्णाचा असल्याची ओळख नंतर पटली. मात्र या घटनेमुळे कोविड सेंटरच्या सुरक्षे विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *