अमळनेर तालुक्यात दोन हजार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप!

Social कट्टा अमळनेर कट्टा

अमळनेर प्रतिनिधी गजानन पाटील :: > अमळनेरातील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून मुंबई निवासी दात्यांच्या आर्थिक सहकार्याने कोरोना महामारी काळात तालुक्यातील दोन हजार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.


अमळनेर तालुक्यात शाळा बंद असल्यातरी शिक्षक सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन ऑफलाईन शिक्षण पोहचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिक्षकांच्या प्रयत्नांना जोड देता यावी म्हणून गरीब गरजू विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने मुंबई निवासी जयंतीलाल भाई, कमलेश भाई, जिनेंद्र भाई यांनी प्रत्यक्ष अमळनेर येथे शाळांच्या भेटीत प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले.


मुंबई निवासी दात्यांची मदत गरुजूपर्यंत पोहचविण्यासाठी श्रीमती भानुबेन शहा, गोशाळेचे चेतन शहा, युवा कल्याण प्रतिष्ठाण चे प्रा.अशोक पवार, मा.केंद्रप्रमुख बन्सीलाल भागवत आणि सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांच्या प्रयत्नांच्या माध्यमातून २ हजार विद्यार्थ्यांना गणवेशाचा लाभ खेडोपाडी पोहचला.

यावेळी समता युवक कल्याण केंद्र संचलित प्राथमिक शाळा अमळनेर, जि प प्राथमिक शाळा हिंगोणे खु,लोंढवे,निसर्डी, खडके,वाघोदे आदि जिल्हा परिषद शाळेत प्रत्यक्ष उपस्थित राहून सोशल डिस्टनसिंग पाळत गरजवंत विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात गणवेश वाटप करण्यात आले. तर दाते कमलेश भाई यांनी कन्या दिनाच्या निमित्ताने विद्यार्थिनींना प्रत्येकी कानातले दागिने भेट दिले.


सदर गणवेश वाटप उपक्रमात मुंबई निवासी उद्योगपती दाते जयंतीलाल भाई यांनी हिंगोणे खु येथिल शाळेत मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, ‘मुंबईबाहेर अश्या खेडोपाडी आल्यावर हलाखीचे जीवन जगणाऱ्यांचे दाहक वास्तव पहायला मिळाले आम्हाला शक्य तेवढी मदत भविष्यातहि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देऊ’ असे आश्वासन दिले.

प्रा अशोक पवार, बन्सीलाल भागवत यांनीही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिव बहुद्देशीय प्रतिष्ठान चे रणजित शिंदे,यतीन पवार,आशिष पवार संबंधित शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक यांनी परिश्रम घेतले.


याप्रसंगी विविध शाळांवर मुख्याध्यापक, स्थानिक सरपंच, पोलिस पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, स्थानिक मान्यवर ग्रामस्थांनीही उपस्थित राहून दात्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *