अमळनेर न.पा. सेवानिवृत्त वयोवृद्ध शिक्षकांचा पगार दिवाळीपूर्वी करा

अमळनेर

जाहिर आवाहन नागरी हित दक्षता समिती तर्फे करण्यात आलेले आहे

अमळनेर गजानन पाटील प्रतिनिधी ::> अमळनेर नगरपालिका शिक्षण मंडळाचे सेवानिवृत्त वयोवृद्ध शिक्षक व विधवा शिक्षिकांचा चार महिन्यापासून पगार झालेला नाही अनेकांचा कौटुंबिक खर्च निवृत्ती वेतनातून होतो. अश्या वयोवृद्ध असलेल्या निवृत्तानां औषधालाही पैसे नाहीत अशी विदारक व चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. दुर्बल वयोवृद्ध व शक्तिहीन सेवानिवृत्त शिक्षक सदरचा अन्याय सहन करण्याच्या पलिकडे काही करू शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर नागरी हित दक्षता समिती ने सेवानिवृत्त शिक्षकांचा थकित पगार दिवाळीपूर्वी करावा असे जाहिर आणि विनम्र आवाहन केले आहेत.

दिनांक २९ऑक्टोंबर २०२० रोजी झालेल्या नागरी हित दक्षता समितीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत श्रावण गुरुजी व सत्तार मास्टर यांनी सेवानिवृत्त वयोवृद्ध शिक्षकांची आर्थिक परिस्थितीचा प्रश्न कथन असता सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. नागरी दक्षता समिती ही सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षकांसोबत आहे असे आश्वासन समितीचे अध्यक्ष प्रा अशोक पवार यावेळी बोलतांना यांनी दिले.

याप्रसंगी अमळनेर तहसील कार्यालयात सुमारे दोन वर्षापासून ची प्रलंबित प्रकरणे नागरी हित दक्षता समितीच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागत आहेत त्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल माननीय तहसीलदार अमळनेर यांचे आभार मानण्यात आले. समितीचे सचिव श्री बन्सीलाल भागवत यांनी प्रास्ताविक केले.

याप्रसंगी मगन पाटील ,पाटील प्रा डॉ राहुल निकम, सुनील अहिरराव ,हमीद गुरुजी ,शालीग्राम पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. अमळनेर तालुक्‍यात प्रत्येक गावात व वार्डात नागरी हित दक्षता समितीची स्थापना करण्याचा व प्रशिक्षणाच्या माध्यमातून जागृत नागरिक निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. समितीचे संचालक श्री संदीप जैन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार ऍड आर जी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी लोटन धर्मा कोळी व मंगल हिरामण पाटील हे उपस्थित होते.